Tuesday, August 27, 2019

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019


        कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी व एम.फील प्रवेशाची 2019-2020 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.यंदाच्या जाहिरातीतून पीएच.डी साठीच्या विविध विषयांच्या 600 जागा व एम.फील प्रवेशाच्या 188 जागा भरण्यात येणार आहे.सदर पीएच.डी व एम.फील प्रवेश परिक्षेचे स्वरूप, अर्ज भरण्याची लिंक, अभ्यासक्रम स्वरूप व परीक्षेची तयारी करण्यासाठी काय वाचावे? याची माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे.
            शिवाजी विद्यापीठाची युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) 18,19 व 20 सप्टेंबर 2019 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 15 ऑगस्ट 2019 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विद्यापीठाच्या
http://online.unishivaji.ac.in लिंकवर भरावेत.तसेच www.unishivaji.ac.in संकेस्थळावरील "M.Phil and Ph.d Admission 2019-20" या लिंकवर प्रवेश परीक्षा माहितीपत्रक व इतर माहिती उपलब्ध असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील
           *परीक्षा फिस*
खुला प्रवर्ग -   850 रुपये
मागास प्रवर्ग -600 रुपये
 
*शिवाजी विद्यापीठ पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा(पेट)स्वरुप*
      युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षा शिवाजी विद्यापीठात घेतली जाणार आहे.पेट परीक्षेत दोन पेपर असून त्यात प्रत्येक पेपर 50 गुणांचा असे एकूण 100 गुणांसाठी परीक्षा घेतली जाणार आहेत.प्रवेश परीक्षेतील गुणांना 70 टक्के महत्व देऊन + मुलाखत ज्ञानास 30 टक्के महत्व आहे, प्रवेश परीक्षेतील गुण व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.पीएच.डी. व एम.फील मुलाखतीत विद्यार्थ्यांचे विषयाचे व संशोधन पद्धतीचे ज्ञान, संशोधनातील आवड व संशोधनविषय क्षमता या आधारे गुण दिले जाणार आहेत.
       पीएच.डी. प्रवेश परीक्षेत दोन पेपर आहेत.या दोन्ही पेपरमधील पेपर एक संशोधन पद्धती (Research Methodology) व दुसरा पेपर विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर विषयाशी संबंधित विषयज्ञानाचा असतो. अभ्यासक्रमाचे स्वरूप सविस्तर समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमाचे सविस्तर अवलोकन करावे.
*पीएच.डी. प्रवेश परीक्षेची तयारी कशी कराल?*
         *पेपर एक - संशोधन पद्धती*
    यातील पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन,आपल्या विषयाशी निगडित संशोधनाचे स्वरूप, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी महत्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.
1.पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.Research Methodology - C.R.Kothari
4.Research in Education-J.W.Best
5.Designs of Social Research - Das, D.K.Lal
6.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
(सदरील सर्व पुस्तके अमेझॉन वेबसाईटवर ,आपल्या जवळच्या दुकानात व कॉलेजच्या ग्रंथालयात मिळतात.)

      *पेपर दोन - विषयाशी संबंधित*
      पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा  पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे.
      *पीएच.डी करिता फेलोशिप*
     पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप  व तसेच महाराष्ट्रातील बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.
  *2021 पासून पीएच.डी. अत्यावश्यक*
     युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे.तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.
(सदर उच्च शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती.)

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...