स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मूलन,संसाधनांचे फेरवाटप,ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा,आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जाेतिबा फुले यांना ११ मे १८८८ राेजी मुंबईकरांनी‘महात्मा’ही उपाधी बहाल केली.सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी उपाधी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.अाज(दि.११)या घटनेला १३० वर्षे पूर्ण हाेत अाहे.यानिमित्ताने महात्मा या उपाधीची पार्श्वभूमी,जाेतिबांचे अंगभूत गुण यांचा‘दिव्य मराठी’ने घेतलेला विशेष अाढावा...
अशी दिली उपाधी
जोतिबांच्या वयाला ६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी-कोळीवाडा येथे आग्री,भंडारी,कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले.मांडवी-कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता.नारायण मेघाजी लोखंडे,दामोदर सावळाराम यंदे,स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू,रावबहादूर वंडेकर,मोरो विठ्ठल वाळवेकर,भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी उपस्थित आग्री,कोळी,भंडारी समाजातील बांधवांनी जाेतिबांना‘महात्मा’ही उपाधी बहाल केली.
जाेतिबांनी त्या काळी मांडलेले विचार
१८८२ मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत,सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती.अशी मागणी करणारे ते संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.
१८८३ मध्ये त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे‘शेतकऱ्याचा अासूड’मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते.
आधुनिक पद्धतीची शेती करणे,बांध बांधून पाणी अडवावे,म्हणजे जमीन सुपीक होईल.धरणे बांधून नद्या आडवाव्यात.शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे,शेतीला जोडधंदे,पूरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.
मुला-मुलींना वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती,उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केलेे होते.त्यांनीच प्रथम त्रिभाषा सूत्र सुचवले.शैक्षणिक गळती राेखण्यासाठी गरीब मुलांना विद्यावेतन देण्याचा उपाय अमलात आणलेला होता.
अाजच्या काळातील महत्त्व
शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ही मागणी पूर्ण झाली.
शेती उत्पादन खर्चावर अाधारित बाजारभाव देण्याचाच पर्याय विविध पातळ्यांवर अाणि व्यासपीठावर दिला जाताे.सरकारही या मताशी अाता अनुकूल हाेत अाहे.
जलयुक्त शिवार,पाणी अडवा-पाणी जिरवा,ठिबक सिंचन यांसारख्या सिंचन याेजनांचे बीजच जाेतिबांच्या विचारातून अाले.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.
बांधकाम व्यावसायिक अन् उद्याेगपती
स्वत:फुले एक बांधकाम व्यावसायिक होते.कात्रजचा बोगदा,बंडगार्डनचा पूल,डावा कालवा,रस्ते,इमारतींची अनेक कामे त्यांच्या“पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनी”द्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता.ते“नेशन बिल्डर”होते याबाबत दुमत होऊ शकत नाही.
कृषी अर्थशास्त्रज्ञ:ज्या काळात ९० टक्के भारतीय शेतीवर उपजीविका करीत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्ससमोर एेरणीवर आणणारे पहिले कृषी-अर्थशास्त्रज्ञ फुलेच होत.
सर्वच बाबतीत अव्वल
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिबांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात त्या काळात(१८८२)जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच पुढे होते.
*१८६९ साली जोतिबांनी मराठीतले पहिले शिवचरित्र लिहिले.
*१८८५ साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला.
रायगडावरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले.पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील,माधवराव बागल,धनंजय कीर यांनी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत.
शेअर बाजाराच्या टिप्स कवितेतून
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या.ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते.दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती.
सामाजिक न्यायाचे सूत्र
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सगळे राजकारण विकास आणि सामाजिक न्याय याच सूत्रांच्या भोवती फिरत आहे.जोतिबांचे राजकारण समजून घेण्यासाठी“सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा”हे जोतिसूत्र समजून घेतले पाहिजे.
No comments:
Post a Comment