सरकारने eSIM सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. यानंतर आता मोबाईल कनेक्शन घेणाऱ्यांना दरवेळेस सिम बदलण्याची गरज पडणार डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने एम्बेडिड SIMs (eSIM) ला मंजूरी दिली आहे. हे सिम हॅण्डसेटमध्येच असेल. कनेक्शन घेतल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर डिटेल अपडेट करेल. ग्राहकाने सर्व्हिस बदलल्यावर नवी मोबाईल कंपनी त्या सिमला अपडेट करेल. त्यामुळे सिम न बदलताच फोन चालू होईल. याशिवाय डॉटने आता ग्राहकांसाठी सिम बदलण्याची संख्याही वाढवून 18 केली आहे. यापूर्वी ही संख्या केवळ 9 होती.
नव्या तंत्रज्ञानास मंजूरी
डॉटने नव्या एम्बेडिड सब्सक्रायबर आयडेंडटी मॉड्यूलला (eSIM) मंजूरी दिली आहे. यानंतर सिंगल आणि मल्टीपल प्रोफाईल यूजवाले सिम जारी करण्यात येतील. ग्राहक आपल्या गरजेनुसार याचा फायदा घेऊ शकतात.
मार्गदर्शक तत्वे जारी
डॉटने यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. ही गाईडलाईन रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलमध्ये अॅपल वॉचवरुन झालेल्या वादानंतर पाच दिवसांनी जारी करण्यात आली आहे. अॅपल वॉच या तंत्रज्ञानाच्या आधारे आले आहे. हे वॉच वापरणारे आता सिम न बदलता मोबाईल सेवा वापरू शकतात.
ई-सिममध्ये होणार प्रोफाईल अपडेट
डॉटने ई-सिममध्ये प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधेसाठी मोबाईल कंपनीकडे जाण्याचीही गरज पडणार नाही. यूजरच्या डिव्हाईसची माहितीही यामुळे ऑपरेटरला मिळणार नाही.
No comments:
Post a Comment