Monday, October 2, 2017

शाहूचरित्र ....काय शिकवते ?? ( भाग ४० )

शाहूराजा हा मानवतेचा एक अत्युच्च बिंदू होता. माणसाने माणसांशी माणसासारखा व्यवहार करावा हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर जपले. माणसातून उठविलेल्या जातींना पोटाशी धरून पुन्हा माणसात आणण्यासाठी शाहूराजा झटत राहिला. एक अनोख्या प्रकारची मानवी प्रयोगशाळा शाहूराजाने उघडली होती . मानवतेच्या महान प्रयोगात यामुळे एक  उत्तुग नोंद शाहूराजाने केलीय. ती गोष्ट ऐकायलाच हवी....

*जंगली फासेपारधी जमात...माणसात आणण्याचा अनोखा प्रयोग सोनतळी कँपमध्ये शाहूराजा करत होता. फासेपारध्याना रोजगार - धंदा उपलब्ध करून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा दाखवली. काहीना आपले संरक्षक पहारेकरी नेमले.आंबेवाडी ते सोनतळी हा रस्ता बांधण्याचे काम त्यांना सोपवले. सोनतळी कँपवरच कच्च्या इमारती बांधण्याचे जाणीवपूर्वक काम काढले. बंगल्याजवळ विहीर खुदाई चालू केली. काळ्या पत्थरावरा विहीर खोदणे हे अजब काम होते. विहीरीला पाणी लागणे शक्य नव्हते तरीही जाणीवपूर्वक काम चालू ठेवले. विहीरीसाठी खणलेल्यातून इमारती करीता दगड मिळत होते. त्यांनीच इमारती बांधल्या जात हौत्या. पण वैशिष्ट्ये हे की इमारती कच्च्या बांधकामाच्या होत्या. पावसाळ्यात इमारती पडत. परत परत त्या बांधल्या जात. महाराजावर " जाणकार लोक " टिका करत होते. पैसे वाया जातात म्हणून टिकास्त्र होते. महाराज यावर जे सांगत ते ऐकून कुणाही मानवतावादी माणसाचे डोळे भरतील. महाराज सांगत " चांगल्या सुंदर इमारती बांधून गावास प्रेक्षणीय रुप येईल हे खरे , परंतु वरकरणी दिसणाऱ्या इमारतीच्या सौंदर्यातच मी समाधान मानू की , आज कामावर असलेल्या हजारो मजूरांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या मिळणाऱ्या आशिर्वादात सुख मानू ? तुम्हाला खरेच असे वाटते का ही इतकी माणसे जेवल्याने मिळणाऱ्या आशिर्वादा पेक्षा इमारतीचे सौदंर्य अधिक महत्त्वाचे आहे ??" ...हळुहळू यातूनच फासेपारध्याना इतर कामे सोपवली. शिक्षण व्यवस्था केली. राधानगरी धरणाच्या कामावर पाठवले. शिकार खात्यात नोकरी दिली. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या या जमातीला थेट पोलीसात दाखल करून घेतली. अगदी शेवटचा कहर म्हणजे युवराज राजाराम महाराजांच्या लग्नाला बडोद्याला जो गोतावळा शाहूराजाने नेला त्यात अनेक फासेपारधी सामिल होते.....जगाच्या पाठिवर अशा प्रकारचा प्रयोग माझ्या तरी ऐकीवात नाही. गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातीना माणसात आणण्यासाठी शाहूराजा हे,सारे कष्ट झेलत होता. त्यांना पोटाला काम देत होताच पण त्याचबरोबर मानवाचा व्यवहार त्यांच्याशी करत होता. प्रेम व विश्वास देत होता. परिणामी हि गुन्हेगार समजली जाणारी जमात सुसंस्कृत वाटेवर परतली.शाहूराजा मृत्यू पावलेवर सर्वात जास्त जर कुणी रडले तर हे फासेपारधीच होत. इतकी माया शाहूराजाने यांच्या वर केली.*

हा धडा आमच्या आजकालचे सर्व शासनकर्त्या वर्गाने घ्यायला हवा. गुन्हेगार समजून दंड करणे सोपे असते पण गुन्हेगारला माणसात आणण्याचे प्रयत्न हे महान असतात. याकरिता अट एकच असते ती म्हणजे शाहूराजाचे काळीज जवळ असावे लागते. माणसाला प्रेम व विश्वास दिला तर तो स्वतःत सुधारणा करतो....शाहूचरित्र हेच तर शिकवते.

*!! प्रेम व विश्वास ..हेच जगण्याचे मुख्य आधार असतात !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...