"प्रिंस??????" वडील जोरजोरात हाका मारत होते.
प्रिंस पळतच आला व विचारलं, "काय झालं बाबा?"
"तुला माहित नाही आज तुझी बहिण रश्मी येणार आहे ? ती आपल्या सर्वांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार आहे... आता लवकर जाऊन आपल्या बहिणीला घेऊन ये.
आणि ऐक.... तू आपली नवी गाडी घेऊन जा, जी तू काल खरेदी केली आहे.... तिला चांगले वाटेल."
"पण माझी गाडी सकाळीच माझा मित्र घेऊन गेला आहे. आणि तुमची गाडी पण ब्रेक चेक करायचे आहेत म्हणून ड्रायवर घेऊन गेला आहे."
वडील - "ठीक आहे, तर तू कुणाची तरी गाडी घेऊन किंवा भाड्याची गाडी करून स्टेशन वर जा. तिला खुप आनंद होईल."
प्रिंस - "अहो ती लहान आहे का जी येऊ शकणार नाही ? टॅक्सी नाहीतर आटो करून येऊन लागेल. तुम्ही कशाला काळजी करताय ...."
वडील - "तूला लाज नाही वाटत असे म्हणतांना ? घरात गाड्या असूनही घरची मुलगी कुण्या टॅक्सी किंवा आटो ने येईल ?"
प्रिंस - "ठीक आहे, मग तुम्ही जा. मला खुप काम आहे. मी नाही जाऊ शकत..."
वडील - "तूला आपल्या बहिणीची थोड़ीही फिकीर नाहीं ? लग्न झाले तर काय बहिण परकी झाली... आपले सर्वांचे प्रेम मिळवण्याचा तिला हक्क नाही? तुझा जितका अधिकार आहे या घरावर तेवढाच तुझ्या बहिणीचा ही आहे. कोणतीच मुलगी किंवा बहीण माहेर सोडल्यावर परकी होत नाही."
प्रिंस - "पण माझ्यासाठी ती परकी झाली आहे आणि या घरावर फक्त माझाच अधिकार आहे."
तडाक ...अचानक वडिलांनी हात उचलला प्रिंस वर... आणि तितक्यात आई ही आली.
मम्मी - "तुम्हाला काही वाटते का, तरुण मुलावर हात उचलतात का?"
वडील - " तु ऐकले नाही तो काय म्हणाला ते ? आपल्या बहिणीला परकी म्हणतो.... ही तीच बहीण आहे जी याच्या शिवाय एक क्षण ही राहू शकत नव्हती, सतत याची काळजी करायची. तिला खर्चायला दिलेल्या पैशांतून वाचवून याच्यासाठी काही ना काही विकत आणून देत होती. लग्न करून जातांना आपल्यापेक्षा याच्या गळ्यात पडून रडत होती. आणि हा आज तिलाच परकी म्हणतो?"
प्रिंस -(हसत) "आत्यांचा ही आजच वाढदिवस आहे पप्पा... त्या किती तरी वेळा या घरी आल्या पण हमेशा आटो ने आल्या आहेत.... तुम्ही कधीही आपली गाडी घेऊन त्यांना आणायला गेला नाही....
मानले की आज त्यांची परिस्थिती बिकट आहे पण काल त्या पण खूप श्रीमंत होत्या. तुम्हाला, मला, या घराला त्यांनी भरभरून मदत केली आहे.
आत्या ही याच घरातून गेल्या होत्या मग रश्मीदिदी आणि आत्यांमध्ये फरक कसा? रश्मी माझी बहिण आहे तर आत्या ही तुमची बहिण आहेत."
तेवढ्यात बाहेर गाड़ी थांबल्याचा आवाज आला....
तोपर्यंत पापा प्रिंस च्या बोलण्याने पश्चातापाच्या आगीत होरपळून रडायला लागले आणि इकडे रश्मी पण पळत येऊन पप्पा मम्मी च्या गळ्यात पडली... त्यांचे चेहरे बघून तिने विचारलं, "काय झालं पप्पा?"
पप्पा - "तुझा भाऊ आज माझा ही पप्पा झाला."
रश्मी भावाकडे बघून, "ए वेड्या... नवी गाडी ना? खूपच चांगली आहे... मी ड्रायवर ला मागे बसवून स्वतः चालवून आणली आहे आणि रंग ही माझ्या आवडीचा आहे."
प्रिंस - "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदी... ती तुमची गाड़ी आहे आणि आमच्याकडून ही वाढदिवसाची भेट आहे.."
रश्मी हे ऐकताच खुशीने नाचू लागली. तेव्हाच आत्या पण आत आली.
आत्या - "काय दादा तुम्ही पण ना ??? फोन नाही, कळवले नाही, अचानक पाठवून दिली गाडी..... आनंदाने पळतच आली आहे. असे वाटले जसे बाबा आजही जिवंत आहेत...."
इकडे पप्पा आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी प्रिंस कडे पहात होते. प्रिंसने पप्पांना गप्प रहाण्याचा इशारा केला.
इकडे आत्या म्हणत होती, "मी किती भाग्यवान आहे कि मला वडीलांसारखा भाऊ मिळाला, देव करो मला प्रत्त्येक जन्मात तुम्हीच भाऊ म्हणून मिळोत......"
पप्पा-मम्मी ला समजून चुकलं होतं कि ... ही सर्व प्रिंस ची करामत आहे, पण आज परत एकदा नात्यांचा बंध मजबूत होतांना बघून आतल्याआत आनंदातिरेकाने रडू लागले. त्यांना आता पुर्ण विश्वास झाला होता की मी गेल्यानंतर ही माझा प्रिंस नात्यांचा सदैव सांभाळ करेल.....
मुलगी आणि बहीण दोन अनमोल शब्द आहेत. ज्यांचे वय खूपच कमी असते, कारण लग्नानंतर एक मुलगी आणि बहीण कुणाची पत्नी तर कुणाची वहिनी आणि कुणाची सून बनून रहाते._
मुली बहुतेक यासाठीच माहेरी येत असतील की.... त्यांना पुन्हा बेटी आणि बहीण शब्द ऐकायचे खूप मन करत असेल._
No comments:
Post a Comment