सिद्धांर्थाचा जन्म झाल्यावर असित देवल ऋषीने भविष्य वर्तविले होते, की हा गृस्थाश्रमातच राहिला, तर चक्रवर्ती राजा होईल व घरदार सोडून गेला, तर महान संबुद्ध होईल.
ह्या सिद्धार्थाकरिता त्याच्या पित्याने
मोठी बडदास्त ठेवली होती असे दिसते. उन्हाळा,
पावसाळा,
हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंकरिता त्याने
त्याच्यासाठी तीन प्रासाद बांधले होते. त्यांत
तो मोठ्या ऐषारामाने राहत असे.
गाण्याबजावण्याच्या साहाय्याने मनोविनोदन
करण्याकरिता तरुण
स्त्रियाही त्याच्या सभोवती असत.
त्याचा विवाहही यशोधरा नावाच्या सुंदर
युवतीशी झाला. अशा रीतीने
त्याची कालक्रमणा चालू
असताना त्याला प्रासादाच्या बाहेर जाऊन
उद्यानात फिरून यावे अशी इच्छा झाली व
त्याप्रमाणे बाहेर पडला असताना वृद्ध, व्याधित,
मृत व संन्यासी अशी चार प्रकारची माणसे
त्याच्या नजरेस आली व त्यामुळे संसाराबद्दल
घृणा उत्पन्न होऊन घर सोडून जाण्याचा विचार
त्याच्या मनात आला, अशी आख्यायिका प्रचलित
आहे; पण सुत्तनिपात ग्रंथात (९३५ — ३६) वैराग्य कसे
उत्पन्न झाले हे थोडक्यात सांगितले आहे :
‘थोड्याशा पाण्यात मासे जसे
आपल्या जीविताकरिता तडफडतात, त्याप्रमाणे
ह्या जगात लोक एकमेकांविरुद्ध लढत-झगडत असतात,
हे पाहून माझे मन भीतिग्रस्त झाले व माझ्या मनात
संवेग उत्पन्न झाला.’
अशा रीतीने खिन्न व उद्विग्न होऊन
ह्या जगातील दुःख कसे नष्ट करता येईल
ह्याचा शोध घेण्याकरिता त्याने घर
सोडण्याचा निश्चय केला.
जाण्यापूर्वी त्याची पत्नी प्रसूत होऊन
त्याला नुकताच पुत्र झाला होता व त्याचे नाव
राहुल असे ठेवण्यात आले होते. त्यांना पाहून जावे
म्हणून तो पत्नीच्या महालात गेला; पण
ती आपल्या नूतन बालकाच्या अंगावर हात टाकून
गाढ झोपली होती, असे पाहून तिची झोपमोड न
करता तो निघून गेला. ही गोष्ट
त्याच्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी घडली.
घरातून निघून गेल्यानंतर दक्षिणेकडे जात असता मगध
देशाची राजधानी राजगृह येथे तो आला. तेथील
राजा बिंबसार ह्याची गाठ पडली. त्याने देऊ
केलेल्या मोठ्या मानमरातबीयुक्त
जागेच्या मोहाला बळी न पडता आपला निश्चय
त्याने राजास सांगितला व पुढे आपल्या इष्ट
हेतूच्या सिद्धीकरिता म्हणून निघून गेला.
पर्यंटन करता करता आडार (पाली — आळार)
कालाम व उद्रक रामपुत्र ह्या नावाच्या दोन
ध्यानाचार्यांच्या गाठी पडल्या. काही दिवस
ह्या प्रत्येक आचार्याजवळ राहून
त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन
त्यांच्या ध्येय-समाधिप्रत तो जाऊन पोहोचला; पण
तेवढ्याने समाधान न झाल्यामुळे त्यांचेही शिष्यत्व
सोडून कठोर तपश्चर्या करण्याचा मार्ग त्याने
पतकरला. हठयोग्याप्रमाणे आपला आहार
कमी कमी करीत गेला. उन्हाचा ताप,
थंडीचा कडाका ह्याला न जुमानता अरण्यात राहून
तपश्चर्या केल्यामुळे त्याची कांती नष्ट झाली,
अंगात त्राण न राहिल्यामुळे कानांतून असह्य
वेदना येऊन तो एकदा खाली पडला.
तेव्हा त्याला कळून आले, की हा कठोर
तपश्चर्येचा मार्ग
त्याच्या ध्येयप्राप्तीला उपयोगी नाही.
तेव्हा त्याने पुन्हा थोडाथोडा आहार घेण्यास
सुरुवात केली.
ह्या देहदंडनाच्या तपश्चर्येच्या काळात
त्याच्याबरोबर जे पाच संन्यासी राहत होते
त्यांना वाटले, की हा आता आपल्या ध्येयापासून
च्युत झालेला आहे, म्हणून ते त्याला सोडून गेले.
तरी पण सिद्धार्थाने मन खचू न
देता ध्यानमार्गाचा अवलंब करूनच
आपली ध्येयसिद्धी होईल अशा दृढ निश्चियाने पुढे
मार्ग आक्रमण्यास सुरुवात केली.
नैरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी त्याला एक
सुरम्य जागा आढळली. तेथे जाताना वाटेत
सुजाता नावाच्या एका कन्येने त्याला पायस
दिला व सोत्थिय (श्रोत्रिय) नावाच्या माणसाने
त्याला थोडे गवत दिले. ते गवत झाडाखाली पसरून
त्याच्यावर तो ध्यानस्थ बसला.
त्यावेळी त्याच्या मनात सत्प्रवृत्ती व असत्
प्रवृत्ती ह्यांचा झगडा सुरू झाला. त्यात
सत्प्रवृत्तीचा जय झाला. हे मार-युद्ध होते असे
काव्यमय रूपकात वर्णन केलेले आहे. मार म्हणजे सैतान.
बौद्ध चित्रकलेच्या विषयात हा एक
महत्त्वाचा प्रसंग आहे. रात्रभर ध्यान-चिंतन करीत
असता त्याला ज्ञानाचा (बोधीचा) साक्षात्का
र झाला. हा वैशाख पौर्णिमेचा दिवस होता.
ही गोष्ट त्याच्या वयाच्या पस्तीस-
छत्तिसाव्या वर्षी घडली. त्याला ज्ञान प्राप्त
झाले म्हणजे चार आर्यसत्ये प्रतीत झाली व सर्व
जगात ‘प्रतीत्य-समुत्पाद’ (कारणपरंपरेमुळे सर्व वस्तू
अस्तित्वात येतात) ह्याचा दंडक आहे, हे
त्याला कळून आले.
ही बोधी अथवा संबोधी प्राप्त
झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत
ह्यासंबंधी कोणालाही उपदेश करणे
व्यर्थ आहे असे त्याला वाटू लागले; पण
पुढे ब्रह्मदेवरूपी जनतेने आग्रह केल्यानंतर
त्या ज्ञानाचा उपदेश करण्याचे त्याने
ठरविले व जे पाच
संन्यासी त्याला सोडून गेले होते
त्यांनाच प्रथम उपदेश करावा असे ठरवून आणि ते
वाराणसीत आहेत असे कळल्यावरून
वाराणसीला जाऊन त्याने त्यांना प्रथम धर्मोपदेश
केला. हा पहिला धर्मोपदेश ज्या सूत्रात आहे
त्याला ‘धर्मचक्रप्रवर्तनसूत्र’ असे नाव दिलेले आहे.
हे पाच संन्यासी त्याचे पहिले शिष्य बनले.
क्रमाक्रमाने त्याने आपले धर्मोपदेशाचे क्षेत्र जसे
वाढवले तशी त्याच्या अनुयायांची संख्याही वाढत
गेली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र
अशा समाजांतील सर्व थरांतील स्त्री-पुरुष त्याचे
अनुयायी बनत गेले. व्यापारी, राजे, महाराजे
हेही त्याला चाहू लागले व त्यांनी बुद्धाला व
त्याच्या अनुयायांना राहण्याकरिता उद्याने
दिली. श्रेष्ठिपुत्र यश व त्याची कुटुंबीय मंडळी,
उरूवेल काश्यप ब्राह्मण व त्याचे पाचशे शिष्य,
नदी काश्यप व त्याचे तीनशे अनुयायी, गया काश्यप
व त्याचे दोनशे अनुयायी हे सर्व
बुद्धाच्या आरंभीच्या अनुयायांपैकी होत.
अनुयायी जसे वाढत गेले तसे त्या सर्वांमध्ये
एकसूत्रीपणा आणण्याकरिता त्याने
भिक्षुसंघाची स्थापना केली.
ध्येयाच्या शोधार्थ गौतम
निघाला असताना वाटेत
बिंबिसार राजाची गाठ
पडली होती आणि त्यावेळी ध्येयप्राप्तीनंतर
पुन्हा परत येऊन भेटेन असे वचन त्याने बिंबिसार
राजास दिले होते, त्याप्रमाणे तो पुन्हा परत जाऊन
बिंबिसार राजास भेटला. बिंबिसार
राजा बुद्धाचा उपासक बनला व त्याने बुद्ध व त्याचे
अनुयायी भिक्षू ह्यांना राहण्याकरिता आपले
वेणुवन नावाचे उद्यान दान म्हणून दिले.
राजगृहाजवळच राहणाऱ्या संजय परिव्राजकाचे शि
ष्य ⇨ सारिपुत्त व मोग्गलान हे बुद्धाचा एक शिष्य
अस्सजी (अश्वजित) ह्याचा उपदेश ऐकून
आपल्या अडीचशे परिव्राजकांच्या परिवारासह
बुद्धाचे शिष्य बनले. हेच दोघे पुढे बुद्धाचे पट्टशिष्य
बनले.
बुद्धाला ज्ञान प्राप्त होऊन
तो आपल्या मोठ्या परिवारासह राजगृहातील
वेणुवनात राहत आहे, ही वार्ता कपिलवस्तूत
राजा शुद्धोदनाच्या कानावर गेली,
तेव्हा तो आपल्या मुलाला पाहण्याकरिता मोठा उत्सुक
झाला. त्याने त्याच्याकडे दूत पाठवून कपिलवस्तूस
येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे बुद्ध गेला; पण
राजवाड्यात न राहता बाहेर राहिला.
भिक्षापात्र हातात घेऊन तो गावभर
भिक्षा मागत असे व त्यावर उदरनिर्वाह करीत असे.
शुद्धोदन राजाला फार वाईट वाटले व त्याने
‘भिक्षा मागून आम्हास का लाजवितोस’ असे
आपल्या पुत्राला विचारले. त्याने ‘भिक्षेवरच
निर्वाह करणे हा आमच्या म्हणजे बुद्धकुलाचा दंडकच
आहे’ असे निक्षून सांगितले. तो राजवाड्यात
आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला-यशोधरेला-
भेटण्यास गेला तेव्हा तिने आपल्या पुत्राला —
राहुल यास — पुढे करून त्याला आपल्या पित्याजवळ
आपला वारसा मागण्यास सांगितले.
मुलगा आपला वारसा मागत बुद्धाच्या मागे
विहारात गेला. तेथे बुद्धाने आपल्या सारिपुत्त
शिष्याला बोलावून त्याला प्रव्रज्या देण्यास
सांगितले व ह्या रीतीने राहुलला श्रामणेर —
अल्पवयीन असल्यामुळे संपूर्ण शिष्यत्व
ज्याला देता येत नाही असा श्रमण — केले.
ही वार्ता जेव्हा शुद्धोदन राजाच्या कानावर
गेली तेव्हा त्याला अत्यंत दुःख झाले. तो विहारात
गेला व बुद्धाला जाऊन त्याने म्हटले, की
‘अशा रीतीने लहान मुलांना प्रव्रज्या दिली, तर
हा एक मोठा अन्याय होईल. तेव्हा तू मला एक वर दे;
तो म्हणजे कोणत्याही तरुणास
संन्यासदीक्षा आईबापांच्या परवानगीवाचून देऊ
नये.’ बुद्धाला हे म्हणणे पटले व तेव्हापासून
आईबापांच्या परवानगीवाचून कोणाही तरुणास
संन्यासदीक्षा देऊ नये, असा नियम बुद्धाने केला.
कपिलवस्तूतील उपदेश देण्याचे काम संपल्यानंतर
बुद्ध परत राजगृहात आला. तेथे अनेक
नगरवासियांकडून भोजनाचे निमंत्रण येत असे.
अशा एका नगरश्रेष्ठीने
बुद्धाला आपल्या शिष्यांसह भोजनास निमंत्रण
दिले होते. त्यानिमित्त
त्याच्या घरी भोजनाच्या तयारीची गडबड चालू
असताना त्याचा मेहुणा,
श्रावस्ती नगरीचा अनाथपिंडिक नावाचा श्रेष्ठी,
पाहुणा म्हणून आला होता. बुद्धाचे नाव
ऐकल्याबरोबर तो बुद्धदर्शनास उत्सुक झाला. दुसरे
दिवशी सकाळी पहाटेच
बुद्धाच्या दर्शनाला गेला असताना बुद्धाने त्याला
‘सुदत्त’ ह्या त्याच्या स्वतःच्या नावानेच हाक
मारल्यामुळे तो चकित झाला.बुद्धाने त्याला उपदेश
केला व तो त्याचा उपासक बनला.त्याने
बुद्धाला श्रावस्तीस येण्याचे निमंत्रण दिले व
त्याच्याकरिता त्याने जेतवन नावाचे जे
एका राजपुत्राचे उद्यान होते ते खरेदी केले. जमीन
झाकण्याकरिता जितक्या सुवर्णमोहरा लागतील
तितकी त्या उद्यानाची किंमत, असे जेत राजपुत्राने
म्हणले होते; म्हणून तितक्या सुवर्णमोहरा दिल्या.
हा प्रसंगही बौद्धांच्या शिल्पस्मारकांतून
कोरलेला आढळतो. बुद्ध पुढे त्या ठिकाणी आला व
अनाथपिंडिकाने बांधलेल्या विहारात राहू
लागला. ह्याच ठिकाणी त्याने आपले अनेक
धर्मोपदेश केल्याचे बौद्ध ग्रंथांतून आढळते.
Monday, July 21, 2014
गौतम बुध्द भाग:२
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment