Tuesday, May 29, 2018

HSC Examination Result March 2018

Latest Announcement

HSC Examination Result March 2018

To be announced on May 30, 2018 at 13:00 Hrs.

Click on following mharesult Link to see HSC Examination Result March 2018

http://mahresult.nic.in

Sunday, May 27, 2018

खरे दोषी आपण आहोत .

खरे दोषी आपण आहोत .

आधी आसाराम ...
मग रामपाल ..
मग राधे माँ ...
आणि
आता राम रहीम ..
नावं बदलतायत ... प्रवृत्ती तीच ...

पण मी यातल्या कुणालाच दोष देणार नाही ,त्यांच्या पुढ्यात वाढलेलं ताट आलं - त्यांनी ओरपलं ..

प्रश्न हा आहे .. ताट वाढलं कुणी ..?

यांच्या पायांवर करोडोच्या राशी ओतल्या कुणी .. ?

यांच्या पुढ्यात आपल्या स्त्रीत्वाचा लिलाव मांडला कुणी .. ?

गादीची मस्ती आणि पैशाचा माज यावा .. इतकं मोठं यांना केलं कुणी .. ?

कुणी यांच्या भोंदू भाषणांना गर्दी केली ... ?

कुणी यांची पदकं गळ्यात मिरवली ... ?

कुणी यांच्या नावानं आरत्या आणि भजनं रचली ... ?

यांच्या विरोधात ब्र जरी काढला तरी धर्म बुडाल्याची आरोळी कुणी दिली?

ज्यांनी ज्यांनी हे केलं .. तो प्रत्येक जण दोषी आहे .. 

अक्कल गहाण ठेवून ज्यांनी ज्यांनी यांच्या पायावर डोकी ठेवली ... तो प्रत्येक जण दोषी आहे ..

ज्यांनी या सैतानांमध्ये देव पहिला ... तो प्रत्येक जण दोषी आहे ..

शिकली सावरलेली ... जुनी जाणती माणसं ...   नेटच्या जगात लीलया वावरणारी माणसं ...  ती जेव्हा असल्या लोकांच्या नादी लागतात .. तेव्हा नेमकी काय मानसिकता असते त्यांची ?कसली भीती वाटत असते त्यांना ? कसलं फ्रस्ट्रेशन असतं ?  कुठलं अपयश त्यांना या असल्या 'कुत्र्याच्या छत्र्यांना' खतपाणी घालून 'महावृक्ष' बनवण्याची बुद्धी देतं ?

बाजारात दहा रुपयांची कोथिंबीर घेताना काडी नि काडी तपासून पाहणारी सुशिक्षित नि समंजस बाई .. या बुवाबाबांसमोर लोटांगण घालताना त्याची किमान लायकी आणि नियत समजून घेत नाही ? 

गाडी घेताना चार चारदा ट्रायल घेणारा आणि मोबाईल - लॅपटॉप ला रॅम / मेमरी / हार्डडिस्क पाहिल्याशिवाय हात न लावणारा आमचा सो कॉल्ड बुद्धीमान समाजपुरुष या बुवा आणि मातांच्या पायांवर पडताना किमान गॅरंटी तपासून पाहत नाही ... केवढा मोठा दैवदुर्विलास .. !

प्रॉब्लेम काय आहे माहितीय ?
आम्ही आमची भक्ती आणि श्रद्धा खूप स्वस्त करून टाकल्यात ..   त्या कुणावरही उधळून देण्याचा मूर्खपणा आम्ही ठायी ठायी करतोय .. देवाचे ठेकेदार दुकानं मांडून बसलेयत .. धर्म नावाची अफू रोज नव्यानं आमच्या मेंदूत इंजेक्ट करतायत ..
आणि आम्ही ..
आम्ही बुद्धीला अर्धांग वायू झाल्यासारखे या भगव्या .. पांढऱ्या .. आणि हिरव्या कफन्या घातलेल्यांना शरण जातोय .. जोपर्यंत सर्वसामान्य माणूस सारासार विचार शिकत नाही .. बुवा .. बाबा .. मातांचा हा दुष्ट जागर असाच होत रहाणार .. स्वतःला कृष्णावतार म्हणवणारे 'दुःशासन' द्रौपदींची वस्त्रं फेडत रहाणार ..   संत म्हणवणारे हे जंत समाज पोखरत रहाणार ..
आणि
त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार कुणालाच असणार नाही .. कारण नादान भक्तांनी पोसलेली ही विषवल्ली आहे ..
हिचं विष पुढच्या दहा पिढ्या नासवणार आहे ..  आणि हे हलाहल प्यायला महादेव येणार नाही ...  कारण हे राक्षस त्याच्या वरदानानं नाही .. आमच्या सर्वस्व दानानं माजले आहेत ..   ही आमची कर्म आहेत ..
आम्हाला देव कळला नाही .. संत कळला नाही .. मातीतल्या तुकारामाऐवजी आम्हाला डायसवरचा राम रहिम/आसाराम जवळचा वाटला .. आम्ही त्याची पालखी पुजली ..
आणि देवाशपथ .. तिथेच आम्ही माती खाल्ली .
याचा विचार तर कराल?

Saturday, May 26, 2018

गगनदीप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज

गगनदीप सिंग. उत्तराखंडच्या पोलीस दलातले एक सब इनस्पेक्टर. एरवी त्यांची कोणी कशाला दखल घेतली असती? पण ते एका कठीण प्रसंगात जसे वागले तसं एखादा सुपरहिरोच करू शकतो. ज्याच्यात माणुसकी आहे अशी कोणतीही चांगली असं वागण्याचा विचार करू शकली असती. गगनदीप सिंग मोठे ठरले कारण त्यांनी फक्त विचार केला नाही, ते तसे वागले!



काय झालं नेमकं?
एका मुस्लीम मुलाला गगनदीप यांनी समाजकंटकांच्या तावडीतून वाचवलं. त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पाहिली की किती मोठं धैर्यं दाखवलं हे समजतं. 

खरतर अशी परिस्थितीच निर्माण व्हायला नको होती. पण गेल्या काही काळात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गगनदीप यांनी दाखवलेलं धाडस सकारात्मक विचार करण्यास भाग पाडतं. गगनदीप यांचा हा व्हायरल झालेला फोटो प्रेरणादायी आहे, असंच म्हणावं लागेल.
अर्थात, हे असं चित्रं एक दोन दिवसात तयार होत नाही. वाईट काळात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तयार झालेलं हे दुर्मीळ चित्र आहे. मानवी सामर्थ्याचं उत्तुंग दर्शन घडवणारं ही घटना आहे.
Image copyrightFACEBOOK/GAGANDEEP
याआधी असंच एक आशादायी चित्र दिसलं. दोन मुस्लीम युवक आपला रोजा तोडून रक्तदान करण्यासाठी गेले. गोपालगंजचा आलम जावेद आणि डेहराडूनचा आरिफ ही त्या दोघांची नावं.
तथाकथित संस्कृतीरक्षकांचा हल्ला
नैनीताल जिल्ह्यातील रामनगर येथे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कजवळ एक मंदिर आहे. मंदिरालगत एक नदी वाहते. त्या नदीच्या किनाऱ्यावर प्रेमी युगुल बसलेली असतात.
एक मुस्लीम युवक आपल्या हिंदू मैत्रिणीसोबत तिथं बसलेला होता. त्या वेळी हे तथाकथित संस्कृतीरक्षक तिथं आले आणि त्यांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली.
ते त्याला मारून टाकतील अशीच परिस्थिती होती. पण तितक्यात तिथं गगनदीप आले आणि त्यांनी त्या जमावापासून त्याचं रक्षण केलं.
Image copyrightFACEBOOK/GAGNDEEP
हे चित्र आपल्याला भावूक करतं पण त्याबरोबरच आपल्या निद्रिस्त असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीस जागवण्याचं कामही करतं. तसंच या जमावखोरांविरोधात लढण्याची प्रेरणा देतं.
गगनदीप यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. योगायोगानं ते घटनास्थळी ड्युटीवर होते. त्यांचं मते, त्यांनी काहीही विशेष केलेलं नाही. फक्त त्यांचं कर्तव्य पार पाडलं. ते सांगतात त्यांचं पहिलं उद्दिष्ट त्या मुलाला जमावापासून वाचवणं हेच होतं आणि त्यांनी तेच केलं.
तो मुलगा नशीबवान म्हणून त्याला गगनदीप भेटले. नाहीतर त्याचं काय झालं असतं याचा केवळ विचार आला तरी अंगाला कंप सुटतो. जमाव आपला पाठलाग करत आहे. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरुपात. कधी कधी तर असं वाटतं की जमाव ड्रोनसारखं पाहतोय आपल्याकडे!
गगनदीपसारख्या अधिकाऱ्यांची गरज
उत्तराखंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा अनेक घटना टळल्या आहेत. उधमसिंहनगर, कोटद्वार, सतपुली आणि मसुरी या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना टाळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
पण वाढत्या घटनांचं प्रमाण बघता गगनदीप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असं वाटतं.

Tuesday, May 22, 2018

शंकरराव बोरकर

मित्रांनो! ही माझ्या जीवनातील सत्यकथा आहे. साधारणतः मी वीस-बावीस वर्षांचा असेन. मी मुंबईतील एका खासगी कंपनीत टेक्निकल रिप्रेजेंटेटिव्ह होतो. पगार बेताचाच होता. कंपनीने स्कूटरही दिली होती. एकदा असे झाले, मला पुण्याला कंपनीने पाठविले. तिथे कोथरूडला किर्लोस्कर कंपनीचे आर.एन.डी. रीसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये काम होते. ते काम मी दिलेल्या वेळेत पूर्ण केले; परंतु किर्लोस्कर कंपनीकडे आणखी एक्स्ट्रा काम निघाले, ते काम अडीच ते तीन लाखांचे होते आणि ते काम पंचेचाळीस दिवसांत पूर्ण करावयाचे होते, कारण तिथे जर्मन इंजिनीअरचे शिष्टमंडळ येणार होते. किर्लोस्कर कंपनीने माझ्या कंपनीला विचारले, हे काम कराल का? पण माझी कंपनी म्हणाली, आम्ही काम करू, पण 45 दिवसांत नाही. त्याला कमीत कमी तीन महिने लागतील. किर्लोस्कर कंपनीच्या इंजिनीअरला काही सुचत नव्हते. त्यांनी मला सहज विचारले की, बोरकर, तुम्ही स्वतः हे काम करता का? मी त्यांना सांगितले, उद्या सांगतो. ते स्वतः काम करावयाचे झाल्यास मला माझ्या नोकरीचा प्रथम राजीनामा द्यावा लागणार होता. नंतरच मला स्वतःला काम करता आले असते. काय करावे हे समजत नव्हते, तरी पण घरातील वडीलधार्‍या माणसांचा व मित्रांचा सल्‍ला घ्यावा, असे मला वाटले. म्हणून मी माझ्या एक-दोन मित्रांना विचारले, काय करू? त्यांनी नोकरी सोडू नको, असे सांगितले. आमच्या परिवारातील एका सुशिक्षित प्राध्यापकाला विचारले, मी काय करू? त्यांनीही वरीलप्रमाणे सल्‍ला दिला. चांगली नोकरी आहे, कंपनीने स्कूटरही फिरण्यासाठी दिली आहे, पगारपण चांगला आहे, नोकरी का सोडतो? काय करावे हे समजत नव्हते. नवीन व्यवसाय करावा की नोकरी, हे माझ्यापुढे धर्मसंकट होते. मी पुण्यात डेक्कनला राहात होतो. संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी आलो व हात-पाय धुऊन शांतपणे बसलो होतो. काय करावे हे समजत नव्हते. डेक्कनपासून जवळच जंगली महाराजांचा मठ एका टेकडीवर आहे. त्या ठिकाणी जावे असे मनात आले. स्कूटर घेतली व सरळ मठ गाठला. स्कूटर खाली रस्त्याच्या कडेला उभी केली. वर टेकडीवर असलेल्या जंगली महाराजांच्या मठातील मंदिरात गेलो. दर्शन घेतले व पुढील सभा मंडपात शांतपणे बसलो. मनात सारखे नोकरी सोडावी का सोडू नये, या विचारांचं भूत नाचत होतं. थोड्या वेळाने तेथील पुजारी माझ्या जवळ आले आणि मला विचारलं, काय, कसली चिंता करतोस? काय घरी वाद वगैरे झाला आहे का? मी त्या पुजार्‍याला सांगितलं नाही. महाराज, मी वेगळ्याच संकटात आहे. मला एक चांगली नोकरी आहे, पण मला एक चांगली संधीही आली आहे, व्यवसाय करावयाची. काय करावे ते समजत नाही. त्या पुजार्‍याला वरील सर्व घटना सांगितली. व्यवसायाची संधी आहे, पण घरातील सुशिक्षित माणसांचा व्यवसाय करावयाला विरोध आहे. तसेच माझे मित्रही माझ्या व्यवसायाला विरोध करतात. मी काय करू ते समजत नाही, असे मी म्हणताच सरळ पुजारी माझ्या समोरून उठला व मंदिरात गेला. थोड्या वेळात परत आला व त्याने माझ्या हातात एक नारळ, देवाचा हार व प्रसाद दिला व म्हणाला, “बाळ, तू जा. नोकरी सोड व व्यवसायाची आलेली संधी सोडू नकोस. व्यवसायात काय फायदा व तोटा होतो हे मला माहीत नाही, पण चांगले कर्म करून प्रामाणिकपणाने व्यवसाय केला तर देव त्याला फळ देतो. बाळ, तुला माहीत आहे का, भगवद‍्गीतेतही म्हटले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मः फलेषू कदाचनः कर्मफलेहेतूर भुर्मः ते संगोस्त्वकर्मानी॥ चांगले कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफळास तू एक कारणीभूत आहेस, असे कधीही समजू नकोस व कर्तव्य न करण्यामध्येही तू कमी पडू नकोस. कर्माला परमेश्‍वर मान. कर्म हेच परमेश्‍वर, हे तू लक्षात ठेव. कर्मावर निष्ठा ठेव व काम करत राहा. तुला फळ मिळतच राहणार.” असा मोलाचा सल्‍ला त्या पुजार्‍याने दिला. मी मंदिरातून घरी आलो, जेवण करून झोपी गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच उठलो व मी किर्लोस्कर कंपनीकडे निघालो. स्कूटर चालवत असताना माझ्या मनात अनंत विचार येत होते. रस्त्यातून येताना कोथरूड रोडला गरवारे कॉलेज लागले. नंतर एस.एन.डी.टी. कॉलेजनंतर रस्त्याच्या मधोमध गणपतीचे मंदिर होते. त्याच्या थोडं पुढे दगडाची मोठी खदान आणि त्या खदानी बर्‍याच दिवसांपासून बंद झालेल्या होत्या. त्या खोदलेल्या खदानात काळ्या दगडाचे भिंतीसारखे पाषाण होते आणि त्या दोन पाषाणांच्या फटीमध्ये हातभर असे पिंपळाचे रोपटे होते. लुसलुशीत असं लाल पान हलून जगाला सांगत आहे की, काय या पाषाणाच्या माथ्यावर पाय ठेवून त्या पाषाणाला सांगत होते की काय, हे पाषाणा, तू कितीही कणखर असलास तरी तुझ्या माथ्यावर पाय ठेवून या जगाला सांगतो आहे की, मला ताठ मानेने जगायचे आहे. मला जगाला माझी हिंमत व आत्मविश्‍वास दाखवायचा आहे. वायूसोबत हलायचे आहे, असे सांगत असावे, असा विचार माझ्या मनात आला. एक इवलेसे रोपटे या पाषाणाच्या फटीतून उभे राहून ताठ मानेने जगत आहे, मग आपणही का नको, असा विचार मनात आला. मी निश्‍चय केला की, आज नोकरी सोडायची व नवीन उद्योगाला सुरुवात करायची. हा विचार करत-करत किर्लोस्कर कंपनीच्या गेटमध्ये कधी आलो ते मला कळलेच नाही. माझ्याकडे पास असल्यामुळे मला गेटवर कोणी अडवले नव्हते. मी आत गेलो, पण किर्लोस्कर कंपनीचा एकही ऑफिस स्टाफ व इंजिनीअर आलेले नव्हते; कारण मी सकाळी ७.३० वाजताच पोहोचलो होतो. सर्व स्टाफ ९.०० वाजता येतो व मी माझ्या धुंदीत होतो. मला वेळेचे भानच नव्हते. बस्स्! विचार करता करता काम कसं आहे, ते पाहण्यासाठी मी रीसर्च अ‍ॅन्ड डेव्हल्प्मेंटच्या रूमकडे गेलो. तिथे सिव्हिल काम जोरात चालू होते. माझं काम त्या रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटच्या केबिनमध्ये, मोठे किर्लोस्करचे नवीन इंजिन बसवत त्यावर वेगवेगळ्या चाचण्या घेत व नंतरच त्याला बाहेर मार्केटिंगसाठी पाठवीत. किर्लोस्करने नवीन पद्धतीचे मोठे इंजिन विकसीत केले होते आणि त्या रीसर्च अ‍ॅन्ड डेव्हल्प्मेंट सेंटरमध्ये चाचणीसाठी आणणार होते. ज्या ठिकाणी इंजिनची चाचणी करणार होते. त्या ठिकाणी मात्र साऊंडप्रूफ ग्लास गॅस्केटची केबिन बनवायची होती. मोठा आवाज बाहेर येऊ नये म्हणून त्यामध्ये डबल ग्लास तिरप्या पद्धतीने बसवावे लागते. त्याला स्पेशल असे रबर गॅस्केट असते आणि त्यात असणारे ग्लेजिंग हे ट्यूब टाईप असते आणि त्यात मी तरबेज व निपुण होतो. माझं ते डाव्या हाताचं काम होतं. त्या वेळी माझं वय फक्त २०-२२ वर्षे होते. कामाच्या जिम्मेदारीत मी लहानपणीच प्रौढ कधी झालो हे मला समजलेच नाही. सिव्हिल काम पाहता-पाहता ९ कसे वाजले हे मला कळलेच नाही. कंपनीच्या ऑफिसमध्ये सर्व स्टाफ आला होता. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर श्री. जोशी हेही आले होते. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना सांगितले की, आज मी नोकरी सोडत आहे. आपण मला तुमच्या कंपनीची वर्क ऑर्डर द्या. ते म्हणाले की, तुमच्या लेटरपॅडवर प्रथम टेंडरप्रमाणे कोटेशन द्या. ते मी आमच्या एम.डी.कडून पास करतो व नंतर तुम्हाला ऑर्डर देतो. मी हो म्हणालो व त्यांना पेमेंटबद्दल विचारले व त्यांनी मला सांगितले की, आम्ही अ‍ॅडव्हान्स कोणालाही देत नाही, पण मटेरियल येथे आल्यानंतर सत्तर टक्के अ‍ॅडव्हान्स देऊ. काम जवळ-जवळ अडीच ते तीन लाखांचे होते. त्यात आणखी एक्स्ट्रा काम निघणार होते. मी जोशींना काम करतो, मी आपणास कोटेशनही देतो, असे म्हणालो व तेथून कोटेशन टाईप करण्यासाठी डेक्कनला आलो. कंपनीचे नाव काय ठेवावे काही समजत नव्हते. डेक्कनला टाईपवाल्याकडे आलो. त्या ठिकाणी माझ्यापुढे दोन व्यक्ती उभ्या होत्या. मी त्या टाईपवाल्याला विचारले की, किती वेळ लागेल. तो म्हणाला की, आणखी २५ मिनिटे लागतील. मी त्याला माझे नाव दिले व चहा घेऊन येतो म्हणून जवळच असलेल्या इराणी हॉटेलमध्ये गेलो. चहाची ऑर्डर दिली व टेबलावर पडलेले वर्तमानपत्र चाळीत होतो. त्यात एक बातमी होती. एव्हरेस्ट शिखरावर भारताचा झेंडा फडकवला, असा एक फोटो होता. बस्स्! माझे काम फत्ते झाले. मी माझ्या कंपनीचे नाव एव्हरेस्ट इंजिनीअरिंग ठेवले व पटकन चहा घेऊन त्या टाईप करणार्‍या माणसाकडे गेलो. पहिल्या व्यक्तीचे टायपिंगचे काम संपले होते. मी टाईपराईटरला सांगितले की, माझ्या कंपनीचे नाव एव्हरेस्ट इंजिनीअरिंग आहे. मला कोटेशन टाईप करायचे आहे. त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे फक्त पंधरा मिनिटांत टाईप करून माझ्या हातात दिले. मी लगेच तेथून निघालो व किर्लोस्कर कंपनी गाठली. कोटेशन जोशींच्या हातात दिले. त्यांनी ते वाचले. कोटेशनमध्ये आयटम रेट होता. त्यामुळे कमी-जास्त करावयाचा प्रश्‍नच नव्हता. तरी पण जोशी म्हणाले, रेट ठीक आहेत, पण ते तुमच्या कंपनीच्या लेटरहेडवर पाहिजेत. मला चिंता पडली, काय करावे? तितक्यात जोशी म्हणाले, मी एम.डींना विचारतो. ते म्हणाले चालेल, तर मग ठीक आहे. मग मी लगेच वर्क ऑर्डर देतो. ते एम.डींकडे गेले. थोड्याच वेळात केबिनच्या बाहेर आले. जोशी म्हणाले, चला, तुम्हाला आत बोलावले आहे. मी विचार करत होतो काय होईल ते. मी आत जाताच एम.डी. म्हणाले, अहो जोशी, एवढा लहान मुलगा अडीच-तीन लाखांचे काम कसा करणार? जोशींनी खात्रीने सांगितले, साहेब, हा मुलगा काम करेल याची मला खात्री आहे. मित्रहो, त्या वेळी मी जेमतेम २०-२२ वर्षांचा असेन. त्यावर एम.डी. म्हणाले, त्याला वर्क ऑर्डर द्या. मी त्यांना थँक्यू म्हणालो व केबिनच्या बाहेर पडलो. मला खूप आनंद झाला होता. माझ्यामागून जोशी आले. ते मला त्यांच्या केबिनकडे घेऊन गेले व त्यांच्या स्टेनोला बोलावून वर्क ऑर्डर तयार करण्यास सांगितले. जोशींनी माझ्यासाठी चहा मागविला. आम्ही दोघे चहा घेत होतो तितक्यात ते म्हणाले, बोरकर, हे काम अर्जंट आहे. मला हे काम ४५ दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत हवे आहे. माझे नाव खराब होता कामा नये. मी त्यांना म्हणालो, साहेब, मी हे काम ४० दिवसांतच करून देतो. मी त्यांना थँक्यू म्हणून निघालो व स्कूटर घेऊन जंगली महाराजांचा मठ गाठला. दुपारचे १२.३० वाजले होते. तेथे पुजारीबुवा नव्हते. मी ती वर्क ऑर्डर मंदिरातील देवाच्या समोर ठेवली व त्यांना असाच आशीर्वाद द्यावा, अशी मनातच विनंती केली. तेथील पुजार्‍याची विचारपूस केली, पण ते तिथे नव्हते. मी लगेच तेथून निघालो व पुढे कामाला किती पैसे लागणार याचा घरी येऊन हिशोब करत बसलो. कच्च्या मालाला ७० ते ८० हजार रुपये लागणार होते. आता काय करावे सुचत नव्हते. माझ्याकडे फक्त १५ ते १६ हजारच रुपये होते. गळ्यात सोन्याची चैन व हाताच्या बोटात अंगठी होती. याचे किती पैसे येतील ते पाहण्यासाठी जवळच असलेल्या ज्वेलर्सकडे गेलो. त्याने सांगितले, १६,८०० रुपये येतील. मी त्यांना ती चैन व अंगठी दिली व पैसे घेतले. तरीपण मला ४० ते ५० हजार रुपये कमी पडत होते. काय करावे हे समजत नव्हते. घराकडची मंडळी मला एकही रुपया देणार नव्हती याची मला खात्री होती, कारण नोकरी सोडली होती. काय करावे या चिंतेत होतो. माझ्याबरोबर किर्लोस्कर कंपनीत काम करणारे चंद्रकांत शितोळेंचे वर्कशॉप कर्वे रोडला होते. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना वर्क ऑर्डर दाखविली. जवळ असलेले पैसे दाखविले व त्यांना सांगितले, मला पन्‍नास हजार रुपये हवेत. ते थोडे थांबले व म्हणाले की, चल माझ्याबरोबर. मी त्यांच्याच स्कूटरवर बसून डेक्कनच्या महाराष्ट्र बँकेत गेलो, त्यांनी तेथून ५० हजार रुपये काढून घेतले व माझ्या हातात दिले. मी त्यांना धन्यवाद दिले. शितोळे म्हणाले, अरे बोरकर, माणसाने माणसांवर विश्‍वास ठेवावा. तू फक्त पार्‍यापेक्षा चपळ, वार्‍यापेक्षा वेगवान अशा बेफाम मनावर फक्त नियंत्रण ठेव. मी मनात विचार करत होतो, हा आपल्याला परमेश्‍वर पावला आहे. मनुष्याच्या हातून होणारे कोणतेही कार्य अथवा निर्मिती किंवा आविष्कार हा नियमित मनाचा सुपरिणाम असावा. जगाची प्रचंड व विराट निर्मिती हीसुद्धा परमेश्‍वराच्या नियंत्रित मनाचाच चमत्कार असावा आणि या जगात शितोळेसारखी माणसं मिळाली हाही चमत्कार समजतो. मला कोणी तरी सांगितले होते की, माणसाच्या शरीरात आत्मा असतो. हा ईश्‍वरी शक्ती किंवा चैतन्य शक्तीचाच अंश असतो. मी माझ्या आत्म्यातील देवाला नमस्कार केला व पुढील मटेरियल आणण्यासाठी मुंबईकडे निघालो. संध्याकाळचे साधारणतः ४ वाजले होते. शिवाजीनगरहून एस.टी. पकडली व बोरिवली या ठिकाणी माझे मोठे बंधू राहत होते, त्यांच्याकडे संध्याकाळी ९.०० वा. पोहोचलो. सकाळी लवकर उठलो, चहा व नाश्ता घेतला व मटेरियल घेण्यासाठी चर्नीरोडकडे निघालो. सोबत बोरिवलीचा माझा मित्र होता. मटेरियल खरेदी केलं, ते अ‍ॅल्युमिनियमचे हेवी चॅनेल होते. त्यांना फॅब्रिकेशन काळबादेवी या जवळ असलेल्या एका वर्कशॉपमध्ये केले व पॅकिंग गोणपाट आणून व्यवस्थित शिवलं. मी स्वतःच्या हाताने शहा ट्रान्सपोर्टने पुण्याला पाठविले. सोबत फक्त तीन हजार रुपये शिल्लक राहिले. कुंभारवाड्यावरून आम्ही पुढे निघालो. सोबत माझा मित्र होता. लोहार चाळीच्या पाठीमागे मारुतीचे मंदिर आहे आणि त्या दिवशी नेमका शनिवार होता. म्हणून दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो. मारुतीचे दर्शन घेतले आणि समोर चालत असताना तिथे इलेक्ट्रिकची मोठमोठी दुकाने दिसली. त्यातील मी गोल अशा दोन गेट लाइट्स १५० रुपयांना घेतल्या. माझा मित्र म्हणाला, अरे बोरकर, या गेटच्या लाइट्स आहेत, त्या कशाला घेतल्यास? तुझा मुंबईमध्ये बंगला आहे की फॅक्टरी आहे, की या लाइट्स त्या गेटवर लावणार आहेस? मी त्याला म्हणालो, माझी मुंबईत स्वतःची एक झोपडीही नाही आणि फॅक्टरीही नाही, पण एके दिवशी मी फॅक्टरी उभी करणार आहे. त्या गेटवर लावणार आहे. माझा मित्र माझ्याकडे बघून मोठ्याने हसत राहिला व म्हणाला पाचशे रुपये पगार आणि मुंबईत फॅक्टरीचे स्वप्न बघतोस. मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. लाइटची पिशवी हातामध्ये घेतली व आम्ही बोरिवलीतल्या घराकडे निघालो. घरी गेलो गेट लाइट पोटमाळ्यावर ठेवून बॅग घेतली व परत पुण्याकडे निघालो. रात्री पुण्याला येण्यास मला ११.०० वाजले. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठलो. स्वारगेटला शहा ट्रान्सपोर्टकडे गेलो. तिथे मी पाठविलेले पार्सल आले होते. एका टेंपोत ते सर्व मटेरियल भरले व किर्लोस्कर कंपनीकडे गेलो. गेटवर एंट्री केली व स्टोअररूममध्ये ठेवले. जोशींकडे गेलो. त्यांना म्हणालो की, मी मटेरियल आणले आहे. ऑर्डरप्रमाणे अ‍ॅडव्हान्स द्या. जोशी म्हणाले, ठीक आहे. तुमचे बिल सबमिट करा. मी मंजुरी देतो. मी तेथीलच टाईपराईटरकडून बिल टाईप करून घेतले व जोशींकडे गेलो. ते बघताच जोशी म्हणाले, असे बिल चालणार नाही. ते लेटरपॅडवर किंवा बिलबुकावर टाईप करून द्या. माझ्याकडे लेटरपॅड नव्हते. मी लगेच पुण्यात आलो. मी बुधवार पेठच्या कॉर्नरला नाईक प्रेस, यांच्याकडे बिल बुक छापायला दिले. नाईक म्हणाले, कितीही अर्जंट मागितले तरी दोन दिवस लागतील. मी त्यांना विनंती केली, लवकर द्या म्हणून. ते म्हणाले, ठीक आहे, पण १५ रुपये जास्त द्यावे लागतील, उद्या दुपारी या आणि घेऊन जा. दुसरे दिवशी छापलेले बिलबुक घेतले व बिल बनवून त्यांनी स्टोअरमधील ट्रांसपोर्टची चलनाची कॉपी बघितली व ७० टक्के पेमेंट करावे, म्हणून अकाऊंट डिपार्टमेंटकडे मंजुरीसाठी पाठविले. अर्ध्या तासाने चेक मिळेल, तुम्ही थांबा, असे त्या क्लार्कने सांगितले. मी तेथेच बसून होतो. अर्धा तास झाला तरी चेक नाही आला. पाऊण तास झाला तरी नाही. काय करावे कळत नव्हते, कारण माझ्याकडे फक्‍त पन्‍नास रुपये शिल्‍लक होते आणि स्कूटरमधील पेट्रोलही संपत आले होते. मी विचार करत होतोच, की एक चपराशी आला व तुम्हाला चीफ अकाऊंटंटने बोलावले आहे. मी लागलीच धावत गेलो. त्या साहेबांनी माझ्या एक-दोन सह्या घेतल्या व माझ्या हातात एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा चेक दिला. त्या दिवशी एक रुपयाचाही चहा प्यायलो नाही, ना कुठे नाश्ता केला, कारण माझ्याकडे पन्‍नास रुपये शिल्‍लक होते आणि स्कूटरमधील पेट्रोलही संपत आले होते. मी हातात घेऊन तो चेक माथ्यावर लावला, कारण माझ्या आयुष्यातील स्वतःच्या कमाईचा पहिलाच चेक होता. मी तो चेक घेतला, पण हा कुठे भरावा? कारण माझे बँक अकाऊंट नव्हते. पुन्हा मी चंद्रकांत शितोळेंकडे गेलो व त्यांना तो चेक दाखवला. तेही खूप खूश झाले. त्यांना म्हणालो, माझं अकाऊंट नाही. काय करावयाचे? त्यांनी लगेच म्हटले, चल, माझ्या बँकेत खाते उघडू आणि डेक्‍कनला गेलो. तेथील महाराष्ट्र बँकेत खातं उघडलं व तो चेक जमा केला. त्याच बँकेत किर्लोस्कर कंपनीचेही खाते होते. माझा चेक लगेच पास झाला. बँकेच्या मॅनेजरसाहेबांनी आम्हाला चहा मागविला व म्हणाले. काही कॅश हवी आहे का? मी हो म्हटले. त्यांनी लगेच चेकबुक दिले. मी प्रथम १.२५ हजार रुपये काढले. त्यातील पन्‍नास हजार व वरती पाच हजार रुपये मी शितोळे यांच्याकडे दिले, पण त्यांनी फक्‍त पन्‍नास हजार रुपयेच घेतले. मी घरी आलो. मी पुण्यामध्ये डेक्‍कनला गरवारे कॉलेजच्या पाठीमागे भाड्याने राहात होतो. माझ्याकडे ७५ हजार रुपये होते व बँकेत ५० हजार रुपये होते. चेक नसता भेटला तर माझी पंचाईत झाली असती, पण देवाने साथ दिली आणि मला चेक मिळाला. मित्रहो, मी ते पंचाहत्तर हजार कमीत कमी पाच-सहा वेळा मोजले, कारण एवढी रक्‍कम स्वतःच्या कमाईची माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या रात्री मी साडेतीन वाजता झोपलो. सकाळी सातला उठून मी किर्लोस्कर कंपनीच्या राहिलेल्या इरेक्शनसाठी गेलो. सोबत पुण्यातील दहा-पंधरा कामगार घेतले व ते हाती घेतलेले कण्ट्रोल रुमचे काम मी दिवसरात्र एक करून केवळ ३५ दिवसांत पूर्ण केले. तेथील इंजिनीअरने कंट्रोल केबिनची साऊंड टेस्ट घेतली. ती यशस्वी झाली. बस! माझे काम झाले. राहिलेले बिल व एक्स्ट्रा वर्क असे मिळून मला त्या कामात जवळजवळ दीड लाख रुपयांचा फायदा झाला. काम सुंदर आणि वेळेवर झालं होतं. काही दिवसांत रशियातील शिष्टमंडळांनी त्या आर.अ‍ॅण्ड.डी. सेंटरला भेट दिली. ते खूश झाले. किर्लोस्कर कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनीअर श्री. जोशी यांनी माझं अभिनंदन केलं व त्यांनी मला सांगितले, बोरकर, तू उद्या सकाळी ठीक नऊ वाजता मला फर्ग्युसन कॉलेजच्या गेटसमोर भेट. एका ठिकाणी तुला मी घेऊन जाणार आहे. मी दुसर्‍या दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या गेटसमोर उभा राहिलो. नऊ वाजता जोशीसाहेब त्यांच्या गाडीने आले व म्हणाले, माझ्या मागे तुझी स्कूटर घे. मी त्यांच्या पाठीमागे स्कूटर चालवत होतो. शिवाजीनगरचा चौक आला. तेथून डाव्या बाजूला युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने निघालो. काही अंतरावर डाव्या बाजूला त्यांनी गाडी उभी केली. मी माझी स्कूटर त्यांच्या गाडीमागे उभी केली. समोर एक मोठा बंगला होता. त्याच्या गेटच्या बाजूला ‘लकाकी बंगला’ असे नाव होते. जोशीसाहेब मला आत घेऊन गेले आणि भव्य असं गार्डन व पांढर्‍या रंगाचा बंगला खूप छान दिसत होता. मी जोशीसाहेबांना विचारलं, साहेब, हा कुणाचा बंगला आहे? त्यावर ते म्हणाले की, हा बंगला किर्लोस्कर कंपनीच्या मालकांचा आहे आणि तू काम लवकर आणि चांगलं केलं म्हणून त्यांनी तुला बोलावलं आहे. मी घाबरलो. एवढ्या मोठ्या माणसाने मला बोलावले. त्यांच्याशी मी कसं आणि काय बोलू हे समजत नव्हते. आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो. थोड्या वेळात गोरापान, कपाळ मोठे, साधारण सहा फूट उंचीचे, भव्य व्यक्तिमत्त्वाचे श्री. शंतनुराव किर्लोस्कर समोरून आले. आम्ही दोघे उभे राहिलो. त्यांनी बसा म्हटल्यावर आम्ही खाली बसलो. जोशीसाहेबांनी किर्लोस्करसाहेबांना माझी ओळख सांगितली, हे शंकरराव बोरकर, यांनी आपल्या आर.अ‍ॅण्ड डी. सेन्टरचे साऊंडप्रुफ केबिनचे काम चांगले व वेळेच्या दहा दिवस अगोदर पूर्ण केले आहे. परवा रशियाचे शिष्टमंडळही खूश झाले. शंतनुराव किर्लोस्करांनी माझ्या घरची माहिती घेतली व लगेच आपल्या खिशातील पारकर कंपनीचा पेन मला भेट म्हणून दिला व म्हणाले, बोरकर, या वयात एवढं सुंदर काम वेळेत केलंत. जर तुम्ही असेच मेहनत करत राहिलात तर तुम्ही फार मोठे व्हाल. मी लगेच उठलो, त्यांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणालो, सर, मी आपल्या कामासाठी नोकरी सोडली व माझ्या आयुष्यातील पहिलं कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीचं घेतलं. आपले आशीर्वाद आता माझ्या पाठी आहेत. मी पुढे खूप मेहनत करीन आणि आपण दिलेली ही भेट जपून ठेवीन. मित्रहो, ही आठवण लिहीत असताना माझ्या अंगावर काटे उभे राहत आहेत, कारण एवढ्या महान उद्योगपतीने माझ्यासारख्या माणसाचं कौतुक करावं, हे माझं भाग्य होय. जो माणूस काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांची नोकरी करत होता तो आता लघू उद्योजक झाला होता आणि त्याचा सत्कार किर्लोस्करसारख्या उद्योगपतीने केला होता हे भाग्यच नाही का समजायचे! या घटनेनंतर मी पुन्हा जंगली महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेलो, दर्शन घेतले व पुढे सतत मंदिरात जात होतो. पुढे सतत मोठमोठी टेंडर्स घेत राहिलो. किर्लोस्कर, टेल्को, बजाज, महाराष्ट्र बँक अशा किती तरी मोठ्या संस्थेची कामे केली. मित्रहो! आज आमच्याकडे ४०० ते ५०० कोटी रुपयांची सेंट्रल गव्हर्नमेंटची व स्टेट गव्हर्नमेंटची कामे आहेत आणि जी गेट लाइट मी पाचशे रुपयांची नोकरी करताना लोहार चाळ येथून विकत घेतली होती, त्या घटनेनंतर तब्बल नऊ वर्षांनी मी तारापूर एम.आय.डी.सी. येथे ग्रेनाइट्स ब्लॉक, कटिंग व पॉलिसिंगची फॅक्टरी टाकली. ती गेट लाइट त्या फॅक्टरीच्या गेटवर लावली व दुसरी गेट लाइट १४ वर्षांनी मी ९० कोटी रुपयांचा साखर कारखाना उभा केला त्या कारखान्याच्या गेटवर लावली. आपण परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा व काम करीत राहा! देव फळ नक्कीच देईल. आपल्या शरीरात आत्मा आहे आणि तो आत्माच देवाचा अंश आहे असं मला वाटतं. मी जंगली महाराजांच्या मठात गेलो, देवाचं दर्शन घेतलं, पुजार्‍याचं ऐकलं, नोकरी सोडली. पुजार्‍याचे शब्द म्हणजे डॉक्टर्सने दिलेल्या डोसापेक्षा शाब्दिक डोस महत्त्वाचा ठरला. व्यवसायात यश आलं, पण हे देवानेच केलं असं मी मानत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही उपवास करत नाही. वर्षात एकच उपवास करतो, तो आमच्या ग्रामदैवत नृसिंह जयंतीचा. हा एक उपवास करतो. मित्रांनो! देव हा चैतन्यशक्तीचा भाग आहे आणि ती चैतन्यशक्ती आपल्या शरीरातील आत्मा आहे. आपण जसे कर्म करतो तसे देव फळ देतो हेच खरे आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे, जर मी दररोज मंदिरात जाऊन दिवसभर आराधना करत बसलो असतो, तर देवाने मला कधीच साथ दिली नसती. कर्म हेच फळ, हे आपल्या मनात कोरलं पाहिजे. कर्माला अध्यात्माची साथ अवश्य आहे आणि अध्यात्म प्रत्येक व्यावसायिकाला सहजासहजी लाभत नाही. ते कर्मानेच प्राप्त करावे लागते. आपल्या शरीराला डोळे आहेत, पण नजर कोणी दिली तर ते सांगता येणार नाही. तसेच आपल्या मनाचा व आपल्या बुद्धीचा संबंध काय हेही सांगता येणार नाही. प्रथम कोणताही विचार मनात येतो की डोक्यात, हे कोणी सांगू शकणार नाही आणि हेच खरे अध्यात्म आहे. म्हणूनच कोणत्याही उद्योजकाला अध्यात्माची सांगड असणे जरुरी आहे. अध्यात्माने माणसाच्या निरीक्षणशक्तीचा विकास होतो. कोणते फायद्याचे आणि कोणते तोट्याचे हे समजण्यासाठी शक्ती निर्माण होते. अध्यात्माने माणसाची स्मरणशक्ती व विचारशक्तीचा विकास होतो. समोरचा माणूस पारखण्याची ताकद निर्माण होते. अध्यात्माने माणसाच्या निर्णयशक्तीचा विकास होतो. समोरचा माणूस पारखण्याची ताकद निर्माण होते. कोणताही निर्णय चांगला की वाईट ही पडताळण्याची ताकद निर्माण होते. म्हणजेच ईश्‍वर कणाकणात आहे हेच अध्यात्मातील तत्त्व आहे. आपण आत्मा हा चैतन्यशक्तीचा भाग आहे. त्याला जोपासणे हेच आपलं कर्तव्य आहे. मित्रहो! एकच सांगावंसं वाटतं, आपल्या मराठी तरुणांनी कोणताही जास्त विचार न करता उद्योगात पदार्पण केले पाहिजे, तर आणि तरच मराठी तरुण भविष्यात उद्योजक बनतील. मी जर नोकरी सोडायचं धाडस केलं नसतं, तर मी कधीच उद्योजक झालो नसतो. कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी स्वत:च्या आत्मविश्‍वासाने ५० टक्के पुढे चला. राहिलेले ५० टक्के प्रत्यक्ष परमेश्‍वर स्वर्गातून सर्व सुख, समृद्धी बरोबर घेऊन तुम्हाला शोधत पृथ्वीतलावर येईल आणि तुम्हाला अर्पण करील; पण तुम्ही कर्म हेच परमेश्‍वर मानले पाहिजे, तर आणि तरच…. – शंकरराव बोरकर

Saturday, May 19, 2018

खासगी नोकरीही तुम्हाला देते पेन्शनची गॅरटी

जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर सरकार तुम्हाला पेन्शची गॅरंटी देते.यासाठी तुमच्या कंपनीत कमीत कमी 20 कर्मचारी असावेत.जर तुमच्या कंपनीत 20 हून अधिक कर्मचारी काम करत असतील तर तुम्हाला एम्प्लॉईज पेन्शन स्कीम,95 अंतर्गत कव्हर करण्यात येईल.एकदा तुम्ही या योजनेत कव्हर झालात तर 10 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनचा हक्क मिळेल.

पेन्शन फंडात जमा होतो एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूशनचा एक हिस्सा
कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFO संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शनची सुविधा पुरवते.EPF अॅक्ट,1952 अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के कॉन्ट्रिब्युशन त्याच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा होते.तर एम्‍पलॉयरच्या 12 टक्के कॉन्ट्रिब्युशनमधील 8.33 टक्के भाग त्याच्या पेन्शन फंडात जमा होतो.याशिवाय केंद्र सरकारही कर्मचाऱ्याच्या पेन्शन फंडात बेसिक सॅलरीच्या 1.16 टक्के कॉन्ट्रिब्यूट करते.

 10 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर मिळतो पेन्शनचा हक्क
एम्‍पलॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत येणारा कर्मचारी जेव्हा 10 वर्षाची सेवा पुर्ण करतो तेव्हा या स्कीम अंतर्गत त्याला आजीवन पेन्शनचा हक्क मिळतो.या काळात जर कर्मचारी नोकरी बदलत असेल आणि पेन्शन फंडात कॉन्ट्रिब्यूशन कायम ठेवत असेल तर त्याची सेवा खंडीत मानण्यात येणार नाही.पण जर कर्मचारी पीएफ किंवा पेन्शन फंडातून 10 वर्ष पुर्ण होण्यापूर्वी पुर्ण विदड्रॉअल करत असेल तर त्याला पेन्शन मिळणार नाही.

50 व्या वर्षापासूनही मिळू शकते पेन्शन
एम्पलॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळते. पण जर कर्मचाऱ्याचे वय 50 झाले असेल आणि कर्मचारी कोणती नोकरी करत नसेल तर त्याला वयाच्या 50 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन त्याला जीवनभर मिळेल. फॅमिली पेन्शनचीही तरतुद असून कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला कमी झालेली पेन्शन मिळेल. कर्मचाऱ्याच्या दोन मुलांनाही ते 25 वर्षांचे होईपर्यंत पेन्शन मिळेल. या पेन्शनला फॅमिली पेन्शन असे म्हणतात. जर कर्मचाऱ्याने लग्न केले नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला आजीवन पेन्शन मिळेल

Friday, May 18, 2018

सिम न बदलताच मिळणार नवा मोबाईल नंबर

सरकारने eSIM सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. यानंतर आता मोबाईल कनेक्शन घेणाऱ्यांना दरवेळेस सिम बदलण्याची गरज पडणार डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने एम्बेडिड SIMs (eSIM) ला मंजूरी दिली आहे. हे सिम हॅण्डसेटमध्येच असेल. कनेक्शन घेतल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर डिटेल अपडेट करेल. ग्राहकाने सर्व्हिस बदलल्यावर नवी मोबाईल कंपनी त्या सिमला अपडेट करेल. त्यामुळे सिम न बदलताच फोन चालू होईल. याशिवाय डॉटने आता ग्राहकांसाठी सिम बदलण्याची संख्याही वाढवून 18 केली आहे. यापूर्वी ही संख्या केवळ 9 होती.

नव्या तंत्रज्ञानास मंजूरी
डॉटने नव्या एम्बेडिड सब्‍सक्रायबर आयडेंडटी मॉड्यूलला (eSIM) मंजूरी दिली आहे. यानंतर सिंगल आणि मल्टीपल प्रोफाईल यूजवाले सिम जारी करण्यात येतील. ग्राहक आपल्या गरजेनुसार याचा फायदा घेऊ शकतात.

मार्गदर्शक तत्वे जारी
डॉटने यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. ही गाईडलाईन रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलमध्ये अॅपल वॉचवरुन झालेल्या वादानंतर पाच दिवसांनी जारी करण्यात आली आहे. अॅपल वॉच या तंत्रज्ञानाच्या आधारे आले आहे. हे वॉच वापरणारे आता सिम न बदलता मोबाईल सेवा वापरू शकतात.

ई-सिममध्ये होणार प्रोफाईल अपडेट 
डॉटने ई-सिममध्ये प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधेसाठी मोबाईल कंपनीकडे जाण्याचीही गरज पडणार नाही. यूजरच्या डिव्हाईसची माहितीही यामुळे ऑपरेटरला मिळणार नाही.

Wednesday, May 16, 2018

Walmart

Walmart मौजूदा समय के दुनिया की सबसे बड़ी कंपनी हैं. इसकी सफलता की कहानी किसी परिकथा से कम नहीं हैं. Walmart एक अमेरिकी कंपनी हैं जो कि रिटेल सामान के विक्रेता हैं जो कि डिस्काउंट स्टोर, किराना और ऑनलाइन स्टोर चलाती हैं. (Walmart Company History In Hindi)

Walmart की स्थापना 1962 में अमेरिकी नागरिक सैम वॉल्टन ने रखी थी. लेकिन उनकी इस कहानी की शुरुआत 1945 से ही शुरू हो गयी थी.

साल 1945 में सैम वॉल्टन ने एक स्टोर बेन फ्रेंकलिन स्टोर ख़रीदा. जहाँ पर वह हर सामान दूसरी दुकानों की तुलना में कम भाव में बेचा करते थे. देखते ही देखते सैम का यह स्टोर अन्य स्टोरों की तुलना में तेजी से आगे बढने लग गया. इसके साथ ही उनका मुनाफा भी ज्यादा हो गया.

सैम के इसी स्टोर को Walmart की नीव कहा जाता हैं. क्योंकि इस स्टोर के बाद से ही सैम ने Walmart का सपना देखना शुरू किया. आज हम आपको दुनिया की इसी सबसे बड़ी कंपनी के बारे में बताने जा रहे हैं. कैसे इसने साल दर साल, एक-एक कदम चलकर व्यवसाय की दुनिया में इतिहास रच दिया.

सैम वॉल्टन (Sam Walton Biography in Hindi)

सैम वॉल्टन का जन्म किंगफिशर, ओक्लाहोमा में 1918 में हुआ था. 1942 में 24 साल की उम्र में सैम ने अमेरिकी सेना में जुड़ गए. एक साल बाद ही सैम की शादी हेलेम रोब्सन से हो गयी. जब सैम की सेना में सेवाएं समाप्त हो गयी तो वह अपनी पत्नी के साथ लोवा, फिर न्यूपोर्ट, अर्कांसस गए. इस दौरान उन्होंने अपने सफ़र में कई तरह के स्टोर और उन्होंने होने वाले कामकाज को देखा.

साल 1950 में वॉल्टन न्यूपोर्ट छोड़कर बेंटनविल आ गए जहाँ पर उन्होंने Walton’s 5&10 स्टोर खोला उन्होंने बेंटनविल को इसलिए चुना क्योंकि वह अपनी पत्नी के साथ छोटी मोटी ज़िन्दगी बिताना चाहते थे. इस छोटे से स्टोर पर सैम ने बाकि स्टोर की तुलना में कम दाम पर सामान बेचना शुरू किया. सैम ने अपनी ज़िन्दगी के अगले 15 साल इसी स्थान पर बिताये. देखते ही देखते सैम को इस काम में खूब मुनाफा होने लग गया.

छोटे से शहर में बड़ी सफलता हासिल करने के बाद सैम अपने काम को और बढाना चाहते थे. इसीलिए उन्होंने बड़े अवसर बनाने के उद्देश से रोजर्स शहर में 1962 में 44 साल की उम्र में पहले Walmart स्टोर की स्थापना की.

जब सैम ने इस काम की शुरुआत की जब सभी विरोधी यह सोचते थे कि कम दाम में ज्यादा सर्विस देना नामुमकिन हैं. लेकिन यही चीज़ सैम की सफलता का राज बनी. सैम ने अपने स्टोर में कम दाम पर चीजे बेचकर अच्छी सुविधाएँ भी दी. सैम का यह बिज़नस इतनी तेजी से चलने लगा जिसकी उन्होंने कभी कल्पना भी नहीं की थी.

पहले Walmart की सफलता के बाद सैम एक के बाद एक Walmart स्टोर अमेरिका में खोलते चले गए. साल 1970 में Walmart कंपनी पब्लिक डोमेन में चली गयी. पब्लिक डोमेन में आने के बाद कंपनी की आर्थिक स्थिती और व्यापार विस्तार की नीति बनाई गयी. लेकिन तब भी सैम ने अपना दिया हुआ फार्मूला नहीं बदला.

एक बार रिटेल स्टोर में अपनी कमियाबी हासिल करने के बाद सैम ने नए-नए क्षेत्र में अपना विस्तार करने लगे. इसी कड़ी में उन्होंने अमेरिका के विभिन्न स्थानों पर सैम’स क्लब और Walmart सुपरसेटर खोले और मेक्सिको में Walmart स्टोर खोलना इसी का हिस्सा था.

सैम के बेफ्रिक्री के साथ बेहद सस्ते सामान उपलब्ध करवाने की वजह से Walmart ने अमेरिका में अच्छी खासी पहचान बना ली. सुविधाओं के लिए बनाये गए असूलों की वजह से उन्हें व्यक्तिगत, व्यावसायिक, और अमेरिका के सबसे बड़े नागरिक सम्मान “ Presidential Medal of Freedom” प्राप्त करने में उनकी मदद की. यह अवार्ड उनको साल 1992 में तात्कालिक राष्ट्रपति.जॉर्ज बुश द्वारा प्रदान किया गया. सैम वॉल्टन हमेशा यह कहते थे कि “लोगों की बचत करने में मदद करे जिससे वो अच्छी ज़िन्दगी जी पाए.” यही वह राज़ हैं जिससे हम वह बन पाए जो हम बनाना चाहते थे.

राष्ट्रपति द्वारा सम्मान पाए जाने के बाद 5 अप्रैल 1992 को सैम वॉल्टन ने दुनिया को अलविदा कह दिया. लेकिन उनके उद्देश आज तक जिंदा हैं. और Walmart आज रिटेल इंडस्ट्री में दुनिया की सबसे बड़ी कंपनी हैं.

Walmart का सफ़र (Walmart Journey In Hindi )

1962

2 जुलाई 1962 को सैम वॉल्टन ने पहला Walmart स्टोर रोजर्स में खोला.

1967

1967 तक वॉल्टन फैमिली ने अमेरिका में 24 स्टोर खोल डाले. जिसमे उन्होंने $12.7 million डॉलर की सामान बेच दिया था.

1969

इस साल Walmart एक कंपनी के रूप में स्थापित हो गया.

1970

इस साल Walmart एक पब्लिक ट्रेड कंपनी के रूप में स्थापित हो गयी. Walmart के पहले शेयर की कीमत $16.50 थी.

1971

1971 में Walmart ने अपना पहला डिस्ट्रीब्यूशन सेण्टर Bentonville, Arkansas में खोला

1972

इस साल Walmart को अपने 51 स्टोर्स के साथ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (WMT) में जगह मिल गई. इस साल उन्होंने रिकॉर्ड 71 मिलियन की सेल की.

1975

इस साल सैम वॉल्टन ने Walmart चीयर की स्थापना की.

1979

इस साल Walmart फाउंडेशन की स्थापना की गई.

1980

Walmart की $1 बिलियन एनुअल सेल होने बाद वॉल्टन फैमिली ने कंपनी से अलग वॉल्टन फाउंडेशन की स्थापना की.

1983

इस साल सैम वॉल्टन ने सैम’स क्लब की स्थापना की. इसी साल Walmart ने अपने सभी कैश काउंटर को कंप्यूटर आधारित POS से बदल दिया.

1987

Walmart कंपनी ने इस साल दुनिया का सबसे बड़ा प्राइवेट सॅटॅलाइट कम्युनिकेशन सिस्टम स्थापित किया जो कि जो कि कंपनी के काम आवाज और विडियो के जरिये करने में मदद करा था.

1988

खरीदारी को और आसान करने के लिए Walmart ने वाशिंगटन, मिस्सोरी में सुपरसेन्टर बनाया जो कि हर सामान का भारी स्टॉक सहेज कर रखता था.

1991

इस साल Walmart ने मेक्सिको की सबसे बड़ी रिटेल कंपनी के साथ एक जॉइंट वेंचर बनाया और मेक्सिको सिटी में सैम’स क्लब की स्थापना की. इसी के साथ Walmart एक बहुराष्ट्रीय कंपनी बन गई.

1992

1992 में सैम वॉल्टन को “Medal of Freedom” दिया गया. इसके साथ ही उन्होंने अपना सबसे प्रचलित नारा दिया. यह सम्मान प्राप्त करने के बाद वह 74 साल की उम्र में दुनिया को अलविदा कह गए.

सैम वॉल्टन के बाद रॉब वॉल्टन कंपनी के चेयरमैन बने. इस समय तक पूरी दुनिया में Walmart के कुल 371,000 एम्प्लोय और 1928 स्टोर्स हो गए थे.

1993

इस साल पहली बार कंपनी ने रिकॉर्ड एक ही हफ्ते में $1 बिलियन की सेल की.

1994

इस साल Walmart ने कनाडा में भी वूल्को का अधिग्रहण कर अपने 122 स्टोर्स खोल दिए.

1996

इस साल Walmart ने चीन में अपना पहला स्टोर खोला

1997

इस साल Walmart ने पहली बार $100 बिलियन की एनुअल सेल का रिकॉर्ड बनाया. ऐसा कारनामा करने वाली वह पहली कंपनी बनी.

1998

1998 में Walmart ने ब्रिटेन की एक कंपनी Asda का अधिग्रहण कर ब्रिटेन के मार्किट में अपना पहला कदम रखा.

2000

इस साल Walmart.com की स्थापना की गयी. जो कि कस्टमर्स के लिए ऑनलाइन शॉपिंग करने के लिए बनाया गया. इस साल तक Walmart कंपनी के कुल कर्मचारी की संख्या बढकर 11 लाख और स्टोर की संख्या 3989 हो गयी..

2002

इस साल Walmart ने पहली बार Fortune 500 (अमेरिका की 500 सबसे बड़ी कंपनियों) में पहला स्थान प्राप्त किया. इसी साल Walmart ने जापान के बाजार में Seiyu में इन्वेस्ट कर उतरी.

2005

2005 में आये अमेरिका के इतिहास के सबसे भयावह तूफान कटरीना और रीटा के बाद आपदा प्रबंधन में Walmart ने अहम् भूमिका निभाई. Walmart ने $18 मिलियन की राशी और 2450 ट्रक के साथ पीड़ितों को राहत सामग्री पहुंचाई.

2007

इस साल कंपनी ने साईट टू स्टोर सुविधा चालू की. जिससे ग्राहक ऑनलाइन पेमेंट कर स्टोर से सामान प्राप्त कर सकता था.

2009

इस साल चिली में भी कंपनी ने अपना निवेश किया. इसी साल कंपनी ने रिकॉर्ड $400 बिलियन की सेल की.

2010

इस साल कंपनी ने भारती के साथ मिलकर भारत में अपना निवेश कर पहला स्टोर “बेस्ट प्राइस” खोला. इसी साल कंपनी ने यह कमिटमेंट किया कि साल 2015 तक वह भूखे लोगों के लिए 2 बिलियन डालर मदद करेगा.

2011

2011 में Walmart कंपनी ने साउथ अफ्रीका में भी अपने स्टोर खोल दिए. इस तरह Walmart के दुनिया भर में खुल 10000 स्टोर्स हो गए.

2012

इस साल कंपनी ने अपना 50वा स्थापना साल मनाया

2015

इस साल कंपनी ने Mike Duke के स्थान पर Doug McMillon को कंपनी का CEO नियुक्त किया. इस साल तक दुनिया में Walmart के कुल 11,000 स्टोर्स और 23 लाख कर्मचारी हो गए. इस साल Walmart ने चाइना की ईकॉमर्स कंपनी Yihaodian का पूर्ण रूप से अधिग्रहण कर लिया.

2018

इस साल Walmart ने भारत की सबसे बड़ी इ-कॉमर्स कंपनी में शुमार फ्लिप्कार्ट की 77% फीसदी हिस्सेदरी खरीदकर भारत में एक बड़ा निवेश किया हैं.

वॉलमार्ट लोगो (Walmart Logo History In Hindi)

जैसे जैसे समय बदलता गया वैसे वैसे Walmart ने भी अपने लोगो (व्यापार सूचक) में वक़्त के साथ कई बदलाव किये हैं. Walmart का लोगो 56 सालों में कई बार बदला जा चूका हैं. जिस लोगो के साथ Walmart ने अपनी शुरुआत की थी वह आज से काफी अलग था. हम आपको बताते हैं Walmart का लोगो कब कब और कैसा बदला गया.

1962 -1664

अपनी स्थापना के दो साल तक Walmart के लोगों के बारे में किसी को ख्याल भी नहीं आया था. Walmart का पहला लोगो सिंपल प्रिंटर पर छपने वाले सिंपल लैटर से बना हुआ था.

1964-1981

कंपनी का पहली बार अधिकारिक रूप से लोगो 1964 में बनाया गया. Frontier Font में लिखे Walmart के इस लोगो का अधिकारिक रूप से 20 सालों तक प्रयोग किया जाता रहा.

1968-1981

कंपनी के अधिकारिक लोगो के अलावा बनाये गए इस लोगो का उपयोग डिस्काउंट सिटी में, प्रिंटिंग मीडिया में, कर्मचारियों की यूनिफार्म में उपयोग किया जाता था.

1981-1992

लगभग 20 साल बाद Walmart कंपनी ने साल 1981 में अपना लोगो बदला. जो कि कुछ इस तरह दिखता था.

1992-2008

1992 में कंपनी ने अपने लोगो में कुछ बदलाव करते हुए रंग के साथ साथ हायफ़न की जगह स्टार को लोगो में रखा.

2008 -2018

2008 में कंपनी ने अपने लोगो में सबसे बड़ा बदलाव करते हुए. नए फॉन्ट के साथ एक स्पार्क का निशान भी लगाया. जो अब कंपनी की पहचान बन गया हैं.

2018-अबतक

2018 मे कंपनीने फिल्पकार्ट का अधिग्रहण किया।

Sunday, May 13, 2018

नोकरी गेली अन मालामाल झाले

अनेकदा नोकरी गेल्यावर काय करायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो.पण एका 35 वर्षीय व्यक्तीने 2008 मध्ये मंदीच्या काळात नोकरी गमावल्यावरही हार न मानता इतरांसमोर एक उदाहरण उभे केलए आहे.त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या 800 डॉलर(52 हजार रुपये)एवढ्या रकमेतुन कंपनी सुरु केली.आता दहा वर्षानंतर त्याच्या कंपनीची व्हॅल्यू 3300 कोटी रुपयांची झाली आहे.चला जाणून घेऊ यात या व्यक्तीची यशोगाथा...
नर्डवॉलेटची केली उभारणी
अमेरिकेतील 35 वर्षीय टिम चेन यांची 2008 मध्ये मंदीच्या काळात नोकरी गेली.ते बेरोजगार झाले.चार वर्ष विविध हेज फंड हाउसमध्ये काम केल्यानंतर चेन यांना क्रिसमसच्या दिवशी समजले की त्यांची नोकरी गेली आहे.स्टैनफोर्ड येथून पदवीधारक असलेल्या चेन यांना यामुळे मोठाच धक्का बसला.त्यांना जीवन काहीतरी करुन दाखवायचे होते.चेन हे आता याला एक चांगली घटना म्हणतात.त्यांच्या मते असे झाले नसते तर ते एक चांगले उद्योजक झाले नसते.2010 त्यांनी पर्सनल फायनान्स वेबसाईट नर्डवॉलेट सुरु केली.आज या संकेतस्थळास रोज एक कोटीहून अधिक लोक भेट देतात. 
बहिणीच्या कामातून भेटलीआयडिया
सीएनबीसीच्या अहवालानुसार, चेन यांना नर्डवॉलेट सुरू करण्याची आयडिया त्यांच्या बहिणीच्या एका कामातून मिळाली. त्यांची बहिण ऑस्ट्रेलियात राहत होती. त्यांच्या बहिणीने चेन यांना मेल करुन एका क्रेडिट कार्डाविषयी माहिती घेण्यास सांगितले. ज्याची फॉरेन ट्रान्झॅक्शन फी सगळ्यात कमी असेल. गूगलवर शोधल्यानंतरही त्यांना याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांना आपल्या अनुभवाच्या आधारे माहिती गोळा करुन ती बहिणीला दिली. 
पहिल्यावर्षी झाला अत्यल्प फायदा
वेबसाईट लॉन्च केल्यानंतर 9 महिन्यानंतर पैसे वाचविण्यासाठी त्यांना गर्लफ्रेंन्डच्या घरी शिफ्ट व्हावे लागले. 16 ते 20 तास काम केल्यानंतरही त्यांना पहिल्या वर्षी केवळ 5 हजार रुपये (75 डॉलर) मिळाले. पण दुसऱ्या वर्षी कंपनीचा रेवेन्यू 40 लाख रुपयांवर (60,000 डॉलर) पोहचला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हळूहळू वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढू लागली. 2015 मध्ये नर्डवॉलेटने 703 कोटी रुपयांचा (10.5 करोड़ डॉलर) फंड गोळा केला.
अशी होते कमाई
कंपनीचा महसूल हा आर्थिक सेवांच्या माध्यमातून जमा होतो. ग्राहकांनी क्रेडिट कार्ड किंवा अन्य कोणते प्रॉडक्ट नर्डवॉलेटच्या साईटवर क्लिक करुन साईन अप केल्यास नर्डवॉलेटला पैसे मिळतात. 52 हजार रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु झालेली ही कंपनी आता 3300 कोटी रुपयांच्या व्हॅल्यूची झाली आहे.  

Saturday, May 12, 2018

मैत्री

“प्राचार्य शिवाजीराव भोसले सर
यांचे " मैत्री " बद्दलचे सुंदर लेखन...

ज्यांना मित्र असतील,
त्यांनी ते जपावेत...

ज्यांना मित्र नसतील,
त्यांनी ते शोधावेत...

मित्राशिवाय
जगण्याची वेळ
शत्रूवरही येऊ नये...

आपल्या तोडीचाच
किंवा त्यापेक्षा थोडा
वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर
असणारं फ्रेंड सर्कल
असणं ह्यासारखं दुसरं
भाग्य नाही...

आणि आपण मारलेला
एखादा पंच समोरच्याला
समजावून सांगायची
वेळ येणे ह्यासारखं
दुर्भाग्य नाही....

समोरासमोर
नसतांनासुद्धा
गप्पा मारताना
टाईप केलेल्या
वाक्यांमधून
हवा तो अर्थ
पटकन समजून...

त्याचा अजून
तिरका अर्थ
काढून बोललेलं
वाक्य तिसरीकडे
नेऊन ठेवणे,
ह्यातली मजा
अवर्णनीय आहे...

वयाच्या बंधनाला
अमान्य करून
वाह्यातपणा चालू
ठेवला, की...

बुद्धी ताजीतवानी
राहते आणि मेंदू
अखंड क्रिएटिव्ह
राहतो...

"अरे तुझं वय कांय,
बोलतोयस काय?"
हा प्रश्न ज्याला पडतो,
ती माणसं अकाली
वृद्ध होतात...

येता जाता केलेला
फालतूपणा हा
आपले हॅप्पी हार्मोन्स
अबाधित ठेवतात...

एखादी गोष्ट
सिरियसली न घेता
अतिशयोक्ती वगैरे
करून त्याची पार
वाट लावणं ज्याला
जमतं तेच खरे मित्र...!!

एकमेकांवर
कडी करून
मिष्किलपणाची,
बालीशपणाची
किंवा टारगटपणाची...

एवढच कांय थोडी
फाजिलपणाची हद्द
गाठणे, हेच खरं
जीवन....!!

Thursday, May 10, 2018

जाेतिराव फुलेंच्या ‘महात्मा’ उपाधीला 130 वर्षे पूर्ण

स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मूलन,संसाधनांचे फेरवाटप,ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा,आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जाेतिबा फुले यांना ११ मे १८८८ राेजी मुंबईकरांनी‘महात्मा’ही उपाधी बहाल केली.सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी उपाधी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.अाज(दि.११)या घटनेला १३० वर्षे पूर्ण हाेत अाहे.यानिमित्ताने महात्मा या उपाधीची पार्श्वभूमी,जाेतिबांचे अंगभूत गुण यांचा‘दिव्य मराठी’ने घेतलेला विशेष अाढावा...

अशी दिली उपाधी
जोतिबांच्या वयाला ६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी-कोळीवाडा येथे आग्री,भंडारी,कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले.मांडवी-कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता.नारायण मेघाजी लोखंडे,दामोदर सावळाराम यंदे,स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू,रावबहादूर वंडेकर,मोरो विठ्ठल वाळवेकर,भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी उपस्थित आग्री,कोळी,भंडारी समाजातील बांधवांनी जाेतिबांना‘महात्मा’ही उपाधी बहाल केली.

जाेतिबांनी त्या काळी मांडलेले विचार
१८८२ मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत,सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती.अशी मागणी करणारे ते संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.
१८८३ मध्ये त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे‘शेतकऱ्याचा अासूड’मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते.

आधुनिक पद्धतीची शेती करणे,बांध बांधून पाणी अडवावे,म्हणजे जमीन सुपीक होईल.धरणे बांधून नद्या आडवाव्यात.शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे,शेतीला जोडधंदे,पूरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.
मुला-मुलींना वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती,उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केलेे होते.त्यांनीच प्रथम त्रिभाषा सूत्र सुचवले.शैक्षणिक गळती राेखण्यासाठी गरीब मुलांना विद्यावेतन देण्याचा उपाय अमलात आणलेला होता.


अाजच्या काळातील महत्त्व
शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ही मागणी पूर्ण झाली.
शेती उत्पादन खर्चावर अाधारित बाजारभाव देण्याचाच पर्याय विविध पातळ्यांवर अाणि व्यासपीठावर दिला जाताे.सरकारही या मताशी अाता अनुकूल हाेत अाहे.
जलयुक्त शिवार,पाणी अडवा-पाणी जिरवा,ठिबक सिंचन यांसारख्या सिंचन याेजनांचे बीजच जाेतिबांच्या विचारातून अाले.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.


बांधकाम व्यावसायिक अन् उद्याेगपती
स्वत:फुले एक बांधकाम व्यावसायिक होते.कात्रजचा बोगदा,बंडगार्डनचा पूल,डावा कालवा,रस्ते,इमारतींची अनेक कामे त्यांच्या“पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनी”द्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता.ते“नेशन बिल्डर”होते याबाबत दुमत होऊ शकत नाही.

कृषी अर्थशास्त्रज्ञ:ज्या काळात ९० टक्के भारतीय शेतीवर उपजीविका करीत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्ससमोर एेरणीवर आणणारे पहिले कृषी-अर्थशास्त्रज्ञ फुलेच होत. 

सर्वच बाबतीत अव्वल
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिबांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात त्या काळात(१८८२)जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच पुढे होते.


*१८६९ साली जोतिबांनी मराठीतले पहिले शिवचरित्र लिहिले.
*१८८५ साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला.

रायगडावरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले.पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील,माधवराव बागल,धनंजय कीर यांनी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत.

शेअर बाजाराच्या टिप्स कवितेतून
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या.ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते.दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती.


सामाजिक न्यायाचे सूत्र
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सगळे राजकारण विकास आणि सामाजिक न्याय याच सूत्रांच्या भोवती फिरत आहे.जोतिबांचे  राजकारण समजून घेण्यासाठी“सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा”हे जोतिसूत्र समजून घेतले पाहिजे.

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...