अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा . इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे.इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे.तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता. लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता .
५ वर्षाचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती .या घटनेचा त्याच्या मनावर खोल परीणाम झाला आणि निश्चय पूर्वक तो विवेकी बनला.
अल्बर्ट यांची आई बुद्धिमान होती.वडील अभियंते होते.अल्बर्ट यांच्या वडिलांचा एक कारखाना होता.
अल्बर्टच्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होका यंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले . त्यावेळी तो जेमतेम ६ वर्षाचा होता. गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो ? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत ? या सारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला.या संबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे.
अल्बर्ट अभ्यासात तो खूप हुशार होता.वयाच्या १० व्या वर्षात अल्बर्ट स्वतःच गणित शिकू लागला.शाळेचा ठरलेला गृहपाठ झाला कि अल्बर्ट गणितातील कोडी सोडवत बसत असे.
जर्मन कायद्या प्रमाणे अल्बर्ट ला घरच्या घरी धर्म शास्त्राचे शिक्षण मिळाले.आइनस्टाइन कुटुंब ज्यू धर्माचे होते.घरी धार्मिक आचार विचार काटेकोरपणे पाळले जात .परंतु ज्या परमेश्वरावर विश्वास ठेव असे त्याचे शिक्षक नेहमी सांगत त्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वयाच्या १२ व्या वर्षीच पूर्ण पणे उडाला .
या दरम्यान अल्बर्ट च्या आई वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिच मधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले.अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला.परंतु वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई वडिलांकडे इटलीला गेला.
अल्बर्टला युद्ध , रक्तपात ,हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुस-याला मारणा-या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली. अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता.जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही.शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली.त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला.अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरु ठेवले.अल्बर्ट च्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या .
याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले .
E = mc²
उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जग प्रसिद्ध सूत्र .
यात कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगा पेक्षा ज्यास्त वेगाने जात नाही…. हे या सूत्राने स्पष्ट पणे दाखवून दिले .अल्बर्ट आइनस्टाइन यांनी न्युटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढलाच पण प्रत्तेक व्यक्तीगणित काळ व्यय वेगळा असतो आणि ती व्यक्ती किती जलद अथवा मंद गतीने हालचाल करीत आहे यावर काळव्यय किती होणार ते अवलंबून असते.उदाहरणार्थ –जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणा-या यानात बसून काही अंतराळवीर अवकाशात गेले तर त्या अंतराळवीरांच्या दृष्टीने ,त्यांचा काळव्यय पृथ्वीवर मागे राहिलेल्या माणसांपेक्षा कमी गतीने होईल .अर्थात नेहमीच्या गतीने जाणा-या माणसांसाठी न्युटनचा नियमही लागू पडतो.काही वस्तू प्रकाशाच्या वेगा इतपत वेगाने जावू लागल्या तर त्या आहेत त्या पेक्षा मोठ्या भासतील आणि त्यांच्या वस्तुमाना मध्ये प्रचंड वाढ होईल असे आइनस्टाइन यांनी प्रतिपादन करून गणिताच्या आधारे ते सिद्ध केले.
त्यांचा हा नवा सिद्धांत मान्य करणे तत्कालीन शास्त्रज्ञ समूहाला खूप अवघड होते आणि त्यांचे सिद्धांत चटकन समजतही नसत.
अणु बॉम्ब चा स्फोट ……!
अणु भंजन करून खूप मोठी संघटक शक्ति मुक्त होईल याची जाणीव आइनस्टाइन यांनी जगाला करून दिली.आधुनिक याने, अंतराळातील होणारे प्रयोग याचे खरे जनक आइनस्टाइन हे आहेत हे संपूर्ण जगाने मान्य केले.Run away reaction हि रसायन शास्त्रातील स्फोट घडवणा-या प्रक्रियेला आइनस्टाइन यांच्या मुळे चालना मिळाली.प्रचंड वेगाने याने पृथ्वीचा तळ सोडण्यासाठी आणि पृथ्वीचे आवरण फोडून अवकाशात झेप घेण्यासाठी लागणा-या उर्जेचे , वेळेचे आणि गतीचे गणित आइनस्टाइन यांच्या सिद्धांताने सुटले . आज त्याचीच गोड फळे आपण चाखत आहोत.
हिटलर आणि आइनस्टाइन —
जर्मनी हि श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू , जिप्सी ,किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला .अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले.या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन याने आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले.१९३९ साली त्यांनी अमेरिकेच्या रूझवेल्ट या अध्यक्षांना पत्र लिहिले .अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रूझवेल्ट यांना सांगितले.१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले.१९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली . जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते.
खरे तर आइनस्टाइन हे शांततेचे भोक्ते होते.त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच २ -या महायुद्धा नंतर आइनस्टाइन यांनी ज्या देशांनी अणू अस्त्र बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत या साठी आइनस्टाइन यांनी जोरदार मोहीम उभारली.आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइनस्टाइन यांना होते . अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ‘ विवेक ‘ आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देवून बसलो याची खंत करीत असे.अणू शक्तीच्या दुष्परिणामाची जाणीव त्यांना झाली होती. जगाची हानी टाळण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान अतिशय कडक नियंत्रणा खाली ठेवले पाहिजे असा इशारा त्यांनी सर्व जगाला त्याच वेळी दिला होता.१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राण ज्योत मालवली.
No comments:
Post a Comment