Wednesday, April 25, 2018

वैज्ञानिक दृष्टिकोणाची तोंडओळख एकदा तरी वाचाच

वैज्ञानिक दृष्टिकोणाची तोंडओळख एकदा तरी वाचाच

आजवर शाळेत असताना मूल्यशिक्षणाच्या तासाला मूल्यांमधे आपण 'वैज्ञानिक दृष्टिकोण' हां शब्द नेहमीच ऐकत आलोय...हां दृष्टिकोण 'माणूस' म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी फार फार महत्वाचा आहे...!

केवळ 400 वर्षापुर्वी मानवाला समजलेला हां दृष्टिकोण मानवाची विश्वाकडे पाहण्याची दृष्टीच आरपार बदलवुन गेला..!

आपल्या संविधानात असं लिहलयं की,........

प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्याने.....

'वैज्ञानिक दृष्टिकोणाचा' प्रचार,प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे...!"

1987 साली आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात

"वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती" या महत्वाच्या गाभाघटकाचा समावेश करण्यात आला आहे..!

मूल्यशिक्षण शाळेेमधे शिकवले जाते...त्या मूल्यशिक्षणात ''वैज्ञानिक दृष्टिकोण'' महत्वपूर्ण मानला आहे...!

मग नेमकं वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे तरी काय...?

"कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण...!"

अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल...!
किंवा असही म्हणता येईल की

"जेवढा पुरावा उपलब्ध आहे,तेवढा विश्वास ठेवणे.."

एखादी गोष्ट सत्य आहे का नाही,यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण "निरीक्षण,तर्क,अनुमान,प्रचिती आणि प्रयोग..." या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे...

वैज्ञानिक दृष्टिकोण शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तिने सांगितले म्हणुन खरे मानायचे,हे
नाकारतो..!
वैज्ञानिक दृष्टिकोण ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे हे नाकरतो..

चमत्काराचा दावा करने हे लोकांना मूर्खात काढण्याच प्रभावी साधन आहे... वर नमूद केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही... "चमत्कार करणारे बदमाश असतात,त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात,आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात..!"
चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते..!

जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले अथवा दुष्ट शक्तिमुळे वाईट अजिबात होत नाही.. जे काही घडत त्यामागे निश्चितच कारण असते..आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते..

आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेली आहे.. विज्ञान नेहमीच नम्र असते, ते नवनवीन बदलांना आत्मसात करतं.. धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही...

'मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' विज्ञानाने आलेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले... आजवर धर्माने एकही मानवी प्रगतीसाठी नविन शोध लावलेला नाही..

वैज्ञानिक दृष्टिकोण आत्मसात करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे "छद्म विज्ञान (pseudo science)" यापासून सावध असले पाहिजे.. छद्म विज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "वास्तू शास्त्र, जोतिष शास्त्र"...

आज समाजात अनेक गोष्टी 'यामागे विज्ञान आहे' अस सांगून जनसमान्यांच्या माथी थोपवल्या जातात... त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का, हे "वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ठरवावे..
विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात..

"आपल्या जीवनात आज जे जे काही घडतं,त्यामागे पूर्व संचित आहे,नियती आहे,नशीब आहे,पूर्वजन्मीच पाप आहे.."
अस समजने हा पळपुटेपनाचा मार्ग आहे..
कष्टाला पर्याय नाही..हे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!

आत्मा-परमात्मा,जन्म-मृत्यु,प्रारब्ध-संचित-नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मानी,अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे...व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो... वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारा फसवेपना नाकरतो... जे विज्ञानाच्या कसोटिवर टीकते, ते ते खरं..अस वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!

धर्माच्या शिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते,असे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो..!

"इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपनाशी आवडत नाही,तसे वर्तन आपन इतरांशी करू नये...आणि इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपल्याला आवडते,तसे वर्तन आपणदेखिल इतरांशी करावे..!"

वैज्ञानिक दृष्टिकोण नेहमीच नम्र असतो..मी सांगितलेला शब्द अंतिम सत्य असा दावा तो करत नाही..! तो नवनवीन सत्य पुराव्या आधारे स्वीकारत जातो..!

थोडक्यात असं की,

1.प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच..!

2.ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.

3.सर्वच गोष्टींची कारणे समजतात असे नाही,परंतु ज्यावेळी समजतील त्यावेळी कशाप्रकारे समजतील हे नक्की समजते.

म्हणून .......

   पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोणाचे महत्व सांगताना लोकसभेत म्हणतात की...
Scientific Temperament is a Process of Thinking, Method of Action, Search of Truth,Way of Life,Spirit of Free Man...!

म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे,सत्यशोधनाचा मार्ग आहे,जीवनाचे दिशादर्शन  आणि व्यक्तीला जानिवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होते..!

आणि सर्वात महत्वाचं असं की ज्या आकलनाच्या परिपक्वतेअभावी या देशातील असंख्य प्रश्नाना वाचा फुटली नाही...ती 'आकलनाची परिपक्वता' वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो..!

भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरीकत्वाचं भरण-पोषण प्रामुख्याने हां वैज्ञानिक दृष्टिकोण करतो..!

यावरुन किमान आपणाला "वैज्ञानिक दृष्टिकोणाची" तोंडओळख तर नक्कीच झाली असेल...!

युवा मित्र-मैत्रिणीनो..
विज्ञान हा 'वैज्ञानिक दृष्टिकोण' आपणाशी विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधू इच्छितो...

विचार तर कराल..?
  

(संग्रहित लेख- लेखकाचे नाव माहीत असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये लेखकाचे नाव द्यावे.लेखकाच्या नावासोबत लेख परत publish केला जाईल.)

Monday, April 23, 2018

Shayari

बेवजह सरहदों पर
इल्जाम है बंटवारे का,
लोग मुद्दतों से
एक घर में भी अलग रहते हैंl
----------------------------------------------------------
सिखा दिया है जहां ने
हर जख्म पर हंसना
ले देख जिंदगी
अब हम तुझसे नहीं डरते...
----------------------------------------------------------
इंसान की इंसानियत
उसी समय खत्म हो जाती है
जब उसे दूसरों के दुख में
हँसी आने लगती है...!!
----------------------------------------------------------
ऐसा नहीं था के
हम चिराग नहीं थे...!
बस कमी ये थी
हम उजालों में जले...!!
----------------------------------------------------------
जमाना "वफादार" नहीं
तो फिर क्या हुआ...
"धोखेबाज" भी तो
हमेशा अपने ही होते हैं.....
----------------------------------------------------------
वो रो पड़ा आज
माँ का ख़त पढ़ कर..
जिसमे लिखा था...
अब तो गाँव आया करना बेटा..
सड़कें पक्की हो गई है...
----------------------------------------------------------
देखना कभी नम न हो
घर के बुजर्गों की आँखें,
छत से पानी टपके तो
दीवारें कमज़ोर होती हैं...
----------------------------------------------------------
फर्क बहुत है
तेरी और मेरी तालीम में,
तूने उस्तादों से सीखा है
और मैंने हालातों से...
----------------------------------------------------------

Saturday, April 21, 2018

Success Mantra

बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही खास स्किल असणे गरजेचे असते.हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्यवसायात सहज यशाचे शिखर गाठता.बिझनेस वेबसाईट इंक डॉटकॉमने नुकतेच आपल्या अहवालात अशाच काही सॉफ्ट स्किलविषयी माहिती दिली आहे.
नंबर-1: कधीही समजू नका की आपण प्रॉडक्ट विकत आहोत
- अनेक जण लोक खरेदी करतील असे समजून प्रॉडक्ट लॉन्च करतात. त्यांना वाटते की आपल्या फक्त वस्तू विकायची आहे पण असा विचार करणे चूक आहे. चांगले बिझनेसमॅन असा विचार करत नाहीत. ते लोकांना काही तरी चांगले आणि खास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही केवळ प्रॉडक्ट विकण्याचा विचार न करता लोकांना काही तरी खास देण्याचा आणि त्यांना स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करा.
 नंबर-2: दुसऱ्याचा तणाव दुर करण्याचा प्रयत्न करा
- चांगला व्यावसायिक होण्यासाठी तुम्हाला आपला तणाव कसा दुर करायचा हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तुम्हाला तिच्याशी झगडता आले पाहिजे. एवढेच नाही तर तुमच्यासोबत काम करणाऱ्यांचा तणावही तुम्हाला दुर करता आला पाहिजे. तुमच्या ऑफिसमधील वातावरण जास्तीत जास्त कसे टेन्शन फ्री करता येईल याचाही तुम्ही विचार केला पाहिजे.
नंबर-3 : आव्हानांना सामोरे जा
- तुम्ही कोणतेही काम करत असाल अथवा व्यवसाय करत असाल तरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार राहा. तुम्हाला तुमच्या तत्वांना मुरड घालावी लागेल असे प्रसंगही तुमच्यासमोर येतील पण तुम्हाला तुम्ही उत्पादित केलेल्या वस्तूची किंमत माहिती असल्यास तुम्ही या आव्हानाला सहज सामोरे जाल. तुमच्या वस्तूला योग्य मुल्य मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील.

 नंबर-4 : केवळ आदेश देणारे होऊ नका
- अनेकांना केवळ इतरांना ऑर्डर देण्याची सवय असते. पण त्याऐवजी तुम्ही दुसऱ्यांना त्यांचे स्किल, टॅलेंट दाखविण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यास इम्पॉवर केले पाहिजे. तुम्ही हे ओळखले पाहिजे या कर्मचाऱ्यात काय खास आहे. त्याची यूएसपी काय आहे. कोणती गोष्ट त्यांना प्रेरणा देते. त्यांच्यात काही यूनीकनेस आहे की नाही. एकदा कर्मचारी परिस्थिती हाताळू शकत नसेल तर ती कशी हाताळायची याचे प्रशिक्षणही तुम्ही त्याला द्यायला हवे.
नंबर-5: मैत्री वाढवा कॉन्टेक्टस नको
- बिझनेस वाढविण्यासाठी तुम्ही नुसते कॉन्टेक्टस वाढवू नका तर लोकांशी मैत्री करा. केवळ कामाच्या गोष्टी न करता त्यांना त्यांच्या स्थितीविषयी विचारा. तुमच्याविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे असे तुमचे वर्तन असायला हवे.

Friday, April 20, 2018

नरवीर उमाजी नाईक

रामोशी समाजाची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वताला रामवंशी समजत असत. म्हणून काही तज्ञ व्यक्ति रामोशी या शब्दाची फोड रामवंशी व काही तज्ञ रानवंशी अशी करतात कारण की रानात राहत असत म्हणून. रामोशी लोक किंवा जमात ही जंगलाने राहणारी असल्यामुळे ते शरीराने बळकट उंच बांधेसुध असत. म्हणून ते शेती पशुपालन व्यवसाय करत असत. तसेच किल्ल्यांचा बंदोबस्त व पहारेकरी म्हणून देखील ते काम करत असत. गावचा महसूल गोळा करण्याचे काम देखील ते करत असत. इंग्रजांचे साम्राज्य आले तेव्हा त्यांना अनेक शाही कामातून मुक्त करण्यात आले त्यामुळे रामोशांचा इंग्रजाविरुद्ध रोष होता. रामोशी लोक निजामाच्या प्रदेशातील शोरापुर च्या राजास आपला प्रमुख मानत असत तसेच आपल्या नावाच्या पुढे नाईक आशा संज्ञा लावत असत.
               

    उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदर मधील भिवरी गावात इ. स. 1791 मध्ये झाला. त्यांचे वडील दादजी अन्यायाच्या विरोधात काम करत असत. उमाजी अकरा वर्षाचा असतानाच दादजीचा मृत्यू झाला. वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर  किल्ल्याच्या बंदोबस्तात होते. रामोशी लोक जुलमी सावकाराच्या घरावर दरोडे टाकत असत.
             भोर जवळील विंग गावात इ. स. 1818 साली दरोडा टाकताना उमाजी पकडला गेला. तुरुंगात असताना उमाजी साक्षर झाला. उमाजीच्या अगोदर संतु नाइकाच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी आणि त्याचा भाऊ अमृता याने भांबुड्यांचा लष्करी खजिना लुटला (1824-25). संतु नाईकांच्या मृत्यू नंतर सर्व रामोशांचे नेतृत्व उमाजी नाइकाच्या हातात आले.
              रामोशांचे नेतृत्व हातात येताच उमाजी नाइकाने त्याचवर्षी सात दरोडे आठ वाटमार्‍या घडून आणल्या. अनेक धंनिकांना लुटले. त्यामुळे उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यास पकडून देणार्‍यास 100 रूपयांचा इनाम घोषित करण्यात आला. परंतु इंग्रजांच्या जाहीरनाम्याचा काहीही फायदा झाला नाही. यावरून इंग्रजांनी एकच निष्कर्ष काढला तो म्हणजे सर्व लोक उमाजी नाईकांच्या बाजूने आहेत. पहिल्या जाहीरनाम्याचा काहीच उपयोग झाला नसल्याने इंग्रजांनी दूसरा जाहीरनामा काढला या जाहीरनाम्यात जो कोणी उमाजी नाईकाची साथ देईल त्यास सजा देण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते. परंतु इंग्रजांच्या या घोषणेचा देखील काहीच फायदा झाला नाही. 
       जेजूरी, सासवड, परींचे,  भिवरी,  किकवी, या भागात उमाजीने प्रचंड लुटालूट करून इंग्रजांना जेरीस आणले होते. इंग्रजी राजवटीची कायदा व सुव्यवस्था अस्था व्यस्त झाली होती. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी ठिकठिकाणी पोलिस चौकी स्थापन केल्या. घोडदळाची नेमणूक केली तसेच तिसरा जाहीरनामा काढून उमाजी नाईकास पकडून देणार्‍यास 1200 रु देण्यात येतील असे घोषित केले. पण याचा परिणामही उमाजी नाईकावर झाला नाही. कारण समाजातील प्रतिष्ठित लोकांची साथ उमाजी नाईकाला होती.
              एवढे सर्व झाल्यानंतरही इंग्रज उमाजी नाईकाला पकडू शकले नव्हते. त्यामुळे उमाजी नाईकने स्वतःला राजे म्हणून घ्यावयास सुरुवात केली. त्याचा दरबार भरत असे. गोरगरीबांना दक्षना देण्याचे काम त्याने सुरू केले होते. त्याच्यासोबत सर्व जातीचे लोक असत. त्याने अनेक कारस्थाने करून इंग्रजांना आव्हान केले होते.
               त्याने इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याच्या कलेक्टर एच डी रॉबर्टसन याच्याकडे ई. स. 1827 मध्ये पुढील मागण्या केल्या. इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा भावे यांना मुक्त करावे. रामोशांची परंपरागत वाटणे परत करावीत. पुरंदर व इतर ठिकाणी असणार्‍या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लाऊ नये.
     वरील प्रमाणे न वागल्यास त्यांना रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. कलेटक्टर रॉबर्टसन ने खालील जाहीरनामा काढून उमाजी च्या जाहीरनाम्याला उत्तर दिले. (15 डिसेंबर 1827) जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये. उमाजी, भुसाजी, पांडुजी व येसाजी या बंडखोरांना पकडून देणार्‍यास प्रत्यकी रु 5000 बक्षीस दिले जाईल. रामोशी चार परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहे. त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल. रामोशासोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ति सरकारात आल्यास त्यास पूर्ण माफी दिली जाईल. बंडखोरास माहिती देणार्‍यास खास बक्षीस दिले जाईल.
           कलेक्टर जॅक्सन चा जाहीरनामा वाचून उमाजी संतापला. त्याने पाच दिवसात पाच इंग्रजांना पकडले व त्यांची मुंडी कापून सासवड येथील ब्रिटिश आधिकार्‍यास पाठविली. त्यानंतर पाच दिवसांनी 25 डिसेंबर 1827 ला दूसरा जाहीरनामा काढला त्याचे पुढील मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील.
             ठाणे जिल्ह्यातील पाटील, मामलेदारांनी महसूल सरकारकडे जमा न करता तो थेट उमाजीस द्यावा. उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवा अन्यथा होणार्‍या परिणामला सबंधित व्यक्ति जबाबदार असतील.
           या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजी ला महसूल दिला. दरम्यानच्या काळातच उमाजिनी, कोल्हापूरचे छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे सबंध प्रस्थापित केले. याचा फायदा घेऊन उमाजिनी ब्रिटिशांविरोधात दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटीशांना धक्का बसला.  
           उमाजी ला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले. पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी नीतीतत्वाच्या विरोधात जाऊन उमाजी च्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना पकडूनच उमाजीला कैदेत टाकता येईल असा निष्कर्ष काढला. तेव्हा त्यांनी माहिती काढून उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. त्याचा परिणाम तसाच झाला जसा इंग्रजांना हवा होता. उमाजीने आपल्या परिवाराखातर स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केले. परंतु उमाजीला सजा न देता इंग्रजांनी त्यास नौकारीवर ठेवले. पुणे व सातारा भागात शांतता टिकविण्याचे काम त्याच्याकडे सोपवले. त्याने त्या भागात शांतता टिकवली परंतु भोर संस्थानातील तेरा गावाच्या महसुलावरून उमाजीचा इंग्रजांशी संघर्ष चालूच होता. त्यातच खटाव, नातेपुते या भागात उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली म्हणून त्यास इंग्रजांनी कैद केले. परंतु उमाजी त्यांच्या कैदेतून सुटला.
             उमाजी इंग्रजांच्या कैदेतून सुटल्यानंतर त्याने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. त्याने इंग्रजांच्या प्रदेशात दंगली घडवून आणण्यासाठी त्याने योजनाबद्ध कार्यक्रम आखला. रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे.  इंग्रजाबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे व गनिमिकावा तंत्राचा अवलंब करून त्यांना हैराण करणे. रयतेला त्रास द्यायचा नाही. परंतु त्यांच्याकडे भाकरी मागून भूक भागवणे.
      इंग्रज सरकारने उमाजिला पकडण्याची जबाबदारी कॅ. अलेक्सझंडर व कॅ. मॅकिंटोशवर सोपवली. उमाजींचा त्यांच्याशी पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला. परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्या नंतर 26 जानेवारी 1831 ला पुण्याच्या कलेक्टर जॉर्ज जिर्बन यांनी एक जाहीरनामा काढला. त्याने खालील घोषणा केल्या.
        उमाजी, भुजाजी, येशाजी,  कृष्णाजी यांना पकडून देणार्‍यास प्रत्यकी रोख 5000 व 200 बिघे जमीन दिली जाईल. सरकारला उमाजी बाबत बातमी देणार्‍यास रु. 2500 बक्षीस आणि 100 बिघे जमीन दिली जाईल. प्रत्यक्ष बंडात सामील असणार्‍याने बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातील.
       वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजीची माहिती दिली जात नाही. उलट कलेक्टर च्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा काढला. दिसेल त्या युरोपीयांना ठार करावे. ज्यांची वेतन व तनखे इंग्रजांनी बंद केले आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतणे व तनखे आपण परत मिळवून देऊ.
कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील कंपनीचे नियम धुडकावून लावावेत. अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे. कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये. अन्यथा त्या गावाचा उध्वंस केला जाईल.
               या जाहीरनाम्या नंतर उमाजीने पुणे,  सातारा,  सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा इ. भागात दंगे घडवून आणून इंग्रजांना हैराण केले. साधारणतः 7 महीने हे उठाव सुरू होते. तरीही इंग्रजांनी उमाजीस पकडता आले नाही. 
                 इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 ला पुन्हा जाहीरनामा काढून इनामची रक्कम 10,000 रु रोख आणि 400 बिघा जमीन एवढी केली व बातमी पुरविणार्‍यास 5000 रु. रोख आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी जाहीर केलेली रक्कम व जमीन इतकी मोठी होती की कोणीही आमिषाला बळी पडेल. उमाजीचे जवळचे सहकारी काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशी जवळ आवळस जवळ आणले. नानाने उत्तावेळी येथे 15 डिसेंबर 1831 ला उमाजीला पकडले आणि इंग्रजांनी स्वाधीन केले. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834 ला फाशी देण्यात आली. एका तळागाळातील मराठी नेत्याच्या हा ब्रिटिश विरोधी लढा होता.    
     

Tuesday, April 17, 2018

खोली,खीर,टेबल आणि चमचा..

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.
त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता

त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे  एकमेकांना भरवायला  शिकली आहेत.

आणि त्या खोलीतली माणसे फक्त स्वत: हा कशी खीर खाता येणार हा विचार करत होती”
म्हणून दुःखी आहेत.

गोष्ट संपली.........

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील

स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे  समूह यशाचे गुपित आहे.

यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.

खोली,खीर,टेबल आणि चमचा..

सगळ्यांना समान संधी मिळते.
सर्वांना मदत करा.व प्रेम द्या

मग बघा आपल्या जीवनातील अंतर रंग कसे खुलतात ते..  
                                   
     

Monday, April 16, 2018

मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही!


आता संशोधकांनी म्हटले आहे की, मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळ सुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत.

मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अ‍ॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे कि, हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली.

Saturday, April 14, 2018

बाबासाहेब आंबेडकरांच्या अशाच १० गोष्टीं

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे भाग्यविधाते असे बिरुद मिरवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती. दलित समाजासाठी बाबासाहेबांचा जन्मदिवस हा मोठा उत्सव असला तरी बाबासाहेब हे एक मोठे राष्ट्रपुरुष असल्याने दलितेतरही त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. आज आम्ही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अशाच १० गोष्टींची माहिती देणार आहोत ज्यांच्याबद्दल लोकांना फार काही माहीत नाही.
०१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे कुटूंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेले महारकुटुंब होते. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले, त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत.
०२. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले.
०३. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले.
०४. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनीसातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले.
०५. सातार्‍याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचेआंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले.
०६. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांनाहिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.
०७. भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.
०८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना ही कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती ईश्वरदत्त नव्हे तर आपल्या प्रचंड मेहनतीने मिळाली होती. इ.स. १९१२ मध्ये बी.ए., इ.स. १९१५ मध्ये डबल एम.ए., इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१मध्ये एम.एस्‌‍सी., इ.स. १९२२ मध्ये बार-अॅट-लॉ,इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये एल्‌एल.डी., इ.स. १९५३ मध्ये डी.लिट् आणि इतर अशा सर्व मिळून एकूण ३२ पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केल्या होत्या.
०९. कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली.
१०. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता. तत्त्वज्ञानाचा पाया पक्का असेल तर आपल्याला प्रगतीची मोठी उडी घेता येते, हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. त्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे घेतली, सर्व धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग जाणीवपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

Thursday, April 12, 2018

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द'

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.

माळा (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.

तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.

‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

पागोळं म्हणजे काय?  वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून खाली येतात - ती पागोळी.

‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द. जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी, गायब.

‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.
सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेचः।।

Wednesday, April 11, 2018

न पाहिलेले महात्मा फुले

         ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानले आहे. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही. जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. 



          महात्मा फुले 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महापालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
        जोतीरावांच्या कंपनीने पुस्तक प्रकाशनाचेही काम केले. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी 1865 साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.
              कितीतरी मोठी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. 150 वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

संदर्भ-
1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991

Monday, April 9, 2018

(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती

पदाचे नाव:  

रचना सहायक/कनिष्ठ अभियंता (गट क)
Total: 393 जागा

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 02 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/खेळाडू: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

प्रवेशपत्र: 12 मे  ते 09 जून 2018 

परीक्षा (Online): 09 जून 2018 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2018

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 11 एप्रिल 2018]

अन्नदाता सुखी भव:

आज भाजी मार्केट मध्ये एका शेतकरी दादाकडे काकडी घेत होतो..
किलोचा भाव फक्त १०/- रुपये होता..तितक्यात अजून एक गिऱ्हाईक तिथे येऊन थांबले..
दादा कशी दिली काकडी..??

शेतकरी..१०/- रूपये किलो लावली.... घ्या कोवळी काकडी आहे...
गिऱ्हाईक...पण कडू तर नाही ना...?

अस बोलून त्याने एक काकडी उचलली आणि खायला सुरवात केली..दुसरी एक काकडी उचलली आणि सोबत असलेल्या मुलाच्या हातात दिली...

खाऊन झाल्यावर दादा काकडी खुप गोड आहे हो...
१५/- ला दोन किलो दया ना...!!
बराच वेळ घासाघीस सुरू होती...

शेतकरी काकुळतीला येऊन त्याला सर्व खर्च किती झाला आणि नफा किती झाला हे पटवून सांगत होता.. तरीही हा भाऊ काहीच ऐकण्याच्या मनस्तिथीत नव्हता...

शेवटी न राहून मी त्या शेतकरी दादाला बोललो.. दादा देऊन टाका त्यांना २ किलो काकडी..१०/- रुपये त्यांच्या कडून घ्या राहिलेल्या एक किलोचे १०/- रुपये मी तुम्हाला देतो..

ते गिऱ्हाईक तिरक्या नजरेने माझ्या कडे बघून बोलल ...
काहो भाऊ तुम्ही का अस वाकड्यात बोलताय.. ?

म्हंटल आहो वाकड्यात नाही..सरळ सरळ बोलतोय ..घेऊन टाका तुम्ही काकडी मी देतो ना तुमचे पैसे..!

पण मी घेतलेल्या काकडीचे पैसे तुम्ही का देणार...??

मग मी त्याच्या डोळ्यावरची धुंदी उतरवली...अरे वेड्या माणसा..आल्या आल्या तू  त्याच्या दोन काकड्या उचलल्या आणि खाऊन मोकळा झाला तरी तो शेतकरी दादा तुला काहीच बोलला नाही..

पहिलेच तू त्याची पावशेर काकडी फुकटात खाऊन बसला आणि वरतून १५/- रूपयात दोन किलो काकडी मागतोय...
जसे तुला पोर बाळ आहे तसेच त्या शेतकरी दादाला पण आहेच ना...??
एखाद्या किराणा दुकानात जाऊन बघ ... तुला तो दुकानदार चॉकलेटच्या बरणीत तरी हात घालू देईल का...??

जरा आपल्यावरून जग ओळखायला शिक की भल्या माणसा....

शेवटी त्या निर्लज्ज माणसाने खाली मान घालून  2 किलो काकडी घेतली...खिशातून २०/- रुपये काढले आणि शेतकऱ्याच्या हातात दिले...वरतून फुकटात खाल्लेल्या दोन काकड्या पिशवीतून काडून परत त्या शेतकरी दादाला परत केल्या आणि पुढच्या मार्गाला निघून गेला...

तो निघून गेल्यावर तो शेतकरी दादा माझ्याकडे बघून हसत हसत बोलला..साहेब तुम्ही लै भारी जिरवली हो त्या फुकट्याची...

मग त्या दादाने परत त्याची व्यथा सांगायला सुरुवात केली...
साहेब कालच्याला काकडी खुडाया तीन बाया लावलेल्या व्हत्या ७५०/- रुपये घेऊन गेल्या..
बाजारात गाडीत माल आणला गाडीवाला २००/- घेऊन गेला...

बाजार पावतीवाला आला २०/- रुपये घेऊन गेला…..
सकाळी कामाच्या गडबडीत बायकोने जेवण बनवल नाही म्हणून १ प्लेट भजी खाल्ली तो २०/- रुपये घेऊन गेला..

सकाळ पुन उन्हातान्हात इथं बसलोय माझा रोज ४००/- धरला म्हणजे सगळा खर्च झाला..१३९०/-

आणि समजा मी दिवसभर १००/-  किलो काकडी विकली तर मला भेटणार १०००/- रुपये....

आता तुम्हीच सांगा हे सगळं करून हातात काय पडल...??

म्हणलं ठीक आहे रे दादा ह्यात नाही मिळाल तर दुसऱ्या पिकात मिळेल ...हिम्मत हारू नकोस...

"जान है तो शान है..."

तू फक्त लढ .....एक दिवस आपला पण येईल...
अक्षरशा डोळ्यात पाणी आल होत त्याच्या...

अन्नदाता सुखी भव:

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...