Friday, March 2, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग 5 : हेनरी फोर्ड

              लांब अंतर वेगाने कापणाऱ्या चमकदार मोटारसायकली,मोटारगाड्या जवळ असणं हे आज एकप्रकारचे status symbol बनले आहे. कारण आजचे जीवन वेगवान झालेलं आहे.  जीवनशैलीच्या या वेगाला हेनरी फोर्डने चारचाकी गाड्या निर्माण करून काही प्रमाणात सोपे केले. संपूर्ण जगात कार लोकप्रिय होण्यासाठीचे श्रेय हेनरी फोर्डला जाते.



             आजच्या या नवीन युगाला औद्योगिक युग बनवण्याचे काम करणाऱ्या या अवलीयचा जन्म अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डिअर बोर्ध येथे 30 जुलै 1863 रोजी झाला. हेन्रीला आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असणारे सर्व गुण, त्याच्या आई कडून मिळाले. मेरीलिटोगोट हे त्यांच्या आईचे नाव होते. हेनरीचे वडील, विलायम फोर्ड हे एक सामान्य शेतकरी होते.
            वयाच्या पाचव्या वर्षी हेनरीने घरापासून जवळच्या शाळेत प्रवेश घेतला होता. पाचवी इयत्ता पास केल्यानंतर, हेनरीला पुढील शिक्षणासाठी घरापासून सुमारे तीन किलोमीटर चालत जावे लागे. वडिलांची अशी इच्छा होती की हेनरीने एक चांगला शेतकरी बनावे, पण हेनरी दुसऱ्याच विचारामध्ये व्यस्त राहत.  लहान वयात त्यांनी शेजारील लोकांची घड्याळे दुरुस्त करून देण्यास सुरुवात केली. ही गोष्ट त्यांच्या वडिलांना फारशी आवडलेली दिसत नव्हती.
                जेव्हा  हेनरी मिशिगन राज्यातील शाळेत शिकत होता, तेव्हा त्याने खाडीमध्ये एक बांध निर्माण केला अडथळा निर्माण केला होता, त्यामुळे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले, त्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आणि तो शेतकरी हेनरीच्या शिक्षकांकडे तक्रार करण्यासाठी शाळेत पोहोचला. शिक्षकांनी तो बांध बघितला ते हेनरीच्या बुद्धिमत्तेबद्दल आश्चर्यचकित झाले, परंतु शेतकर्याला तोटा झाला होता, म्हणून त्यानी हेनरीला तो बांध तोडून टाकण्यास सांगितले. आणि शेतकर्ऱ्याला संतुष्ट करण्यासाठी हेनरीची खरडपट्टी काढली.

हे पण वाचा : नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग १: वॉल्ट डिस्ने
               हेनरी फोर्ड यांनी सुरुवातीच्या काळात घड्याळे दुरुस्त केली, त्याने मोटारगाड्याच्या शोधात आणि त्यात आधुनिक सुधारणा करण्याTच्या कामात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली . वडिलांच्या इच्छेविरुद्ध, हेनरी डेट्रॉईट येथे राहायला गेले आणि एका कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली, परंतु तिथून मिळालेल्या उत्पन्नातून गाडीची निर्मिती करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. नंतर त्यांनी अर्धवेळ कामगार म्हणून एका सोनारकडे काम करण्यास सुरुवात केली आणि संध्याकाळी ते घड्याळ दुरूस्तीचे काम करत. डेट्रॉईटमध्ये राहताना, एक संदेश आला की वडिलांची तब्येत बिघडली आहेत्यामुळे ते घरी परतले. घरची व शेताची संपूर्ण जबाबदारी आता हेनरीच्या खांद्यावर पडली होती.
                    हेनरी वर्षाभर शेतात काम करीत राहिले. हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की शेतीच्या कामात खूप वेळ लागतो, मग त्यांनी विचार केला की शेतीच्या कामात आपण विज्ञानाची मदत घेतली तर काम कमी वेळात पूर्ण होईल . त्या दिवसात ट्रॅक्टर्सचा शेतीसाठी वापर देखील होत नव्हता. शेतीमध्ये वापरलेल्या वाफेचच्या इंजिनामध्ये हेनरी सुधारणा केली. आणि जवळपासच्या शेतक-यांचे वाफेचे इंजिन सुधारण्यासाठी काम करणे सुरु केले. हेनरीच्या प्रयत्नांमुळे, अशी पद्धती विकसित झाली त्यामुळे वर्षभराचे काम एक महिन्यातच पूर्ण होऊ लागलेे. दरम्यानच्या काळात , तो एका इंजिन निर्मिती कंपनीच्या प्रतिनिधीशी भेटला आणि त्या प्रतिनिधीने त्यांना संपूर्ण परिसरातील कंपनीचे इंजिन सुधारण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी हेनरीला एक करार करून दिला.
                 हेनरीने ट्रेक्टरची कल्पना केली आणि घरी एक सिलेंडर बनवला. सिलेंडरमध्ये एका निरुपयोगी गवत कापण्याच्या मशीनची चाके जोडली आणि पहिली गाडी सुरू केली. गाडी सुमारे चाळीस फूट अंतर पार करून थांबली. हा प्रयोग सर्वसामान्य लोकांच्या नजरेत यशस्वी झाला नाही, परंतु हेनरीला विश्वास होता की जर आज गाडी 40 फुट चालू शकली असेल तर उद्या ती खूप दूरचे अंतर पार करील. हेनरीचे मोटारगाडीचे स्वप्न सत्यात उतरू लागले. 1891 साली ते डेट्रॉइट येथे परत आले. ते रात्रीपाळी मध्ये एलिस लाइटिंग कंपनीत काम करण्यास सुरुवात केली आणि  दिवसा ते त्यांची मोटारगाडी तयार करण्याचे काम करत, लोक त्यांच्या या कामावर टीका करीत . पण लोकांच्या टीकाटिप्पणी कडे दुर्लक्ष्य करून त्यांनी आपले काम सुरू ठेवले. व दोनच वर्षांत कार तयार केली.



                  एप्रिल महिन्याचे दिवस होते. हेनरी, त्याच्या पत्नी क्लारासह, स्वतः तयार केलेल्या गाडीत बसून बाहेर येतो. या नव्या गाडीत टायर व बसण्यासाठी तयार केली गाडीची सीट हे दोन भाग सोडले तर सर्व भाग हेनरीच्या शोधाचे परिणाम होते. गाडी प्रचंड आवाज न करत गल्लीतून बाहेर पडली. लोक आवाज ऐकताच घराबाहेर आले ते ,घोड्याविना धावणारी गाडी प्रथमच त्यांनी प्रथमच पहिली होती. या यशानंतर फोर्डचा आत्मविश्वास वाढला. त्यावेळी त्या गाडीत बॅक गियर नव्हता, जरी ही गाडी आजच्या गाड्यासारखी नव्हती, तरीपण तिला सर्व गाड्याची जननी म्हणता येईल.
                  यानंतर, हेनरी फोर्डने गाडीमध्ये अनेक सुधारणा केल्या. कार तयार करण्यासाठी, कारखाना उघडला . श्रीमंत घरातील लोक कार विकत घेऊ लागले. हेनरी फोर्डची कल्पना प्रत्यक्षात आली. त्याने असे म्हटले होते की या प्रयोगाद्वारे पैसे कमावण्याचे त्याने कधीही स्वप्न पाहिले नाही. परंतु आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.

हे पण वाचा : नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं: भाग २: स्टीव्ह जॉब्स

              फोर्ड कंपनीचे  कारखाना तब्बल 200 एकर क्षेत्रावर पसरला आहे. त्यात पाचशे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्यात हजारो लोक काम करतात. एडिसनसारखे अनेक संशोधक हे त्यांचे मित्र होते. हेनरी फोर्डने मानवी कल्याणासाठी कमावलेल्या उत्पन्नाचा काही भाग खर्च  केला.
               7 एप्रिल 1947 रोजी, वयाच्या 83 व्या वर्षी हेनरी फोर्ड यांचे निधन झाले. आजही जग त्यांच्या शोधाचा लाभ घेत आहे. हेन्री फोर्ड यांनी हे सिद्ध केले की, कठोर परिश्रम, धैर्य व सातत्याने काम केले तर कोणतेही काम यशस्वी होऊ शकते.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...