Saturday, May 19, 2018

खासगी नोकरीही तुम्हाला देते पेन्शनची गॅरटी

जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर सरकार तुम्हाला पेन्शची गॅरंटी देते.यासाठी तुमच्या कंपनीत कमीत कमी 20 कर्मचारी असावेत.जर तुमच्या कंपनीत 20 हून अधिक कर्मचारी काम करत असतील तर तुम्हाला एम्प्लॉईज पेन्शन स्कीम,95 अंतर्गत कव्हर करण्यात येईल.एकदा तुम्ही या योजनेत कव्हर झालात तर 10 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनचा हक्क मिळेल.

पेन्शन फंडात जमा होतो एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूशनचा एक हिस्सा
कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFO संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शनची सुविधा पुरवते.EPF अॅक्ट,1952 अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के कॉन्ट्रिब्युशन त्याच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा होते.तर एम्‍पलॉयरच्या 12 टक्के कॉन्ट्रिब्युशनमधील 8.33 टक्के भाग त्याच्या पेन्शन फंडात जमा होतो.याशिवाय केंद्र सरकारही कर्मचाऱ्याच्या पेन्शन फंडात बेसिक सॅलरीच्या 1.16 टक्के कॉन्ट्रिब्यूट करते.

 10 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर मिळतो पेन्शनचा हक्क
एम्‍पलॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत येणारा कर्मचारी जेव्हा 10 वर्षाची सेवा पुर्ण करतो तेव्हा या स्कीम अंतर्गत त्याला आजीवन पेन्शनचा हक्क मिळतो.या काळात जर कर्मचारी नोकरी बदलत असेल आणि पेन्शन फंडात कॉन्ट्रिब्यूशन कायम ठेवत असेल तर त्याची सेवा खंडीत मानण्यात येणार नाही.पण जर कर्मचारी पीएफ किंवा पेन्शन फंडातून 10 वर्ष पुर्ण होण्यापूर्वी पुर्ण विदड्रॉअल करत असेल तर त्याला पेन्शन मिळणार नाही.

50 व्या वर्षापासूनही मिळू शकते पेन्शन
एम्पलॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळते. पण जर कर्मचाऱ्याचे वय 50 झाले असेल आणि कर्मचारी कोणती नोकरी करत नसेल तर त्याला वयाच्या 50 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन त्याला जीवनभर मिळेल. फॅमिली पेन्शनचीही तरतुद असून कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला कमी झालेली पेन्शन मिळेल. कर्मचाऱ्याच्या दोन मुलांनाही ते 25 वर्षांचे होईपर्यंत पेन्शन मिळेल. या पेन्शनला फॅमिली पेन्शन असे म्हणतात. जर कर्मचाऱ्याने लग्न केले नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला आजीवन पेन्शन मिळेल

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...