बँक खाते, मोबईल आणि इतर अनेक सेवांनंतर आता सर्व प्रकारच्या विमा पॉलिसीलादेखील आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक झाले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर जो पॉलिसीधारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅनकार्ड जोडणार नाही, त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही.
जुनी पॉलिसी असल्यास?
ग्राहकांकडे जुनी पॉलिसी असल्यास त्यांनी आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर ग्राहकांकडे पॅन कार्ड नसेल तर, फॉर्म 60 भरला तरी चालणार आहे.
नवीन पॉलिसीसाठी
नवीन पॉलिसी घेताना ग्राहकांकडून आधार आणि पॅन क्रमांकाचे तपशील मागितले जातील. त्यामुळे नवीन पॉलिसी घेतानाच आधार जोडणी करता येईल.
‘आधार-पॅन’ची प्रक्रिया कधीपासून?
नियमावलीनुसार लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि केवळ आरोग्य विमा विकणाऱ्या कंपन्यांनी सर्व पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया लगेचच सुरू करणे अपेक्षित आहे.
कसे जोडणार आधार?
‘आयआरडीएआय’ने नियमावलीत नमूद केल्यानुसार विमाधारक संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन, मोबाइल मेसेजच्या मदतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने आधार आणि पॅन कार्ड पॉलिसीशी जोडता येणार आहेत.
आधारसाठी केवळ आवाहनच
विमा पॉलिसीला आधार क्रमांक जोडून घेतला नाही आणि तसे करण्याचे आवाहन किंवा तशी पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीने दिली नाही तर त्या विमा कंपनीला शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये नाही. त्यामुळे केंद्र सरकारने केलेला हा कायदा पाळावा असे केवळ आवाहन ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना केले आहे.
‘आधारजोडणी’च्या महत्त्वाच्या तारखा*
1. पीपीएफ व एनएससी 31 डिसेंबर 2017 पर्यंत
2.पॅन क्रमांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत
3. बँक खाते 31 डिसेंबर 2017 पर्यंत
4.मोबाइल क्रमांक 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत
No comments:
Post a Comment