Saturday, November 18, 2017

गालावर खळी

गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
I Love you… I Love you … I Love you

कोणता हा मौसम मस्त रंगाचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने सुने होते किती मन माझे आज
तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे
तुझ्या साठी जीव झुरे मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेउनी आली
तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली
जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्या वरी
कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला बोल आता काही तरी
भेट आता कुठे तरी कसला हा अबोला हे जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

1 comment:

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...