Thursday, March 8, 2018

Happy women's day

ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ 
तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय 
एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय

सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते 
जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते
तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते
ऑफिसची कामे तरीही सांभाळते तारेवरची कसरत करते
सगळे झोपल्यानंतर कळते आता थोडे दुखताय पाय 
तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय 
एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय 

घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते 
अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते 
मी एव्हरेस्ट सर करतेमी लेक्टर कित्येक देते 
मी थिरकते मी बावरते मी गाते मी नाचते 
मीड जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी आणि मीच ती उरणारी
मी सृष्टी व्यापणारी, मी असल्याने तु आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत
मी जे करायचे नाही त्याची यादी तु केलीस 
आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस
वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे 
तरीही आमच्याबाबत तुमचे विचार मात्र वेगळे
निसर्गाने ठेवलाय फक्त तेवढाच फरक राहु द्या 
बाकी सगळ्या बाबतीत खांद्याला खांदा हारु द्या 

सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती होऊन 
इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय 
कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई होण्याची किंमत काय 

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...