शाहूचरित्र वाचताना शाहूराजाच्या अनेक गोष्टी कधी मनमुराद हसवतात तर कधी गांभीर्य आणतात. काही गोष्टी मात्र कायमची स्मरणात ठेवाव्या अशाच आहेत. महाराजांची न्यायनिवाडा करण्याची एक वेगळीच पध्दती दिसून येते. महाराजाना फसवणे एवढे सोपे नव्हते कारण शाहूराजा हा तळागाळातील व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत झाल्याने त्याला व्यवहारातील बरेच खाचाखोचा समजल्या होत्या. माणूस व माणसाचे वर्तन या विषयावर महाराज फारच अचूक अंदाज बांधत असत याची कित्येक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सापडतात. त्यांच्या न्यायदानाची एक अनोखी पध्दती पाहूया....
*कुलकर्णी वतन...एका वटहुकुमानिशी महाराजांनी रद्द करुन टाकली. वतनदार मंडळी महाराजांच्या या निर्णय विरोधात आकांडतांडव करु लागली. लेखी तक्रारी आल्या. मग महाराजांनी कुलकर्णी मंडळीना भेटीसाठी बोलवले. सारे आले. महाराजांनी अत्यंत प्रेमळ भाषेत त्यांना सांगितले की आता जेवणाची वेळ झाली आहे , जेवून घ्या मग बोलू.सर्वानी आनंदानं पंगत लावली. कुलकर्णी मंडळी आकंठ जेवाली, तृप्त झाली. महाराजांनी निरोप पाठविला की थोडी विश्रांती घ्या मग बोलू. मंडळी सुस्तावलीच होती . कोचावर , गालिचावर , जिथे मिळेल तिथे मंडळी विसावली. दोन तास निघून गेले. जागे झाल्यावर सर्वानी चुळा भरल्या. अंगावरचे कपडे साफ केले. सामुहिक पध्दतीने महाराजांच्या भेटीला गेले. " जेवण ठीक होत ना " महाराजांनी विचारले . होय अस उत्तर आले. " विश्रांती वगैरे मिळाली ? महाराजांनी पुन्हा विचारले. " भरपूर महाराज " असे उत्तर आले. महाराजांनी सांगितलं " मग या आता " असे म्हणून महाराज जायला उठले. तेव्हा कुलकर्णी मंडळी म्हणाली महाराज , आमच्या गाह्राणीच काय ? महाराज पटकन उत्तरले " वाचलीत आम्ही . खोटं लिहिलय तुम्ही मंडळीनी. वतन गेल्यावर तुमच कुणाच काही नुकसान झालं नाहीय. नुकसान झालं असत तर तुम्हाला जेवण रुचल नसत आणि विश्रांतीही आठवली नसती. राम राम !" असे बौलून महाराज निघून गेले...........काही कळले का यातून ?? शाहूराजा हा मूळातच तळागाळाशी जोडलेला असल्याने त्याला " भाकरी तुटलेवर होणारी गरीबाची तळमळ ठाऊक होती. गरीब कासावीस होतो. भूक हरपते आणि विश्रांतीची बातच नसते. कुलकर्णी मंडळी बाबतीत यातील काहीच दिसले नाही. महाराज चाणाक्ष होतेच पण व्यवहारी वास्तववादी होते. ' डोळे झाकून ' राज्य करणारे निश्चितच नव्हते.*
आपल्या समोर आलेल्या समस्याबाबतीत नेमकी मेख काय आहे हे ज्याला कळते तिथे बहुजन रयत सुखी असते. कारण त्यांच काळीज जाणणारा राजा असतो तिथे. ढोंगी लोकांना कसे ओळखावे आणि त्यांच्याशी व्यवहार कसा करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे....शाहूचरित्र हेच तर शिकवते.
*!! वास्तववादी व्यवहारच....योग्य न्याय करु शकतो !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment