Tuesday, August 27, 2019

आरक्षण


आधी समतेने देशाला नटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।
आधी जातीभेदाला मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा. ।। धृ ।।

शंकराचार्याचा गादीवरी ।
तिथ तुमचीच मक्तेदारी ।
बहुजन असो विद्वान ।
कधी बसवली का तिथे नारी ।
स्त्री पुरुष भेद हा मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।।1।।

पहा जाऊन पंढरपूरी ।
शिर्डी बालाजी तुळजापूरी ।
म्हणता देवाची लेकर सारी ।
बहुजनांचा हाय का पुजारी ।
आधी भटाला तिथून उठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा.।।2।।

ग्रामपंचायत पालिका निवडणुकीत ।
काय चालवता तुम्ही डोक ।
मोठया हुद्यावर तुमची भरती ।
झाडू माराया आमची लोक ।
झाडू माराया आधी त्यांना पाठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा.।।3।।

श्रीमंताची शाळा भारी ।
आमच्या शाळा उघड्यावरी ।
भारताच्या या भूमि वर ।
विषमता सारी ।
राजा शाहूंचे विचार आठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा. ।

  

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...