“प्राचार्य शिवाजीराव भोसले सर
यांचे " मैत्री " बद्दलचे सुंदर लेखन...
ज्यांना मित्र असतील,
त्यांनी ते जपावेत...
ज्यांना मित्र नसतील,
त्यांनी ते शोधावेत...
मित्राशिवाय
जगण्याची वेळ
शत्रूवरही येऊ नये...
आपल्या तोडीचाच
किंवा त्यापेक्षा थोडा
वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर
असणारं फ्रेंड सर्कल
असणं ह्यासारखं दुसरं
भाग्य नाही...
आणि आपण मारलेला
एखादा पंच समोरच्याला
समजावून सांगायची
वेळ येणे ह्यासारखं
दुर्भाग्य नाही....
समोरासमोर
नसतांनासुद्धा
गप्पा मारताना
टाईप केलेल्या
वाक्यांमधून
हवा तो अर्थ
पटकन समजून...
त्याचा अजून
तिरका अर्थ
काढून बोललेलं
वाक्य तिसरीकडे
नेऊन ठेवणे,
ह्यातली मजा
अवर्णनीय आहे...
वयाच्या बंधनाला
अमान्य करून
वाह्यातपणा चालू
ठेवला, की...
बुद्धी ताजीतवानी
राहते आणि मेंदू
अखंड क्रिएटिव्ह
राहतो...
"अरे तुझं वय कांय,
बोलतोयस काय?"
हा प्रश्न ज्याला पडतो,
ती माणसं अकाली
वृद्ध होतात...
येता जाता केलेला
फालतूपणा हा
आपले हॅप्पी हार्मोन्स
अबाधित ठेवतात...
एखादी गोष्ट
सिरियसली न घेता
अतिशयोक्ती वगैरे
करून त्याची पार
वाट लावणं ज्याला
जमतं तेच खरे मित्र...!!
एकमेकांवर
कडी करून
मिष्किलपणाची,
बालीशपणाची
किंवा टारगटपणाची...
एवढच कांय थोडी
फाजिलपणाची हद्द
गाठणे, हेच खरं
जीवन....!!
No comments:
Post a Comment