एखादा राजा आपल्या रयतेच्या हिताकरता कोणत्या पातळीपर्यत जाऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण आज सांगणार आहे. " एक शाळा उघडणे म्हणजे एक तुरुंग बंद करणे होय " असे इंग्रजी भाषेत एक वचन आहे. शंभर वर्षापूर्वी शाहूराजा जेव्हा या ज्ञानदानाच्या कार्यात बाहू सरसावून पुढे आला तेव्हा आजकालचा आपला बहुजन वर्ग उभा राहू शकला. शाळा उघडणे म्हणजे नुसते हुकुम सोडणे नव्हे तर त्या शाळेच्या इमारतीपासून सारी तयारी आपल्या देखरेखीखाली करणे होय. अपवाद ही नसावा अशी ही गोष्ट तुम्ही ऐकावीच. शाहूराजाला माणसातील राजा व राजातील माणूस का म्हणतात हे निश्चितच कळून येईल.
*विद्यापीठ ....हे कोल्हापुरातील नावाजलेले हायस्कूल आहे. हे विद्यापीठ उभे करण्यासाठी तोफखाने या संस्थापकानी अनंत अडचणी झेलल्या आहेत. त्यांनी नोंदवून ठेवलेली ही एक आठवण. विद्यापीठ हायस्कूल उभे करायला महाराजांकडून जी जागा तोफखाने यांनी मागून घेतली ती इमारत शाळा सुरु होण्यास अल्प कालावधी राहिला तरी ताब्यात मिळेना. महाराजांच्या हुकुमाची अंमलबजावणी खाजगी कारभारी करेना. परिणामी फेऱ्या मारून मारून तोफखाने थकले. शेवटी हतबल होऊन तोफखानै यांनी आपल्या सहकारी लोकांना बरोबर घेऊन स्वतः च इमारत खाली करायला सुरुवात केली.संध्याकाळी तोफखाने सोनतळी कँपवर शाहूराजाला भेटायला गेले. महाराजांच्या कानावर सारी हकिकत कळवली. महाराजांचा चेहरा गंभीर झाला. " मी उद्या सकाळी तिथे पोचतो " असे महाराजांनी सांगितलं. तोफखाने यांना स्वतःच्या गाडीतून घरी पाठवले. सकाळी साडेसात वाजता ९० कैदी बरोबर घेऊन महाराज हजर झाले. पूर्ण सहा तास त्या ९० कैद्यांना लागले संपूर्ण साहित्य बाहेर काढायला. बरोबर दिड वाजता महाराज तोफाखानेना म्हणाले " तुमची इमारत मोकळी झाली. आणि काही अडचण असेल तर कळवा." तोफखानेनी पुढे आठवणीत जी महत्त्वाची नोंद केलीय ती अशी की , सकाळी साडेसात वाजलेपासून दुपारी दिड पर्यत शाहूराजा जवळच्या देवळाला टेकून उभे राहिले होते. खुर्चीवर अजिबात बसले नाहीत. बरोबरच्या माणसांना कामासंबधी सूचना करणेशिवाय महाराज काहीच बोलले नाहीत. महाराज बेचैन होते. आपल्या खाजगी कारभारीच्या कार्यक्षमतेअभावी जागा खुली करण्याची काम सहा तास भर उन्हात उभे राहून जातीने शाहूराजाने पूर्ण केले. असे उदाहरण देशाच्या इतिहासात पहिले व शेवटचेच असावे अशी नोंदही तोफखाने यांनी ठेवली आहे......शाहूराजा हा किती महान होता याची अंसंख्य उदाहरणे आपण पाहिलीत. आपल्या खाजगी कारभारीला पुढे गच्छंती करुन महाराजांनी योग्य न्याय केला. विचार करा की ते एक वर्ष जरी शाळा पुढे गेली असती तरी बहुजन वर्गाचे किती नुकसान झाले असते. याची यथार्थ जाणीव शाहूराजाला होती. म्हणूनच स्वतः जातीने उन्हात उभे राहून त्यांनी हे काम पूर्ण केले.*
लोकहो , मी ज्या ज्यावेळी विद्यापीठ हायस्कूलच्या परिसरात जातो तेव्हा तेव्हा त्या अंबाबाईच्या देवळाच्या भिंतीला एक मायाळू व बैचेन नजर माझ्या डोळ्यासमोर तरळते. ती नजर असते ती लोकराजा शाहूराजाची. एक उत्तम राज्यकर्ता कसा असावा यासाठी शाहूचरित्र प्रत्येक नेतृत्व करणाऱ्या वर्गाने वाचावे. जनतेविषयी इतकी कळकळ आपल्या हृदयात साठवणे व कृतीशील होणे हे शाहूराजाच करु जाणे. विद्येचे महत्त्व विसरायच नाही आणि त्याबाबत कोणतीच तडजोड करायची नाही ....शाहूचरित्र हेच तर शिकवते.
*!! शाहूराजाचे डोळे मायेने भरलेले ...त्या मायेवरच बहुजन वर्ग तरलेले !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment