गगनदीप सिंग. उत्तराखंडच्या पोलीस दलातले एक सब इनस्पेक्टर. एरवी त्यांची कोणी कशाला दखल घेतली असती? पण ते एका कठीण प्रसंगात जसे वागले तसं एखादा सुपरहिरोच करू शकतो. ज्याच्यात माणुसकी आहे अशी कोणतीही चांगली असं वागण्याचा विचार करू शकली असती. गगनदीप सिंग मोठे ठरले कारण त्यांनी फक्त विचार केला नाही, ते तसे वागले!
काय झालं नेमकं?
एका मुस्लीम मुलाला गगनदीप यांनी समाजकंटकांच्या तावडीतून वाचवलं. त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पाहिली की किती मोठं धैर्यं दाखवलं हे समजतं.
खरतर अशी परिस्थितीच निर्माण व्हायला नको होती. पण गेल्या काही काळात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गगनदीप यांनी दाखवलेलं धाडस सकारात्मक विचार करण्यास भाग पाडतं. गगनदीप यांचा हा व्हायरल झालेला फोटो प्रेरणादायी आहे, असंच म्हणावं लागेल.
अर्थात, हे असं चित्रं एक दोन दिवसात तयार होत नाही. वाईट काळात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तयार झालेलं हे दुर्मीळ चित्र आहे. मानवी सामर्थ्याचं उत्तुंग दर्शन घडवणारं ही घटना आहे.
Image copyrightFACEBOOK/GAGANDEEP
याआधी असंच एक आशादायी चित्र दिसलं. दोन मुस्लीम युवक आपला रोजा तोडून रक्तदान करण्यासाठी गेले. गोपालगंजचा आलम जावेद आणि डेहराडूनचा आरिफ ही त्या दोघांची नावं.
तथाकथित संस्कृतीरक्षकांचा हल्ला
नैनीताल जिल्ह्यातील रामनगर येथे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कजवळ एक मंदिर आहे. मंदिरालगत एक नदी वाहते. त्या नदीच्या किनाऱ्यावर प्रेमी युगुल बसलेली असतात.
एक मुस्लीम युवक आपल्या हिंदू मैत्रिणीसोबत तिथं बसलेला होता. त्या वेळी हे तथाकथित संस्कृतीरक्षक तिथं आले आणि त्यांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली.
ते त्याला मारून टाकतील अशीच परिस्थिती होती. पण तितक्यात तिथं गगनदीप आले आणि त्यांनी त्या जमावापासून त्याचं रक्षण केलं.
Image copyrightFACEBOOK/GAGNDEEP
हे चित्र आपल्याला भावूक करतं पण त्याबरोबरच आपल्या निद्रिस्त असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीस जागवण्याचं कामही करतं. तसंच या जमावखोरांविरोधात लढण्याची प्रेरणा देतं.
गगनदीप यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. योगायोगानं ते घटनास्थळी ड्युटीवर होते. त्यांचं मते, त्यांनी काहीही विशेष केलेलं नाही. फक्त त्यांचं कर्तव्य पार पाडलं. ते सांगतात त्यांचं पहिलं उद्दिष्ट त्या मुलाला जमावापासून वाचवणं हेच होतं आणि त्यांनी तेच केलं.
तो मुलगा नशीबवान म्हणून त्याला गगनदीप भेटले. नाहीतर त्याचं काय झालं असतं याचा केवळ विचार आला तरी अंगाला कंप सुटतो. जमाव आपला पाठलाग करत आहे. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरुपात. कधी कधी तर असं वाटतं की जमाव ड्रोनसारखं पाहतोय आपल्याकडे!
गगनदीपसारख्या अधिकाऱ्यांची गरज
उत्तराखंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा अनेक घटना टळल्या आहेत. उधमसिंहनगर, कोटद्वार, सतपुली आणि मसुरी या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना टाळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
पण वाढत्या घटनांचं प्रमाण बघता गगनदीप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असं वाटतं.
No comments:
Post a Comment