चोचीने कोरले नखांनी ऊकरले
तरी जमीनीत झरा लागत असे
व्याकुळलेल्या जिवांची पुर्वी
सहज तहान भागत असे
येरे येरे म्हणताच
पाऊस येत असे मोठा
त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा
पैसा खोटा होता तरी
माणुस मात्र खरा होता
प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता
ये गं , ये गं म्हणताच
सर यायची धाऊन
चिमुकल्यांच्या मडक्याला
ती ही न्यायची वाहुन
एकदा पाऊस आला
की मुक्कामी राहत असे
निघुन जा म्हटलं तरी
मुद्दाम जात नसे
हल्ली येरे येरे म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही
ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही
कत्तल केली जंगलांची
पशु पक्षी राहिले नाही
जमीनिला भोकसतांना
मागेपुढे पाहिले नाही
हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही
बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही
पाऊच ,बाॅटल ,कॅन, टॅंकर आले
मडके केंव्हाच फुटले
कशी येणार सर धाऊन
नाते आपुलकीचे तुटले
कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?
कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?
तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी विहिरीच्या घशाला
तुच भोग तुझी फळे
फेड तुझे तुच पातक
बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक
या साठी आपण सर्वांनी मिळून एक तरी झाड लावणे पर्यावरणाचे रक्षण करणे*🌴🌴🌴🌴🌴🌴
No comments:
Post a Comment