साथींनो...गेले ४० दिवस रोज शाहूचरित्र आपण वाचत गेलो. आज थांबण्याची वेळ आली. अजूनही बरेच लिहीता येईल , सांगता येईल , परंतु दिशा दाखवणे एवढाच माफक उद्देश होता. आता या वाटेवर आपल्यालाच मार्गस्थ व्हायच आहे. मला प्रामाणिकपणे वाटते की शाहूराजाचे जीवन व कार्य हे जेवढे आपणांस माहिती होते त्यामध्ये नव्यानं भर अशी पडली की आता त्या जीवनाकडै पाहण्याची एक नवी दृष्टी ही लेखमाला देईल. तसे झाले तर लेखमाला यशस्वी झाली असे म्हणता येईल.
*शाहूराजा ...हा केवळ राजा नव्हता. सरंजामी वृत्तीचा राजा तर अजिबातच नव्हता. " राजातील माणूस व माणसातील राजा " हेच त्याचे वर्णन समर्पक आहे. अत्यंत मानवतावादी हृदयाचा हा राजा दिर्घकाळ स्मरणात राहील एवढे नक्कीच. या लेखमालेचा स्फुर्तीदाता हा शाहूराजाच होता. मला शाहूचरित्रकडे बघण्याची दृष्टी माझ्या वैचारिक बापाकडून मिळाली. " वसा आणि वारसा " पहायचा कसा हे त्यानेच शिकवले मला. माझ्या या वैचारिक बापाला अर्थात काँ. गोविंद पानसरे यांना ही माझी लेखमाला मी समर्पित करतो. या लेखमालेकरता ज्या शाहू अभ्यासकानी वेळोवेळी कष्टपूर्वक नोंद केल्या त्या सर्व अभ्यासकाप्रती आणि ज्यानी शाहूराजाच्या आठवणी लिहून संकलीत केल्या त्या सर्व सत्यशोधकी अनुयायांचौया मी प्रेमळ ऋणातच राहीन.*
आपण सर्वांनीच या लेखमालेला भरभरून प्रतिसाद केलात. फोनवर अथवा व्हाट्सअप / फेसबुकवरुन प्रतिसाद दिलात त्यामुळं ही लेखमाला अधिक चांगली बनली. ज्या त्रुटी अथवा उणीवा राहिल्या त्या संपूर्ण माझ्या होत्या. ही माझी ६ वी लेखमाला होती. यापुढेही एका नव्या विषयावर तुमच्याशी संवाद करायला मी आतूर आहे. लौकरच प्रतिक्षेचा कालखंड संपेल ह्या ग्वाहीसह लेखणी थांबवतो.
*!! लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
( सदर मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठीची लिंक http://swapnwel.blogspot.in/search/label/शाहूचरित्र...काय%20शिकवते%20%3F%3F?m=1 )
No comments:
Post a Comment