Saturday, July 31, 2021

डनहिल

हे माहीती आहे का?
C/p

‘डनहिल’ (Dunhill)ची कथा 

लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता. 
चर्चमधे काम करणा-या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता. डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. 
वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले. 
डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.
एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्डस्ट्रीटवर कोठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही. शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. 'आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर?' डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.
त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला. त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणा-या  ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली. 
अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला. 
पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व ‘डनहिल’ या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.
त्याच्या सिगारेटससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणा-या शेतक-यांबरोबर अॅग्रीमेन्ट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतक-यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते. या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती. 
हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले, ‘सर! हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसतानादेखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते?’ 
डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहीता वाचता आले असते तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो!’ 

आजसुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.....

Thursday, July 29, 2021

कस्तुरीमृग

"कस्तुरीमृग"

गुरुवार 22 तारखेपासून कोल्हापुरात पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली. समस्त कोल्हापुरवासियांना चिंता वाटू लागली .आम्हीही त्यापैकी एक होतो . शुक्रवारी सकाळी आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरी पुराचं पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं स्थलांतर करणं अत्यावश्यक होतं. ते होतंय न होतंय तोच दुपारी आमच्या घराच्या अलीकडे भरपूर पाणी आलं आणि आपल्या घराच्या खाली पाणी येणार याची खात्री झाली. लाईट गेले.. पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याच वेळी आमच्याकडे फरशी पुसणारी 'कस्तुरी' कामाला आली होती .दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामान भरण्याची आमची गडबड सुरू होती. कस्तुरी म्हणाली, "उद्या जर पुराचं पाणी फार वाढलं तर  मी कामाला येणार नाही". 
तिला म्हटलं.."अगं आम्हीच चाललोय दुसरीकडे रहायला!"  आम्ही सगळे गडबडीने नातेवाईकांकडे  राहायला गेलो. 
काल दि.26 रोजी  रात्री आमची 'घरवापसी' झाली. आज सकाळी आमचा नेहमीचा जीवनक्रम सुरू झाला. नेहमीच्या वेळेला कस्तुरी आली. मी तिला विचारले "काय गं शुक्रवारी कामाला आली होतीस का?" आपल्या कानडी  ढंगामध्ये मला ती म्हणाली ,"पाणी लै आलं व्हतं म्हनुन मी आलो नाही, आमचा काशा(तिचा मुलगा) म्हणला आज घरीच हाईस तर थोडा भात करून दे! पाच किलोचा मसालेभात करून दिला बघ मामी !" (सगळ्यांना ती मामीच म्हणते).
हे ऐकून आम्ही घरातले सगळे अवाक् झालो. मी विचारलं, "एवढा भात कशासाठी केलास तू ?" त्यावर ती उत्तरली,  "तावडे हॉटेलकडं पुरात जी माणसं अडकली आहेत त्यांच्यासाठी 'काशा' भात घेऊन गेला!"  हे ऐकून आम्हाला सगळ्यांना फार गहिवरुन आलं.  सध्या फेसबुक ,व्हॉट्सॲप यावरून पूरग्रस्तांना केल्या जाणाऱ्या मदतीचे फोटो आणि व्हिडिओ बघण्यात येत आहेत. पण आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कस्तुरीनं केलेली ही मदत लाख-मोलाची आहे.2019 साली सुद्धा हायवेवर अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर ना 'दीडशे भाकरी आणि दोन कुकर भात' हिने पुरवला होता .याच कस्तुरीला दोन वर्षापूर्वी एका भिशीचालकाने एक लाखाला गंडा घातला होता .पण ते सर्व मागं टाकून आपल्या परीनं पूरग्रस्तांना ती मदत करते ही गोष्ट थक्क करणारी आहे. 
.. आणि हे आम्हाला सांगत असताना, तिच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात, 'आपण काहीतरी विशेष करत आहोत' असा कोणताही आविर्भाव नव्हता. 'कस्तुरीमृगाला' तरी आपल्यापाशी असलेल्या सुगंधाची जाणीव कुठे असते? 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ.मृदुला कुरणे
कोल्हापूर

Sunday, July 25, 2021

डिफेक्टिव्ह पिस*

*R*

              *डिफेक्टिव्ह पिस*

                                     *लेखक : मंगेश वर्दे*

डिफेक्टिव्ह पिस म्हणून मला कायम माझी भावंडं हिणवत असत....कारण....
                            *****
मी राम शिवगण. सध्या ड्रायव्हर म्हणून साठे साहेबांकडे आहे. साहेब स्वभावाचा एकदम लाख माणूस. वेळेत देवासारखे माझ्यापाठी उभे राहिले
....म्हणून लाख नाही.... खरोखरचा लाख माणूस
....
                             *****
माझी साई सर्व्हिसची नोकरी अचानक मला सोडायला लागली. स्टोअर्स मध्ये स्टॉकचा कुणीतरी घोळ घातला....आणि कुणी तरी माझा बकरा केला....मला माहित आहे कुणी ते पण मी माझं तोंड त्यांचं नाव घेऊन खराब करणार नाही..

                             *****
साठेंची गाडी माझ्याकडे सर्व्हिसिंगला यायची. बरेच वेळा घरी जाऊन सुध्दा गाडीच काम केलं आहे मी....नोकरी गेली हे त्यांना कंपनीतून कळलं. घरी फोन आला....आणि मी साठेंचा ड्रायव्हर झालो....

                              *****

त्या दिवशी साहेबाना त्यांच्या घरी सोडून मी घरी उशिरा आलो. घरचे सगळे जेवायचे थांबलं होते. आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर बायकोनी मला कुरिअर दिलं....एक जाडजूड एनव्हलोप आला होता. 

एनव्हलोपवर नाव होत शिखु अडवाणींचे. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतो. आत तीन लेटर्स होती. मी एक एक करून ती उघडली....

पहिलं लेटर.....
मग दुसरं....      
आणि तिसरं तर .....

......जसजसा वाचत गेलो तसतशी माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली....

                           *****

मी साठेना तीनही पत्र दाखवली. त्यांनी शिखु अडवाणी कोण ते सांगितल....मला हळू हळू काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या....
' साहेब मला पाच हजार द्याल....पगारातून कमी करा....आज पर्यंत मी पैसे कधी मागितले का  ? नाही ना ! '
' देतो पण का हवे ?....मग मी कारण सांगितले
...त्यांनी त्यांची हॅण्ड बॅग उघडली....त्यातून पाच हजार काढून दिले.....
     
                             *****

त्या दिवशी मी साहेबाना पुण्याला सोडून मुंबईला परत येत होतो....ते तीन दिवस पुण्यात राहणार होते.... माझं पुण्यात कुणी नसल्या कारणाने मी मुंबईला परत जावे असे त्यांचं म्हणणं पडलं. तीन दिवस मी त्यांच्या मरसीडिज मध्ये राहणे त्यांना स्तुत्य वाटत नव्हतं....म्हणून मुंबईला मरसीडिजने परत येत होतो.....

घाटात पाऊस सुरू झाला. एका वळणावर मला कुणाची तरी गाडी बंद पडलेली दिसली. का माहित नाहीं पण मी माझी गाडी स्लो केली. मागून वाहनं येत नाही असं बघून मी माझी गाडी त्या गाडीच्या बरोबरीने उभी केली....
गाडी बाहेर एक मुलगी पूर्ण भिजलेली उभी होती.
इतक्या पावसात ही गाडी बाहेर उभी म्हणजे गाडीचा ए.सी. सुध्दा ठप्प झाला असणार....आत बसवलं नसणार ..... उजव्या हातात मोबाईल घेऊन तो डाव्या हातावर मारीत होती....बहुतेक रेंज नसणार किंवा बॅटरी डाऊन होती.....

' माझी मदत हवी आहे का ? मी डाव्या हाताने काच खाली करत....जरा वरच्या पट्टीत म्हणालो.
' तिच्या डोळ्यात ' हो ' दिसत होत पण ' नाही ' म्हणाली....
मी थोडा पुढे गेलो आणि गाडी रिव्हर्स घेतली. खाली उतरलो....रिप रिप पाऊस सुरूच होता....
' काय झालं गाडीला....? '
' ड्रायव्हरला माहित आहे.... तो चालत चालत पुढे कुठेतरी गेला आहे....दहा मिनिट झाली....'
' मी बघू का ? होत असेल तर करतो नीट....'
ती नाखूष होती माझ्या ह्या बोलण्यावर....
' बघू का ? ' मी पुन्हा विचारलं.... ' तुमची ही मरसीडीज आहे आणि माझी ही मरसीडीज आहे....मी म्हणालो...
ह्या वाक्यवर तिने माझ्याकडे ज्या नजरेनी पाहिलं त्याचा अर्थ मी लगेच पकडला....
मी दिसायला अगदी सुमार होतो....त्यात माझ्या अंगभर मंकी व्हायरस मुळे राहिलेले फोड....तुच्छ  भावनेने दिलेला तो लूक....अहो घरचे मला ' डिफेक्टिव्ह पिस ' म्हणतात....तुम्ही नजरेनी म्हणताय मला कळतय  ....मी मनात म्हणालो....

' द्या चावी....मी काही पैसे घेणार नाही....गाडी रिपेअर करून देईन....'
' तुम्ही एक काम करा माझ्या वडिलांना फोन करा आणि त्यांना सांगा....गाडी बंद पडल्याचे....माझी मोबाईलची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली आहे...गाडीत चार्जिंगला लावला होता....पण लगेच बंद पडली
....ड्रायव्हरच्या मोबाईलला रेंज नव्हती...तुमच्या येते का बघा....'
' बघतो...नको एक काम करा....माझ्या फोन वरून तुम्हीच बोला त्यांच्याशी....मला चावी द्या मी बघतो....होईल चालू लगेच....'
' तुम्हाला गाडीतल काही कळत का ?... त्यात ' ही मर...'.....'
मी चावी घेतली.... सगळें प्रकार करून बघितले
 ....माझ्या लक्षात आलं नक्की काय बिनसले आहे ते....मी माझ्या गाडीच्या चावीने माझी डिकी उघडली....त्यातील एक चटई काढली....आणि गाडी खाली गेलो.... बराच वेळ काढला....कुठे तरी गाडी आपटली होती....आणि गाडीच्या वायर्स मध्ये पण काही डिफेक्ट दिसला....आणी काही लावलेले पार्टस खटकले....' हा नक्कीच   ' डिफेक्टिव्ह पिस ' आहे असं म्हणत मी खालून बाहेर आलो....कपड्यांची पूर्ण नासाडी झाली होती....चिखलात माखलेले डुक्कर....मी चटई गाडीच्या डिकीत टाकली....आणि गाडीतले दुसरे कपडे घातले.....पाऊस थांबला होता....थोडासा सूर्य डोकावूं लागला होता....पुन्हा बाईंच्या गाडी कडे येत....
' बाई हे नवीन मॉडेल आहे....पण माझ्या मते तुमच्या गळ्यात मारलेला हा डिफेक्टिव्ह पिस आहे...'
तिने एकदा गाडीकडे पाहिलं एकदा माझ्याकडे पाहिलं...
' सिरीयसली सांगतोय....पिस डिफेक्टिव्ह आहे... मी कित्येक वर्ष साई सर्व्हिस मध्ये चीफ फ्लोअर सुपरवायझर म्हणून गाड्यांची कामं कित्येक वर्ष बघायचो.... इतना तो मेरा हक बनता हैं....
मुंबईतील सगळ्या श्रीमंतांच्या गाड्या माझ्या हाता खालून गेल्या आहेत.... ' 
हे ऐकून ती काहीच बोलली नाही....
तिने माझ्याकडे फोन मागितला, वडिलांना फोन लावला....आणि मला परत दिला....
' काय म्हणतात ते ? '
' थांब म्हणाले....ते दुसरी गाडी पाठवतात म्हणाले '
' बाई माझ्यावर विश्वास ठेवा....ही गाडी आज चालू होणार नाही....शिवाय गाडी कुठे तरी आपटली आहे....अहो खूप प्रॉब्लेम्स आहेत ह्यात.... ऐका माझं ....तुम्ही माझ्या गाडीत बसा
....मी मुंबईला सोडतो....विश्वास ठेवा....माझ्या ह्या रुपावर जाऊ नका....मला माझी भावंडं '  डिफेक्टिव्ह पिस ' म्हणतात....पण कामाला मीच येतो सगळ्यांच्या....मी राम शिवगण....माझा फोन आहे तुमच्या वडिलांकडे....मग मी इंग्लिश मध्ये बोलून बाईला समजावलं.... माझं शिक्षण कमी असेल पण नियत एकदम साफ आहे म्हणालो....असे म्हणून मी माझ्या गाडीकडे जाऊ लागलो....
तिला तिच्या नशिबावर सोडून.....
' राम, राम....' हाक ऐकू आली.....

आम्हाला मध्ये तिचा ड्रायव्हर परत येताना दिसला....मी गाडी बाजूला घेतली....तिने त्याला गाडी कडेच थांबायला सांगितलं....वडिलांनी डिलरला फोन केला आहे...त्यांचा माणूस येईल आणि गाडी घेऊन जातील, मग तू घरी जा सांगितलं...त्याला पाचशे रुपये दिले....आम्ही निघालो....गाडीत त्या मागे बसल्या होत्या...एक शब्द बोलल्या नाहीत....

मी बाईना नेपियन सी रोडवर सोडून पुढे घरी गेलो....लकीली साठेंच्या मुलीची बॅग डिकीत होती....त्यातले कपडे बघा होतात का अस सांगून मी लांब जाऊन उभा राहिलो....तिने माझे ऐकले होते....त्यातली एक जोड तिने परिधान केली होती....म्हणजे आधी ती तयार नव्हती....पण ज्या वेळी मी तिला म्हटले तुम्ही ह्या अशा ओल्या बसलात तर सिट खराब होतील....त्यात त्याचे पांढरे शुभ्र कव्हर...ते पूर्ण खराब होईल....साठेना आवडणार नाही....लिफ्ट दिली म्हणून काहीच बोलणार नाहीत पण कव्हर्स.....ती हो म्हणाली होती....
मध्ये दोन मॉलस मध्ये थांबलो....एकदा फ्रेश व्हायला....आणि एकदा नाष्टा करायला....

आम्ही मुंबईला पोहचलो....मी त्यांना त्यांच्या बिल्डिंग खाली सोडले....बाई खाली उतरली आणि काहीही न बोलता निघून गेली..... श्रीमंतांच हे असच असत....मी घरी येऊन बायकोला सांगितल तेव्हा ती म्हणाली.....

                          *****
आणि एक महिन्यानंतर....

घरी यायला उशीर झाला होता....जेऊन झाल्यावर बायकोनी मला कुरिअर मधून एक जाडजूड एनव्हलोप आला होता तो दिला. 

एनव्हलोपवर नाव होत शिखु अडवानीच. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतो. आत तीन कागद होते. मी एक एक करून ते उघडले
.....
.....आणि माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली....

पहिलं लेटर.....शिखू अडवानी बरोबर मीटिंग होती....अडवानी आदी गोदरेजचा चीफ सेक्रेटरी होता....
मग दुसरे ....मला ड्रायव्हरचे ऑफर लेटर होते....

आणि तिसरे तर ....

मी साठेंकडून घेतलेल्या पैशात नवीन कपडे घेतले....काहीं उरले ते मी त्यांना परत दिले....

ठरलेल्या वेळेस मी विक्रोळीच्या गोदरेज हाऊस मध्ये पोहचलो....नवीन कपडे घातले होते तरी माझं रूप काही बदलले नव्हते....लोकांची नजर मला स्वीकारायला तयार नव्हती.... तुच्छतेनेच बघत होते सारे.... मंकी व्हायरस मुळे अंगावर राहिलेले फोड.....

मी बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर पोहचलो
....माझ्याकडचे पहिले पत्र बाहेर बसलेल्या मुलीला दिले....ती मला एका मोठ्या केबिन मध्ये घेऊन गेली....

प्रशस्त केबिन होतं....आत जाताच तिघ जण होते
.... मला बघून तिघेही उभे राहिले....
' या, बसा काय घेणार....? '
ज्या बाईना मी घरी सोडलं होत त्या हे म्हणाल्या होत्या....मला जरा नवलच वाटल....खाली उतरल्यावर ज्या बाईने माझे आभार सुध्दा मानले नव्हते ती हे सगळ म्हणत होती ?
मी चहा घेईन म्हणालो. 
एक शीखु अडवानी होता तर दुसरे आदी गोदरेज होते....
घरी कोण असत विचारून झाल्यावर मग शिक्षणवर प्रश्न सुरू झाले....मग ड्रायव्हर म्हणून राहणार का म्हणून प्रश्न सरू झाले....मग पगाराची अपेक्षा काय ? ह्यावर विषय सरकला.... मग कुठल्या गाड्या चालवता येतात ह्याची विचारपूस झाली....

माझं डोकं खूप फास्ट चालत होतं जणू मी गाडी १२० १३० च्या स्पीडनी पळवत होतो....पहिल्या दोन लेटर्सची उत्तरं मला मिळाली होती....आता हे तिसऱ्या लेटर बद्दल बोलणार का त्या बद्दल मी बोलायचं होतं काहीच कळायला मार्ग नव्हता...

कधी पासून जॉईन करू शकतो विचारू लागले
....मी साठेंबद्दल त्यांना सांगितलं....त्यांच्याशी बोलून घेतलं आहे म्हणाले....तुमची पूर्ण माहिती आहे आम्हाला....

मग त्या बाई बोलू लागल्या....म्हणाल्या माझा ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार तुला... राहतं घर सोडून मागे क्वार्टर आहेत तिकडे राहावं लागणार तुम्हाला....कंपनीची पॉलिसी आहे तशी....

मला राहवलं नाही....मी कोटाच्या खिशात हात घातला आणि तिसरं पत्र काढलं....म्हणालो ' हे मला कळलं नाही....हे काय आहे ? '

आता पहिल्यांदा आदी गोदरेज बोलू लागली....ते म्हणाले.....' एव्हढी महागडी कार ....ती डिफेक्टिव्ह आहे हे तू सांगू शकलास म्हणून आम्ही तुला ठेऊन घेत आहोत....एका महिन्यात गाडीच्या कंपनीशी आणि मुंबईतल्या डीलरशी आम्ही पत्र व्यवहार केला.... त्यांनां तुम्हीं सांगितलेले सगळे डीफेक्ट्स सांगितले.... त्यांनी कार नवीन देण्याचं कबूल केले आहे.....

त्या गाडीचा रीपेरींगचा खर्च साधारण दीड लाखाच्या घरात जाणार होता....आम्हाला जर तू हे लक्षात आणून दिले नसतेस तर कंपनी जे पार्टस बदलून देणार होती ते पार्टस वॉरंटी मध्ये येतं नाहीत म्हणून त्यांनी आमच्या कडून पैसे  घेऊन बदलून दिले असते....पण तसं झालं नाही
....तुझ्यामुळे.....आम्हाला नवीनच गाडी देऊ करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे....अरे आम्ही विचार केला आमचे इतके पैसे वाचवणारा तू तुला काही तरी मोबदला द्यायला हवा म्हणून आम्ही तुला नोकरी देण्याचं ठरवलं....आणि तुझ्या बँकेचं कर्ज फेडून टाकायचा निर्णय घेतला.....तुझे कर्ज अठ्ठेचाळीस हजार आहे,  ते फेडायच ठरवलं
.....हेच तुझं तिसरं लेटर.....

तर उद्या पासून रुजू हो....आम्ही एका महिन्यात साठेना नवीन ड्रायव्हर देण्याचं कबूल केलं आहे....

तू आमच्याकडे काम केल्यावर तुला कुणीच 
  *डिफेक्टिव्ह पिस* म्हणणार नाही....कारण ' वी आर नोन फॉर अवर क्वालिटी '...आमच्याकडे *डिफेक्टिव्ह पिस* तयार होत नाहीत....आणि मिळत देखील नाहीत.....

Saturday, July 24, 2021

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

*तुमच्या दुकानात देव मिळेल कां?* 
*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका  किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.* 

*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?* 

*त्या मुलाने दुकानदारास विचारले* 
*तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 

*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.* 

*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.* 

*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 

*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 

*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?* 

*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?* 

*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.* 

*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?* 
*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*
*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.* 
*आहे ना तुमच्या दुकानांत देव?* 

*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?* 

*फक्त एक रुपया बाबा.* 
*बरं, नको काळजी करू.*
*एक रुपयात देखील देव भेटेल!*

*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.* 

*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.* 

*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.* 

*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस,  तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.* 
*यालाच म्हणतात विश्वास ...* 
*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.* 

*तात्पर्य:* 
*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!*
🛕⛪🕋🕍🕌
🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸

माहीत नाही कोणी लिहलं आहे , पण छान msg दिला आहे म्हणून तुमच्याशी share केलं

Monday, June 7, 2021

*जगता आलं पाहिजे .

*जगता  आलं  पाहिजे . . .*

```मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा असला म्हणून काय झालं, 
कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो,
पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पाप काय कसंही करता येतं, 
पण पुण्य करता आलं पाहिजे,
ताठ काय कोणीही राहतं, 
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच, 
ती सहन करता आली पाहिजे,
मलमपट्टी करून तिला, 
पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,
वेडं होता आलं पाहिजे.
कशालाही बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरुन काढता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूचा मिलाफ करून
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे ...```

*आयुष्य  खूप  सुंदर  आहे  भरभरून  जगता  आलं पाहिजे...*
      

Sunday, May 16, 2021

भगवंताची मिठी...

भगवंताची मिठी... 

भगवंताचं होणं .......सोप्प नसतं हो भगवंताचं होणं...प्रचंङ निरागसता लागते...स्वच्छ मन लागतं. 

तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना..... 

कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा.......कुणाच्या यशात भक्कम साथ द्या.......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

कुणी कुणाचं नसतं हो.....तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा.....कुणाची ताई व्हा......कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ....मग बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना.....कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा....मग बघा..भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या.....थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.....मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल. 

आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय.....स्वतःच स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला....कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा....खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल....अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल.... 

व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या....अन्न द्या....ते आमरस नाही हो मागत....तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात......कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. 

आपल्याकङे आपलं असं काय आहे? ....भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो......मग त्यानी दिलेलं .....कघी कुणाला मनापासुन द्या.......मग बघा 

" भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही " 

🙏..🙏श्री स्वामी समर्थ

Wednesday, May 12, 2021

*एका शून्यातून तयार झालेला हिरो - बोमन इराणी!..*

*एका शून्यातून तयार झालेला हिरो - बोमन इराणी!..*

मित्रांनो,

बोमन इराणी तुम्हाला आवडतो का?

मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ. रस्तोगी,

थ्री इडियटस मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, प्रो. सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस,

आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 
  
पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का?

बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला, 

बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले,

बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती, 

सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला,

त्याला डिस्लेक्सिया नावाचा रोग होता, शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता,

बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे,

न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत, 

त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही. 

बोमनने स्वतःसाठी वेटरचा जॉब निवडला,

बोमनची आई कुटूंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा वगैरे तयार करुन पदार्थ विकायची, 

बोमनचे ग्रॅंट रोडवर फरसाण विक्री करायचे आठ बाय आठ फुटाचे एक छोटेशे टपरीवजा दुकान होते,

वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातुन जेमतेम उत्पन्न कमवायचा,

ग्रॅंट रोड हा मुंबईचा एक रेड लाईट एरीया आहे, सगळी रफ पब्लिक दुकानात यायची,

ह्या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली,

बोमनने साईड बिजनेस म्हणुन फोटोग्राफी सुरु केली,

१९९0-९२ तो काळ असेल,

बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा,

वीसवीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडीलांना विकायचा,

अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले,

लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन उटी फिरायला गेला,

जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणुन एक बजेटमधले हॉटेल त्याने बुक केले,

पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचे निघाले,

एखाद्या भुतबंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होते,

हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता,

बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहुन मला स्वतःचीच, माझ्या गरीबीचीच जबरद्स्त चीड आली,

“आयुष्यात पुन्हा कधी अशी ‘झिरो लाईट मोमोंट’ येऊ नये म्हणुन मी संपुर्ण जीवनभर मी झोकुन देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला,”

पुढे ह्या झिरो लाईटने बोमनचे आयुष्यच बदलावुन टाकले, 

बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलंपिकबद्द्ल माहिती मिळाली,

तो ऑलिंपीक च्या ऑफिसमध्ये गेला, व त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली,

पण तिथल्या डायरेक्टरने ती धुडकावुन लावली,

बोमनने अनेक अर्ज विनंत्या केल्या, आर्जवे केली,

मी फ्रीमध्ये काम करीन असे सांगितले, 

तेव्हा तो खडुस डायरेक्टर थोडासा नरमला, 

आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालु आहेत, त्याचे फोटो काढुन आण, 

तुझ्यातली गुणवत्ता बघुन तुला काम देऊ असे सांगितले,

बोमन कंबर कसुन कामाला लागला,

पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली,

*कसेही करुन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेच होते,*

*ह्या एकाच विचाराने त्याला पुर्ण झपाटले होते,*

*उठता-बसता, खाता पिता, त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोच दिसायचे,*

*माझं काम आणखीण उत्कृष्ट कसे होईल, हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा,*

*तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ - दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेस च्या ठिकाणी तळ ठोकुन बसायचा,*

त्यादरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शुट केले,

सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणुन फोटो काढायचे,
बोमन मात्र पॅशनेट होता, 

शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलंपिकचा ऑफिशीयल फोटोग्राफर म्हणुन बोमनचीच निवड झाली,

अमेरीकेतल्या मॅनेजरची बोमनने अपॉईंटमेंट घेतली,

त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली,

 एक अमेरीकन बॉक्सर समोरच्या मुष्ठियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा,

एक समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना, अमेरीकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा,

आणि तिसरा,

सामना जिंकल्यानंतर अमेरीकन बॉक्सरचा हात उंचवताना,

ह्या प्रत्येक फोटोबद्द्ल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते,

बोमन जोमाने कामाला लागला,

इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे सहा आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती,

आता यश अगदी दृष्टीपथात होते,

त्याने रिंगच्या बाजुचा एक योग्य कोपरा निवडला,

सामना सुरु झाला, पण बोमनचे नशीब त्याच्यावर जणु रुसले होते, 

बोमनचे ग्रह काही ठिक नव्हते की काय माहित पण त्या दिवशी अमेरीकन बॉक्सर सपाटुन मार खात होता,

तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती,

बोमनचे स्वप्न जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होते,

त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती,

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होते, अगदी तसेच दुःख त्याच्या मनात साठुन आले होते,

त्याच्या डोळ्यात पाणी तरळले, उर भरुन आला,

एकेक ठोसा अमेरीकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमनला होत होते,

बोमनने स्वतःला समजावले,

“मी आणखी मेहनत करीन, एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल,”

आणि त्याची आर्त प्रार्थना ब्रम्हांडापर्यंत जाऊन पोहोचली,

चमत्कार घडावा असे काही रिंगमध्ये घडले,

पंचेचाळीस मिनीटे मार खाणारा अमेरीकन बॉक्सर त्वेषाने उठला,

त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्धयाला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला, 

बोमनने तो क्षण अचुक टिपला, 

समोरचा बॉक्सर खाली पडला, बोमनने दुसरा क्लिक केला,

आणि अमेरीकन बॉक्सर विजेता झाला, बोमनने तिसरा क्लिक केला,

त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला,

त्याने तात्काळ धावतपळत स्कुटरवरुन आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली, मग टेलिफोन ऑफीसला पोहोचला,

तिथुन त्याने अमेरीकेला फोटोज स्कॅन करुन पाठवले.

पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरीकेला पोहोचले नाहीत, असा फोन आला,
दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हा टेलेफोन ऑफीसला पोहोचला,

ती मशीन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी पॅक करुन नेण्यात येणार आहे, असे त्याला सांगण्यात आले,

बोमन खवळला, त्याने तिथे प्रचंड आरडाओरडा केला,

सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळे भारताचे नाक कापले जाईल, असे त्याने ऑफीसरला ठासुन सांगितले,

त्याच्या ह्या ह्र्दापासुन केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला,

आणि पॅक केलेली मशीन उघडण्यात आली,

फोटो अमेरीकेला पाठवले गेले,

बोमनला नऊशे डॉलर्सची रॉयल्टी मिळाली,

त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आले,
बोमन स्वखुशीने गेला,

त्याने आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले, लोकांना जिंकुन घेतले,

त्याचा फोटो स्टुडीओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडीओ म्हणुन ओळखला जाऊ लागला,

एके दिवशी फोटोसेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडीओत सुप्रसिद्ध कोरीओग्राफर शामक दावर आला,

शामकने बोमनला नाटकात काम करशील का असे विचारले,

व त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अल्काझी पद्मसी यांच्यासोबत करुन दिली,
बोमन साशंक होता,

अल्काझीनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारले,

पण शामक दावर आपल्या मागणीवर अडुन राहीला,

अल्काझींना त्याने बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडुन देईन अशी धमकीच दिली,

बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटासा रोल मिळाला,

बोमनने त्याचेही सोने केले,

पुढची पाच सात वर्ष बोमनने नाटकाचे मैदान गाजवले,

अनेक उत्तमोत्तम भुमिका केल्या,

एकदा त्याचे नाटक विधु विनोद चोप्राने पाहिले, आणि त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले,

बोमन त्यासाठी तयार नव्हता,

पण राजु हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडीओत आला,

पंधरा मिनीटांसाठी ठरलेली ही भेट पुढचे आठ तास कशी चालली, हे दोघांनाही कळले नाही,

बोमनने स्वतःला राजुच्या हातात स्वाधीन केले,

आणि मुन्नाभाईमधले मामु नावाचे पात्र अवतरले,

ह्यावेळी बोमन पंचेचाळीस वर्षांचा होता,

त्यासाठी बोमनला त्यावर्षीचे बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले,

पुढे काही वर्षांनी थ्री ईडीयटस मध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भुमिका केली 

त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोतरे बोलण्याची खास लकब वापरली, 

मित्रांनो,

एक मंदबुद्धी, तोतरा बोलणारा, दहा एक वर्ष वेटरची कामे करुन, वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणुस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यु करतो काय,

आणि साठाव्या वर्षापर्यंत एंशी हुन अधिक चित्रपट काय करतो?  

सगळेच थक्क करुन टाकणारे आहे,

बोमन म्हणतो,

उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळेच माझ्या ह्र्द्यात आग लागली, आणि त्यामुळेच मी इथवर पोहचु शकलो आहे,

मित्रांनो, 

*जेव्हा केव्हा आयुष्यात , व्यवसायात ,कुटुंबात  कसली संकटे येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा....*

*त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा, त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा...*

*संकटावर मात करण्याची कितीतरी पट जास्त उर्जा तुम्हाला मिळेल.....*

*किती ही संकटे आली तरी घाबरु नका, धैर्याने तोंड द्या....*

*आभार आणि शुभेच्छा!*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*

Sunday, May 9, 2021

*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं.*



*अत्यंत महत्वपुर्ण लेख*

*आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात.*

*पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती. प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले. कॅन्सर, डायबेटीस, बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार...!*

*कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !*

*अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार. २० हजार - ३० हजार मशीनची किंमत.. मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!*

*सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी, वजन घटणार, बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले. हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली !!!*

*मग आली नोनी फळाची लाट. नोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली.*

*अलोव्हेरा ज्यूस...  सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !*

*मग रामदेव बाबांची बिस्किटे आली ५०००करोड चा व्यवसाय झाला. परिस्थिती आहे तीच.*

*मग माधवबागवाले आले. तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा. राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही. (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)*

*मग आली दिवेकर लाट, मग आली दीक्षित  लहर.*

*आता तर जग दोन भागात विभागले आहे. दार उल दिवेकर आणि दार उल दीक्षित.*

*ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!*

लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

डोकं वापरा
आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा

आणखी थोडं डोकं लावा
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र. 
रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."

आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...

.....आली लाट मारा उड्या

*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*

सकाळी लवकर उठणं, 
रात्री लवकर झोपणं, 
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. 

*आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*

*आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर  सुरुवात करायला काय हरकत आहे?*

दिर्घायुष्य लाभावं, 
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, 
या करीता आपला आहार, 
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे. 

*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*

*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*

आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. 
ताणतणाविरहित जीवन जगा. *ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच  स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
*आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा..*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*

Tuesday, May 4, 2021

पोक्तपणा

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀
                   🔸पोक्तपणा.🔸

तसे तिचे वय आठ नऊ वर्षा पेक्षा  जास्त नसावं.. घंटी सोडून सगळे अवयव अगदी नीट आवाज करणाऱ्या  सायकलवर ती आली ...सायकलच्या मागच्या कॕरेज वर कापसाच  बुचकं  बांधलेल होतं ...

समोर एक छोटा मुलगा बसलेला होता बहुदा तिचा लहान भाऊ असावा.. वेदनेनं विव्हळत ... सायकल तिने भिंतीच्या आधारे टेकवली... कदाचित स्टँड नसाव आधारासाठी.

" सर माह्या भावाला ईच्चु चावला हितं,

"कधी चावला .."

" कव्हानाच चावला .?"

"मग लवकर  आणायचे ना ."

"पैसे नव्हते सर .... जरा थांबून ती परत म्हणाली.

"याला किती  ईजंक्शन द्याव लागल .."

"बघतो हं ..", असे बोलून मी त्या बाळाला टेबल वर झोपवले.

"घरात कुणी  मोठे माणूस  नाही का ग? "

"हाय कि ,..आई वडील अन एक मोठा भाऊ हाय ...

मी त्या मुलाला लोकल वैगैरे दिल ...वेदना सहन करण्याची उपजत कला त्याला अवगत असावी ...वेदना प्रचंड होत असूनही तोंडातून आवाज येत नव्हता.

सगळं झाल्यावर मागे वळून बघितले  तर ती मुलगी जागेवर नव्हती. ओपिडी बाहेर डोकावून बघितले.

समोरच्या कापसाच्या काट्यावर ती सोबत आणलेले ते बुचके घेऊन ऊभी होती.

परत आली तेव्हा तिच्या हातात काही पैसे होते.

"सर किती  पैसे झाले तुमचे ?"

मी न एकल्यासारख करून तिला म्हटलं " याने  काही खाल्ले आहे का.?"

नई..., आता आनते कि ..

लगबगीने ती बाजुच्या टपरीवर गेली आणि आपल्या लहान भावासाठी चहा आणि बिस्कीट चा पुडा घेऊन आली ...

" सर ईथ बसु आमी"

मी न बोलताच तिला हो अस खूणविले...

लहान भावाला ती अगदी  प्रेमान चहा मध्ये एक एक बिस्किट बुडवुन खाऊ घालत होती ... तिच्या गालावर सुखलेल्या अश्रुंचा खारटपनाचा ओघ जानवत होता...

" आई वडील कुठे ग तुझे...?"

"कापूस येचताय "

आणि भाऊ ?

" तो रोजंदारीन गेलाय पहाटीच ...सांनच्याला येतु ."

बोलण्यातुन समजलं.

ती ही कापुस वेचत होती शेतात .. आई वडीलांच्या सोबत. मध्येच  लहानग्याला विंचु चावला पण पदराला पैसे नसल्या कारणाने थोडासा कापूस तिने विकायला सोबत आणला होता.

परिस्थिती ने जघडून ठेवलेल्या कारणामुळे आई वडीलांना हलणे शक्य नव्हते. ह्या लहानग्या मूलीने आपल्या लहान भावाला दवाखान्यात सात- आठ  किलोमीटर सायकल वर बसवुन इथं  पर्यंत आणले होते.

खरंच परिस्थिती सगळं  शिकवायला भाग पाडते .. आपल्या पोटच्या गोळ्याला इतक्या वेदना होत असतानाही आपण त्याच्या सोबत  जाऊ शकत नाही असे वागताना त्या आईच्या ह्रदयाला कसला पीळ पडला असेल..?

खेळण्या बागडण्याच्या वयात त्या मुलीत आलेला समजदारपणा.. पोक्तपणा जबाबदारीची जाणीव बहीण भावात असलेले प्रेम हे सगळच गहिवरुन टाकणारे होतं.

"पैसे किती द्यायचे ?" .. जातान तिनं  विचारले ..

तिच्या मध्येच बोलल्याने मी माझ्या विचार चक्रातून बाहेर पडलो ..

मी तीला म्हटलं " राहू दे ".. तिचे डोळे पानावले ...म्हनाली..*

" तसं नई सर.. पूढल्या येळी यतानं लाज वाटल" " ...

हातात उरलेल चिल्लर पैसे टेबलावर ठेऊन ती बाहेर पडली ... पाठमोरी असतानाही तिचा हुंदका मला स्पष्ट ऐकू आला....!
                                  
©@डॉ .प्रविण तांबे, ७७०९५८६०८२

Monday, May 3, 2021

भेट

*भेट*

*आयुष्यात भेटणारं कोणीच* 
*अकारण भेटत नसतं.*

*विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं*
*आयुष्यातलं ते एक पान असतं.*

*भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून*
*काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं.*

*म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या* 
*भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं.*

*मित्र असोत वा शत्रू*
*प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं.*

*ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने*
*आपापलं ठरवायचं असतं.*

*शंभर टक्के चांगलं किंवा* 
*शंभर टक्के वाईट कोणीच नसतं.* 

*प्रत्येकात चांगलं असं*
*काही ना काही दडलेलंच असतं.*

*त्यातलं चांगलं ते अधिक* 
*आणि वाईट ते उणे करायचं असतं.*

*"मीपण" पूर्ण वजा करून*
*"माणूसपण" तेवढं जमा ठेवायचं असतं.*

*स्वतःसाठी जगताना*  *दुसऱ्यासाठीही*
*जगता येतं का पाहायचं असतं.*

*कोणासाठी आधारवड तर कोणासाठी*
*श्रावणधारा होऊन बरसायचं असतं.*

*म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात*
*माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे.*

*त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं*
*माझ्या नावचं फक्त एक पान असू दे!*
🌹🌹👌👌🌹🌹👍👍🌹🌹🙏🙏🌹🌹

Sunday, April 25, 2021

सायकलवाली आई

🚲 सायकलवाली आई 👩‍👦
➿➿➿➿➿➿➿➿
       तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय ... ओळख अशी खास नाही पण ' ती ' साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू. आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ' ती ' एकदम वेगळी ... एकमेव सायकलवर येणारी आई.     
          आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे ... ही त्यापैकी नव्हे. सायकल चालविणे हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो हे त्यांना पटतच नाही. 
        ती सावळी आरस्पानी ... आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली.... साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची ...... गळ्यात चार मणि हातात दोनच  काचेच्या बांगड्या. माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सिटवर तिचा मुलगा .... त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये म्हणून मस्त मउ ब्लॅंकेटची घडी घातलेली.... लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणित असे. लेक निटनेटका ... स्वच्छ कपडे ... बूटांना पॉलिश. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची .... जणू त्याच शाळेत जाणं ती अनुभवतेय ... जगतेय.
              हळूहळू काहीबाही कळायच तिच्या बद्दल.... ती पोळ्या करायची लोकांकडे... फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता की नव्हता  कोण जाणे... पण तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 
           एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली ...
" अग तो बघ तो first आला ना so मी  second आले ..." आणि मोठ्यांदा भोकाड पसरल. 
मी त्याची paper sheet पाहिली ... मोत्यासारख अक्षर ... अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले " बघ बघ ... याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? " माझे डोळे संताप ओकत होते. त्याची आई शांतपणे म्हणाली " कुणीतरी पहिलं आलय म्हणून तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! "  ..... सणसणीत चपराक. मी निरुत्तर. मी खोचकपणे विचारल  "कोणत्या क्लासला पाठवता याला? " ती म्हणाली
" मी घरीच घेते करून जमेल तसं... .. मुलांना नेमक काय शिकवतात ते कळायला हवे ना आपल्याला. " तेव्हाच कळलं हे रसायन काहीतरी वेगळ आहे.
         हळूहळू तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली तर कधी मिच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची.... सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .
          पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले ... तेव्हा भरभरून म्हणाली. ....
 " टिचरने खूप कौतुक केले फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. " मी तिच मनापासून ऐकू लागले ... 
" छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले ... अकरावीत असताना मामाने लग्न लावले... शिकायच राहूनच गेल .. फार इच्छा होती हो ! "... डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली... " आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी... एका teacher शी बोलणं झालय त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात .... बारावीचा फॉर्म भरलाय ... उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको ." म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून ती निघाली.
        मुलांना रेसचा घोडा समजणारी "रेस कोर्स मम्मा",  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी "मेकअप मम्मा" , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी "फिटनेस मम्मा " स्वतः पोस्ट ग्रज्युवेट असूनही नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी "बिझी मम्मा" किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी 
" जोहरी मम्मा " ... ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला.........या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक " आई " भेटली. अशी आई जी एक स्त्री म्हणून.... माणूस म्हणून... आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे... कणखर आहे. फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात... सायकलवाली आई त्यातलीच एक ..... 🙏🏻
🔏©️ यशश्री रहाळकर
( लेख आवडल्यास नक्कीच forward करा पण कोणतीही काटछाट न करता मूळ लेखकाचे नावासह ही विनंती ... धन्यवाद! )

Saturday, April 17, 2021

थँक्स बाबासाहेब

ती माझी कलीग, 
माझ्या पुढच्याच डेक्सवर काम करते...
मस्त स्माईल करत रोज मला गुड मॉर्निंग सर म्हणते...
रोज माझ्या रिप्लायमध्ये जोराचा जयभीम असतो...
तिला थोडं आॅकवर्ड फील होतं माझ्या अशा रिप्लायमुळे...
एक दिवस ती मला म्हणाली
माझं एका मुलावर प्रेम आहे, लग्न करायचं आहे
पण घरचे विरोध करत आहेत
मी म्हटलं संविधान आहे तुझ्यासोबत,  
बालिग झाली आहेस
तू निवड तुझा साथीदार बिनधास्त...
काही दिवसांनी ती मिठाई घेऊन आली
थँक्स सर, मी कोर्टात लग्न केलंय....
मी म्हटलं
एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब .....
नंतर काही दिवसांनी, आनंदानी ती आई होणार म्हटली
पण , ऑफिसच काय? 
मी म्हटलं तू का टेंशन घेतेस, 
टाक की , प्रेग्नेंसी रजा, फुल पगारी...
ती परत आनंदी होऊन थँक्स सर म्हटली..
मी म्हटलं
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...
एक दिवस , आश्चर्य चकित होऊन म्हटली
सर ,माझा भाऊ मला भेटायला आला, 
सर्व काही विसरून
त्याला आमची जमीन विकायची म्हणतो, 
वारस म्हणून  हात जोडून सही मागत होता.
तो सर्व विसरला, 
माझ्या लेकराला खेळणी आणला,
मी तर खूप खुश आहे म्हणत, 
हात जोडून देवाचे आभार मानत होती...
मी  म्हटलं, 
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...
तिला हळू हळू बाबासाहेब कळू लागले..
शिक्षण, नोकरी, बस-ट्रेनमधील आरक्षित तिकिटासाठी
या सर्वांसाठी, ती म्हणू लागली
थँक्स बाबासाहेब.....
ती आठवत होती तिच्या पूर्वजांना
सती गेलेल्या तिच्या आईच्या आईला..
केशवपन झालेल्या तिच्या बाबाच्या आईला...
चूल आणि मूल करत , नवऱ्याचा मार खाणाऱ्या
हालअपेष्टा सहन केलेल्या तिच्या स्वतःच्या आईला...
आणि तिच्या मनातून आवाज निघाला..
थँक्स बाबासाहेब.....
दुसऱ्यादिवशी मी जरा लवकरच गेलो ऑफिसमध्ये 
तर काय, 
तिच्या डेक्सवर खूप मोठी बाबासाहेबांची प्रतिमा आणि
खाली लिहलेलं थँक्स बाबासाहेब...
तेवढ्याच तिकडून तिचा आवाज आला
जयभीम सर...
ती सांगत होती, 
सर माझी मैत्रीण आमदार झाली आहे
ती, देवाला, पक्ष प्रमुखाला, नवऱ्याला जनतेला सर्वांना थँक्स म्हणत होती...
मी तिला म्हटलं, 
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...!
Copied 
     
                      कवी-  Mukesh Kamble सर
                      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
                      मो.न. ९६२३९७१५९०

Wednesday, April 14, 2021

देववेडी

देववेडी

लेखिका-गौरी ब्रह्मे.

       आस्तिक माणसं असतात, नास्तिक असतात, धड ना सश्रद्ध, ना धड अश्रद्ध माणसं असतात, अंधश्रद्धाळू, देवभोळी माणसं असतात. पण देववेडी माणसं असतात का? 
        माझ्या सासूबाईंकडे पाहिलं की 'हो' असंच उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या देवावरच्या श्रद्धेबद्दल लिहायचं म्हणलं तर एक छोटेखानी पुस्तक होईल. तूर्तास त्यांच्या नैवेद्यप्रेमाबद्दल....
        सामान्य माणसाला प्रश्न पडतो, 'आज जेवायला काय?' माझ्या सासूबाईंना प्रश्न पडतो, 'आज नैवेद्याला काय?' दूधसाखर, खडीसाखर, गूळखोबरं, हे तर चिल्लेपिल्ले नैवेद्य झाले, पण घरात जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनेल, फळं असतील, कोणताही उत्तम पदार्थ असेल, त्या आजतागायत एकदाही नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवलेल्या नाहीत. 
        लहान मुलांना जसा खाऊ पाहिल्यावर आनंद होतो, तसा माझ्या सासूबाईंना देवासाठी बनवलेला नैवेद्य पाहिल्यावर होतो. 
         नैवेद्य दाखवताना त्यांच्या चेहऱ्याकडे पहावं फक्त. आई जसं प्रेमाने आपल्या लेकराला भरवते त्याच ममतेने, श्रद्धेने त्या नैवेद्य दाखवतात. मी त्यांची सून म्हणून कौतुक करते आहे असं नाही, मला स्वतःला ठरवून देखील इतकं सश्रद्ध होता येणार नाही. पण देवाबद्दल इतकं प्रेम की त्याला आपल्या अस्तित्वाचा एक भाग मानून, निरपेक्ष भावाने जीवन जगण्याचं गणित जे त्यांना जमलेलं आहे, ते माझ्या पिढीतल्यांसाठी खरोखरी आश्चर्यकारक आहे. केवळ 'तेच योग्य आहे आणि प्रत्येकाने असंच असावं' असं अजिबात नाही. पण देववेड्या माणसांना परमेश्वर अंमळ जास्त सुखी ठेवतो असं मला वाटतं, कारण त्यांची श्रद्धा त्यांना जास्त rooted (याला समांतर मराठी शब्द काय असावा याचा विचार करते आहे) ठेवते... बाकी अश्रद्ध माणसाची सुद्धा कशा न कशावर तरी श्रद्धा असतेच! तो देवच असेल असं नाही. पण कोणी मान्य करतं कोणी करत नाही.
        गेली अनेक वर्ष माझ्या सासूबाई सकाळचा चहासुद्धा देवाला दाखवून मग पितायत. हा एखाद्याला वेडेपणा वाटेल, पण ज्याचं अस्तित्व एखाद्याशी घट्ट बांधलेलं असतं त्या माणसासाठी हे अगदी नॉर्मल आहे. 
        आम्ही बाहेर काही खरेदीला निघालो, की त्या आवर्जून सांगतात, "आमच्या देवाला काहीतरी आणा ग." हे म्हणजे असं झालं, की आमच्या बाळाला येताना काहीतरी खाऊ घेऊन या बरं का", इतकं ममत्व असतं त्यात. मग आपण लाडूपेढेमिठाई आणली तरी चालते किंवा अगदी तीन केळी आणली तरीही त्यांना चालतात. मुद्दा असा की देव उपाशी राहिला नाही पाहिजे. गोडाधोडाचं काही आणलं की त्या पहिलं देवाचं काढून ठेवणार, मग काय खायचंय ते खा म्हणणार. यातलं गमक इतकंच की आपण जे खातो पितो त्यातलं आधी 'त्याचं' थोडं मग आपलं. आवडते पदार्थ एकट्याने खाणं सोपं आहे, पण त्यातला थोडा भाग दुसऱ्यासाठी आधी काढून ठेवणं, मनावर संयम ठेवायला शिकवणारी यापेक्षा दुसरी अजून कोणती चांगली रीत असेल? 
        एखाद्या दिवशी उपवास असेल तर त्या आवर्जून वरईचे तांदूळ, दाण्याची आमटी, थालीपीठ, खिचडी, जे काही केलं असेल ते आधी नैवेद्य दाखवणार मग स्वतः खाणार. 
        मी त्यांना मजेत विचारते, "आई, देवाला कसले उपवास करायला लावता?" तेव्हा त्या म्हणतात, "अग बिचारा गोड खाऊन कंटाळला असेल, त्याला पण खावंसं वाटतं ना अधेमधे जरा चमचमीत उपवासाचे पदार्थ. आपल्याला लागतो ना चेंज? मग त्यालाही नको का?" तात्पर्य काय, तर तो आपल्यातलाच एक आहे, फक्त जरा जास्त स्पेशल आहे, कारण त्याला आपली काळजी आहे.
         नवरात्रात आमच्या देवीची जी काही चैन असते ती विचारू नका. त्यांची मुलं, सुना, देवीसाठी भरपूर मिठाई, फळफळावळ आणून देतात, पण याव्यतिरिक्त, नवरात्रात पूजा झाली, की त्या दररोज दुपारी कालवलेला दहीदूध सायभात असा नैवेद्य दाखवतात. यामागचा विचार काय? तर 'देवी नऊ दिवस लढाई करून दमली आहे ना, मग तिला शांत करणारं, शक्ती देणारं अन्न नको? म्हणून तिच्यासाठी हा छान कालवलेला भात.' त्यांचे स्वतःचे नऊ दिवस उपवास असतात, त्यामुळे हा नैवेद्याचा भात माझ्या वाट्याला येतो. 
       कॉलेजमधून दुपारी दमूनभागून आले की त्या नैवेद्याच्या भाताचा कुंडा माझ्या हातात आला की जणू स्वर्गसुख लाभतं! तो भात खाऊन इतकं तृप्त व्हायला होतं की दुसरं काही खावंसं वाटतंच नाही. मलादेखील ते अन्न शांतवतं, शक्ती देतं.
        देवाच्या नैवेद्यात काय जादू असते समजत नाही! पण तो वेगळाच लागतो हे खरं. सत्यनारायणाचा प्रसाद मी केलेला चांगला होतो पण माझ्या सासूबाईंनी केलेला अतिशय चांगला होतो. असं का? मला नेहमी प्रश्न पडतो. त्यात त्यांच्या भक्तीची, देवावरच्या प्रेमाची चव उतरलेली असते की काय? असणारच. 
        त्या स्वतः निस्सीम श्रीकृष्णभक्त आहेत. दर पंधरा दिवसाला जेव्हा घरात लोणी निघतं, तेव्हा आमच्या श्रीकृष्णाची काय चंगळ असेल विचार करा. चांदीची वाटी भरून लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याची चव जगातल्या कोणत्याही चीज, बटर, आणि डीपला नाही बरं का!
        इतका सगळा नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही त्यांना कधीतरी चेष्टेत म्हणतो "अहो किती खायला घालताय तुमच्या देवाला. दमला तो खाऊन खाऊन. अजीर्ण होत असेल बिचाऱ्याला." त्यावर त्या रागावून म्हणतात, "काही अजीर्ण वगैरे होत नाही. ही काय मी घरी केलेली सुपारी पण ठेवते आहे की त्याच्यासमोर."! 😊
        प्रश्न आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा नसतो. तर तुम्ही तुमचं काम, कर्म, आचरण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याचा असतो.
गौरी ब्रह्मे.

Tuesday, April 13, 2021

#भीमोत्सव_२०२१

#भीमोत्सव_२०२१
💙   #बा_भीमा...
मला कळत ही नव्हतं 
तेव्हापासून अगदी तेव्हापासून 
मी तुला माझ्या घरच्या भिंतीवर पाहतोय.....

ज्या घरात कोणाला नेटके कपडे घालयचीही माहिती नव्हती 
त्या घरात तू कायम कोट घालून,
खिशाला पेन लावून,
हातात मोठ्ठालं जाड पुस्तक घेऊन 
तू मला रोज दिसायचास.....

तुझ्या शेजारचा #बुद्ध
 कायम डोळे बंद करुन बसलेला असायचा.....

तू नक्की कोण आहेस ? 
आमच्या घरात का  आहेस ?
हे कोणाला तसं नीट संगता आलं नव्हत.....

तू पहिल्यांदा भेटलास तो बालभारतीच्या पुस्तकात 
आणि कुणास ठावूक का पण उर भरून आलं.....

असं वाटलं की जणू आपल्याच घरातलं 
आपलच कोणीतरी पुस्तकात छापून  आलय.....
 
"विद्यार्थ्यानो जागे व्हा" 
अश्या नावाच्या त्या धड्यात 
तू म्हणालास की 
आजचा विद्यार्थी 
उद्याच्या देशाचं भवितव्य आहे.....
 
म्हणून अजुन वाचत गेलो 
पण ते लगेच संपलं.....

वाटलं की तुला अजुन खुप काही बोलायचय,
म्हणून मी तुला मग 
शाळेच्या सर्व पुस्तकात शोधू लागलो.....

पण तू काही पुन्हा तिथे सापडला नाहीस.....

शाळा संपली,
आता तुला भेटायचं म्हणून 
मी तू स्थापन केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला.....
आणि माझा शोध संपला.....

तू अंशा अंशाने,
विखुरलेला होतास, 
हजारएक स्क्वेअरफुट च्या लायब्ररीत.....

मग टप्प्या टप्प्याने मी तुला जमवत गेलो.....

एखादं लहान मूल जसं आवडीने  जिग सॉ खेळतं 
तसं तुला जोड़त गेलो 
तेव्हा मला सापडली 
एक विचारधारा.....

एका विचाराची वंशावळ
जी हजारो वर्षांपासून अबाधित आहे.....

आणि आणखी करोडो वर्षे अबाधित राहिल.....

आता माझ्या जगण्याला 
खऱ्या अर्थाने दिशा मिळाली होती.....
 
माझ्या घरातला #बुद्ध 
आता डोळे मिटून ध्यान लावत नाही 
तो आता 
#सम्यक_सम्बुद्ध झालाय,
अर्हत झालाय,
आणि तो आता उभा राहून चालू लागलाय 
जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगत.....

माझ्या घरात आता 
सत्याचा शोध घेणारे #महात्मा_फुले आलेत 
फुलेंसोबत शिक्षणाचा प्रसार करायला #सावित्रीमाई इथेही त्यांच्यासोबत आल्यात,
सर्वांना समान संधी आणि न्याय देण्यासाठी #छत्रपति #शाहू_महाराज सुद्धा आलेत,
आणि या सर्वाना सोबत घेऊन स्वतःचं राज्य निर्माण कर असं सांगायला #शिवाजी_महाराजही आलेत.....

#बा_भीमा
तूझ्या सोबतच तू मला 
या सगळ्यांशी भेटवलस.....

स्वभिमानाने जगायला 
मला तू शिकवलस.....

भिंतीवरचा तू 
आता थेट हृदयात उतरलायस.....

मेंदुतुन भिनला जाऊन 
थेट रक्तात मिसळलायस.....

आता एकवेळ 
मी संपेन 
पण माझ्यातला 
तुझा अंश
कायम चेतवीत राहील 
अनेक "माणसांना"
जसं तू चेतवलंस मला.....

 #जय_भीम

Friday, March 19, 2021

वयाची ६० वर्षे

*वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*
*१.* :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू-हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    
*२.* :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
*३.* :-  वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    
*४.* :-  एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. 
परिचारिका { 'nursing staff' } वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार ? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  
*५.* :-  आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.
शेवटची घटीका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, ...
*एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका.
 *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* 
आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. 
*कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* 
निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर
आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  
*... महिना संपत आला,*
*... वर्ष संपायला आले,*
*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*
*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे ?*  
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*
*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...* 
*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*  
*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*  
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
*... हे नंतर करेन*
*... हे नंतर सांगीन*
*... यावर नंतर विचार करेन*
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  
*" आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.
'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात
उदाहरणार्थ ... उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब
*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*  
*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*
तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे ? कारण..,
 *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*
*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोचावा.*

*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.*

*एका इंग्रजी लेखाचा उत्कृष्ठ मराठी अनुवाद!*

खरा पुरूष

काल एका ग्रुपवर एका 'हिज डे' बद्दल पोस्ट वाचली. वाचल्या वाचल्या, मला माझ्या आयूष्यातला एकं खरा खुरा किस्सा आठवला. काही किस्से आयूष्यभर मनात खोलवरं रुतून बसलेले असतातं, त्यातलाच हा एक..!

मी शाळेतून एस.टी ने घरी येत होतो. मनासारखी जागा मिळालेली होती. माझ्या बाजूच्या रांगेत, मला समांतरच लागून असलेल्या दोन आसनी सीटवर, एक साधारण तीस वर्षीय तरुण बाई तिच्या लेकराला घेऊन' बसलेली होती.

येलदरीला गाडी आली तसे काही प्रवासी उतरले. त्यापेक्षा डबल गाडीत चढले. जेवढी गाडी रिकामी होती, सर्वच्या सर्व भरली. प्रवासी चढल्यावर सर्वात शेवटी 'तो/ती हिजडा' गाडीत चढला. त्याने दरवाज्यातूनचं, पूर्ण एस.टी त नजर टाकली. त्याला, बसायला कुठेच जागा दिसली नाही.

बायकांना, म्हाताऱ्यांना कोणीही स्वत: उठुन जागा देईल, पण अशा लोकांना जागा तर दुरचं, कोणी जवळही य़ेऊ देत नव्हतं. सर्वजण अंग चोरुन घेत होते. बायका जणू काही त्याच्या अंगाचा घाण वास येत असल्यासारखं, नाकाला साडीचा पदर लावून बसल्या.

त्याला दरवाज्यातूनचं, माझ्या बाचूजी ती बाई व लेकरु दिसले. तो तसाचं पुढे त्या बाईजवळ आला. तो आपल्याकडं येत असल्याचं दिसताचं, त्या बाईनं ईतक्यावेळ लेकराला मोकळं बसता यावं म्हणून पायाजवळ ठेवलेली 'पिशवी' सीटवरं दोघांच्या मधात ठेवली. पुर्ण सीट भरुन टाकलं.

'अम्मा.. थोडी जगा दे नाऽऽ'! तो तिच्याजवळ जाऊन अलगद स्वरात आर्जवं करु लागला.

'जगा कहाँ है..? जगा नही है!' ती बाई नाकाला पदर लावून पुटपूटली.

'बच्चे को, गोद मे लेगी तो जगह हो जायेगी अम्माऽऽ..!'

'मै बहोत दुरसे उसको गोंद मे बिठाकरही आई हुँ! अभी नही बिठा सकती.!'

'तो ठिक है! मै मेरे गोद मे लेता हुँ! चलेगा..?'

ह्या संभाषणाच्या वेळी, सर्व गाडीतील लोकं त्या दोघांकडचं पहातं होते. हे त्या बाईच्या लक्षात आलं. लोकांच्या नजरा चूकवायला म्हणून तीने त्याला, लेकराला मांडीवर घेऊन बसायला परवानगी दिली. अर्थातच, मधातली ती पिशवी 'हिजडा व स्त्री' ह्या दोघांमधली मोठी भिंत झाली होती. त्याचा चूकुन स्पर्श झाला तर..? अशी भिती तीला वाटत असेल नाऽऽ?

पुढचा प्रवासं सुरु झाला. तो 'हिजडा' त्या लेकराला आदळआपट होऊन लागू नये, म्हणून खूप काळजी घेतं होता. समोरच्या सीटावर हातं पालथा ठेऊन लेकराच कपाळ आदळणार नाही ह्याची दक्षता घेत होता. अलगद हाताने गालगूच्चे घे, पायाला गुदगूल्या कर, त्याचा हातं आपल्या गालावर मोरपिसासारखा हळूवार फिरवं.. असे लाडीक खेळं चालू होते.

पुढे काही वेळातच मानकेश्वर आलं. काही प्रवासी उतरले. माझ्या बाजूचा प्रवासी उतरण्यासाठी उभा राहीला, तसा तो 'हिजडा' माझ्या बाजूच्या रिकाम्या झालेल्या सीटावर बसायला येण्यासाठी उठला.

केवळ दहा मिनिटातचं, त्याचं त्या लेकराबद्दल प्रेम उफाळून आलं म्हणा किंवा जगाची रीत म्हणाऽ, त्याने सर्वासमोर ब्लाऊजमध्ये हात घालून 'दहा' रुपये काढुण त्या लेकराच्या हातावर ठेवले.

ती बाई त्याचे पैसे नको नको म्हणत होती. तेव्हा..

' अम्मा, बच्चेको बिस्कुट खिला देना.! म्हणत म्हणत त्याने त्याचे दोन्ही हात त्या लेकराच्या कानशिलावरुन फिरवून पालथ्या हाथाने स्वत:च्या कानशिलाजवळ नेऊन बोटं मोडले. त्याची नजर काढली. व त्या लेकराला घेऊन माझ्या बाजूला येऊन बसला. बाई सुद्धा काही म्हणाली नाही. लेकरुही त्याच्यातं आईच 'प्रेम' पहातच होतं. रुळलं होतं.

तो माझ्या बाजूच्या सीटावर येऊन बसला. पुन्हा त्या दोघांचे लाडीवाळ खेळ चालू होते. तोच, मानकेश्वरहुन एक टापटीप मनुष्य गाडीत शिरला. आता गाडीत त्या बाईच्या बाजूची सीट रिकामीच होती. म्हणून तो त्या जागेवर येऊन बसला. आताही ती पिशवी 'पुरुष व स्त्री' ह्या दोघामधली भिंत होतीच.!

सर्व काही शांततेतं चालू होत. तो हिजडा लेकराला बोलतं होता, खेळवतं होता. बाकी प्रवासी आपल्या कामात, स्वप्नात दंग होते. अचानकऽ, काय झालं काही कळालचं नाही. कोनाच्या तरी कानशिलात लगावल्याचा जोरात आवाज आला. बाजूला वळून पाहील तर, त्या 'हिजड्या' ने त्या टापटीप पुरूषाच्या कानाखाली वाजवली होती. त्याचा मार एवढ्या जोरात बसला होता की, तो पुरूष एका चापटीत, समोरच्या लोंखंडी दांड्यावर आदळला. ओठ आदळल्याने ओठातून रक्त निघत होत..

सर्वजण अवाक् झाले. नेमकं काय झाल हे कोणालाच कळाल नव्हतं.

'क्यु रे गांडुऽ? तेरे घरमे माँ बहण नही है क्या..? या फिर वो बसमे नही जाती..?' हिजडा त्या पुरूषाला दरडावतं म्हणालां.

अकेली औरतं मौका नही होती साहबं, जिम्मेदारी होती है!!

तो 'टापटीप इसम' तसाच, डावा हात गालावर धरुन, उजव्या हाताने खिशातला रुमाल काढुण ओठावर धरू लागला. लाजीरवाणं पाहुन नजर चुकवू लागला. सर्वासमोर मार खाल्ला त्याच दुख: जास्त होत कि केवळ एका 'हिजड्याचा' मार खाल्ला ह्याच दुख: जास्त होत, हे काही त्याच्या चेहऱ्यावरुन कळाल नाही.पण, बाईला छेडल्याची चोरी कोणीतरी पकडली व सर्वासमोर धिंदोडा केल्याने, 'लाजीरवाणे' भाव मात्र आले होते.

नंतर, 'हिजडा' माझ्या बाजूलाच बसल्या असल्या कारणाने त्याने सांगीतले कि, तो पुरूष जेव्हापासून त्या बाईच्या बाजूला बसला तेव्हापासून त्या पिशवीवर कोपरा ठेऊन, सीटावर वरी हात करुन, त्या लेकराच्या आईच्या अंगाला स्पर्श करु पहात होता. ती बिचारी अंग चोरुन चोरुन बसत होती. एकदा झालऽ दोनदा झालऽ..! त्याला त्याचा रागं अनावर झाला व पुढे जे घडल ते सर्वासमोरचं होतं

मी मनातल्या मनात विचार करु लागलो.. खरा 'हिजडा' कोण..? जो केवळ नशीबाने झाला, पण अंगी असलेल्या 'स्त्री'मधली 'आई' जागा ठेवणारा, वेळप्रसंगी स्त्रीच रक्षण करण्यासाठी 'मर्द' होणारा..? कि केवळ दोन मांड्यामध्ये जास्तीचा अवयव असल्याने स्वत: ला पुरूष म्हणवून घेऊन राक्षसी कृत्य करणारा..??

आज, तो 'हिजडा'च खरा पुरूष होता. खरा 'आई' होता.!! 🙏🙏


Wednesday, March 17, 2021

*परत येण्याची वेळ*

आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास,
“परत फिरण्याची” तयारी सुरू करा....आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 

*का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?*
जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला *टॉल्स्टॉयची* प्रसिद्ध कथा आठवते..

*परत येणे ..कधीच सोपे नसते*

एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला मी गरीब आहे ,
माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे.   
राजा दयाळू होता. त्याने विचारले तुला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे ?
माणूस म्हणाला , कसायला थोडी जमीन द्या. 
राजा म्हणाला, उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. 
तु चालु शकशील, धावु शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. परंतु लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच  *सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल* , अन्यथा काहीही मिळणार नाही!

माणूस खुष झाला, 
 तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला  सूर्य माथ्यावर चढला होता ,  पण माणूस धावयचं थांबला नाही .. *अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती* ! 

संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, *त्याला परत यावं लागेल*, नाहीतर त्याला काही मिळणार नाही! त्याने पाहिले की तो खुप दूर आला आहे .. आता परत यायचे होते .. सूर्य पश्चिमेकडे वळला होता .. तो थकला होता. परत पोहोचायचे होते . पण वेळ वेगाने निघुन जात होती . अजून थोडी मेहनत .न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला . पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं. तो खाली पडला  .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:

*याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता*! 

आता आपण त्या *माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा*. आपण तीच चूक करीत नाही ना ? 
*आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत*! 
आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही परत येण्याची तयारी करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो.आजपर्यंत मी कुठे पोहचलो? मला कुठे जायचे आहे , &  मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन ?  
*हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा*! 

सूर्यास्ताची वेळ  लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही. 
थोडं थांबा, आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय. 
*किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा* !  🙏🙏🙏
*माझे कुटुंब माझी जबाबदारी*

Tuesday, March 16, 2021

*जैसे ज्याचे कर्म तैसे..फळ देतसे विठ्ठल*



-एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"
तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर"
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"
तर तो तरुण म्हणाला, 
*ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.*
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 
****
 तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्म रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 
*कर्म हे असे एक हॉटेल आहे,*
*जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.*
*तिथे तुम्हाला तेच मिळते*
*जे तुम्ही शिजवलेले असते.*
कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं सांगतो.....
"दाग तेरे दामन के धुले न धुले 
नेकी तेरी कही तुले न तुले 
मांग ले गलतियो कि माफी 
कभी तो खुदसे हि 
क्या पता ये आँखे ...
कल खुले न खुले !
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖

Tuesday, March 9, 2021

आमची मुंबई

आज ऑफिसमध्ये कामानिमित्त एका आजी आजोबांची भेट झाली. त्यांचं काम होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. मी माझं काम करत होतो. साधारण दिड तास ते दोघे बसून होते. आज्जीला काहीतरी हवंय याची मला जाणीव झाली आणि मी विचारलं आजी काय हवंय. आजी इंग्रजी मधून i need some water. मी पाणी दिल आणि दोघांसाठी चहा ही मागवला. चहा सोबत त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा कळाल की ते बंगरुळ चे आहेत. कानडा, इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषाही त्यांना उत्तम येतात. आजोबा टाटा कंपनीत मुंबईला काम करत होते ते आता रिटायर्ड झाले. आजी गृहिणी आहेत. मुंबईत काम करून पुण्यात घर घ्यावं असा त्यांचा विचार चालू होता. ते ज्या कामासाठी आले होते त्यात त्यांच्या RM ने काहीतरी चुका करून ठेवल्या होत्या, आजोबा रागावले होते पण सय्यमी ही दिसत होते. मी त्यांना विचारलं पुण्यात बरं वाटतं का ? की मुंबई बरी वाटते ? त्यांनी मला प्रश केला तुम्ही मुंबईमध्ये काम केलं आहे का ? मी - नाही आजोबा. मित्रांसोबत फिरून आलोय पण काम नाही केलं मुंबईमध्ये. 
त्यावर आजोबा म्हणाले - मग एकदा नक्की जा आणि काम करा मुंबईमध्ये. 
आजोबा - मुंबईमध्ये काम केलं ना माणूस शार्प होतो. वेळ पाळतो, शब्द पाळतो, वेळेचं, पैशांचं महत्व त्याला समजत. ५ मिनिटे उशीर होणार असेल तर समोरचा माणूस फोन करून तसं कळवतो. तिथे एकमेकांचा आदर केला जातो. समोच्या माणसाचं दुःख तुमचं होऊन जातं, त्याचा आनंद तुमचा होऊन जातो. पुण्यात किंवा दुसऱ्या शहरात जाणवत नाही तसं. 
आजोबांना कोणीतरी हाक मारली आणि ते आजी ला घेऊन निघून गेले. 
मी अजूनही या सगळ्यांवर विचारात आहे. अनुभव म्हणतात तो हाच, तो चार दोन दिवसात येत नाही. माणूस वाचता येतो. कळतो. फक्त आपण गडबडीत असतो किंवा दुर्लक्ष करतो. विचार केला तर deep वाली feeling आहे. 

संग्रहित

Sunday, March 7, 2021

विसरलेले पाकीट!

*" विसरलेले पाकीट! "*

असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय...
जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिलाय. तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये... 🥰
दिवसाची लई भारी सुरवात...

गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली. पम्पम् करत गाडी पेट्रोल  पंपावर...

*" दोनशेचं टाक रे."*

त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली. मी पँटच्या खिशात हात घातला. तिथली जागा रिकामी! आयला...

*पाकीट विसरलो.* 🙆🏻‍♂️

वरच्या खिशात हात घातला.
तो ही रिकामा...

आयला.... फोनही विसरलो. माझा चेहरा पार ऊतरला. आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय...

*पण हे एकतर्फी प्रेमासारखं!*

आता पंप ओळख देईल, याची गॅरंटी वाटत नव्हती. दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची. इथं साली रिक्षाही मिळत नाही. जाऊ दीड किलोमीटर चालत. घरनं फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत...

प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता. बॉस पेट्रोल शिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर  ओघळू लागलं. पंपावरचा माणूस खुदकन् हसला...

*" होतं साहेब असं कधी कधी.. ऊद्या द्या पैसे."*

माझ्या जीवात जीव. मी मनापासून त्याला थँक्स  म्हणलं. पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हणलं... 

ऑफीस गाठलं. मी पोचलो अन् पाचच मिनिटांत क्लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. गटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही हसला. त्याचं हसू म्हणजे मोनालीसाच्या हसण्यासारखं. गूढ आणि दुर्मिळ... 

चलो चाय हो जाए.. ऑफीसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफीसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मनप्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली. मस्त अद्रकवाली चाय. घुटक घुटक संपवली. खिशात हात घातला...

*आपण पाकीट विसरलो हेही विसरलो*

सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार...

*एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात, शंभराच्या पाच नोटा कोंबल्या.*

काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गणगणीत विसरतं माणूस...

अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफीसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला तरास देवू नका. जावा बिगीबिगी. साहेब कावतील तुमचं...

मी चिडीचूप्प. हलक्या पावलानं ऑफीसला परतलो. वरच्या खिशाला पाचशेची ऊब होती...

*त्या पाचशे रूपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो.*

दीड वाजत आला. लंचटाईम झाला. एवढ्यात बायको ऑफीसात. घामाघूम झालेली. तुम्हाला नाही, मलाच काळजी... पाकीट, फोन विसरलात...

*तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला.*

पण मला खूप लागलं असतं. शक्यतो मागायची वेळ येवू नये, आपल्या माणसावर...
घ्या तुमची ईस्टेट, शंभर फोन येवून गेलेत त्याच्यावर...
अन् तुमच्या त्या 'बचपन की सहेली' चा सुद्धा. गेटटुगेदर आहे म्हणे. तुमच्या 91 च्या बॅचचं निस्तरा काय ते. मी चालले...

बायको पी.टी. उषापेक्षा जास्त वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं...

*आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो.*

 लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे. दार हलकेच लोटलं. केबिनमधे शिरणार तोच कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता...

*" जानू , तुझा ड्रेस आणला असता गं नक्की. आज नेमकं वॉलेट विसरलोय. तुला दिसलं नाही का घरी..?"*

ऊद्या नक्की. प्लीज. रागवू नकोस. मी केबिनबाहेर वेळ काढला. पावणेदोन मिनटात फोनवरचं बोलणं संपलं. नॉक करून आत गेलो...

*पाकीटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या.*

"थँक्स म्हणू नका सर.." पटकन् मागे फिरलो...

*बॉसच्या चेहर्यावरचा सुटकेचा आनंद, मी पाठीवरल्या डोळ्यांनी, डोळे भरून बघितला...*

माझं पाकीट पुन्हा रिकामं...

*तरीही मी डबलश्रीमंत...* ☺️

*साला श्रीमंतीचा माज करावा, तो रिकाम्या पाकिटांनी... भरल्या पाकीटात ती मजा नाही...*😜
*जरासे हलके फुलके, वेगळा विषय.*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*

Thursday, February 25, 2021

आपला प्रवास खूप छोटा आहे!

*प्रवास खूप छोटा आहे*
. -------------------------------
*एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती.*
*पुढच्याच स्टॉपवर एक स्थूल आणि वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली.*
🚌
*त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरूणीला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"😴*
*तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला*
👉🏼 *"अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."*

*👉🏼ही प्रतिक्रिया* *सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.*

*👉"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे"*

*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, हा तर काही मिनीटांचाच प्रवास आहे , तसेच जीवन हा सुद्धा एक काही काळापुरता प्रवासच आहे.* *मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे;* *की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.*

*कोणी आपले मन दुखावलंय का?*

*शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे.*

*कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?*

*सोडून द्या, शांत रहा, कारण*
*प्रवास खूप छोटा आहे.*

*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की,* *हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.*
*आपला प्रवास खूप छोटा आहे.*
*आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू,* *एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया.*
*जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे.*
*कारण एकच की,*
👉 *आपला प्रवास खूप छोटा आहे!.*

*👉इतिहासातील काही घटना नक्कीच बोधप्रद आहेत.त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.*

*🤺अर्धे जग जिंकलेला* *आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर राजा* *आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ' मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या,जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.👐🏽*

*फ्रान्सचा सम्राट नेपोलियन* *बोनापार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खंगुन मेला.*

*जर्मनीचा शहेनशहा* *ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.*

*इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली.* *नको तितकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.*
*अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन*याला अमेरिकन सैन्याने सर्जिकल स्ट्राइकने उचलून ठार केले व त्याचे प्रेत समुद्रात टाकून दिले.*
*आपल्या वडिलांना (शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.*

*एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला* *झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.*

*फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला* *लोकांनी गिलोटिनवर चढवले.*

*कार्ल मार्क्सला* *डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.*

*जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.*

*भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.*

*मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे* *राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.नुकतेच चित्रपट अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी नैराश्यातून स्वतःचे जीवन संपविले.*

*सध्याच्या कोरोना विषाणू मुळेतर जगावर मोठेच संकट आले आहे.*

*सांगायचे तात्पर्य हे कि आपले आयुष्य मर्यादित आहे*.

*जन्मापासून तर म्रुत्यूपर्यंतचा जीवनप्रवास असतो काळ कुणासाठी थांबत नाही*
*आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.*
*पण चांगल्या कर्माने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.*👏🏼

 *कितीही संपत्ती मिळविली असली तरी ती म्रुत्युनंतर इथेच रहाणार आहे*

👉 *भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. जोडलेला पैसा कपाटात रहातो , जोडलेली माणसे , नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात ,सोबत काहीही येत नाही , पण चांगले कर्म , सत्किर्ती मात्र सोबत येत असते*

*शेवटी एकच सांगतो, आपला जीवनप्रवास खूप छोटा आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगा , परोपकारी जीवन जगा ,आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.इतरांना जे सहकार्य करता येईल , जे शक्य असेल ती मदत करा,🤝🏼 दुसऱ्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे... जिथे परत येण्याचा रस्ताच नाही.... आपला प्रवास खूप छोटा आहे!*

Sunday, February 21, 2021

!!!नकारात्मक प्रभाव :


असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसें दिवस अधिकाधिक कंगाल होतो ? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं, का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं ? आणि एखादीला मनातून मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते ? का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिका धिक गरीब होतायतं ?

तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन.

तुम्हाला माहितीय ? जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम ? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळ सगळं.

जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं. माझं वजन वाढतयं, म्हंटलं की वजन अजुन वाढतं. माझे केस गळतायत म्हंटलं की अजुनच केस गळतात, माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजुनच उशीर होतो, कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजुन अडचणी निर्माण होतात, वगैरे वगैरे.

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन चेहर्‍यावर स्मितहास्ये ठेवुन मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा !..

१) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
२) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
३) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच आहे आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
४) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
५) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन प्रचंड संपत्ती वान आहे.
६) मी एका प्रसन्न व्यक्ती मत्वाचा मालक असुन संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
७) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
८) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळून जातात.
९) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे आणि ती जिंकली आहे.
१०) माझ्या आजुबाजुचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात आणि मी ही खुप खुप त्यांच्यावर प्रेम करतो.
११) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहेत आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
१२) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
१३) मी निरोगी आहे,
१४) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
१५) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

याला पॉझीटीव्ह अफेर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

तुम्ही हे जर मनापासुन फील करुन बोललात आणि ते तुमच्या सुप्त मेंदुपर्यंत पोहोचलं तर तुमच्या नकळत तो तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ ऍट्रॅक्शन”ची दणदणीत सुरुवात असेल !

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो, अशा शुभेच्छांसह...

Show More Reactions

Saturday, February 20, 2021

*हे सुंदर जग आहे*


*हे सुंदर जग आहे*

✍🏼 रवि वाळेकर

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पावसाला 'रोमँटिक' वगैरे म्हंटला, तर अस्सल मुंबईकर त्याला जोड्याने मारेल!

मी नऊलाच ऑफिसला पोहोचलो होतो. कामाचा बराचं व्याप होता. फोन्स, इमेल्स, मिटींग्ज करता करता, दिड वाजता जेवावे म्हंटलो, तेवढ्यात ऑफिसचेच एक 'अंतर्गत इमेल' येऊन थडकले.
'पाऊस जास्त असल्याने, आज सर्व कर्मचाऱ्यांनी लवकर घरी निघावे'
इतका वेळ ऑफिसमध्ये बसल्यामुळे बाहेर पावसाने काय कहर केलायं, या विषयी अनभिज्ञ होतो. बाहेर येऊन बघतो, तर विश्वास बसेना!

समोरचा नेहमीचा गजबजलेला रस्ता ओळखू येत नव्हता!
सोसाट्याचा वारा आणि वरून बादलीने ओतल्यासारखा तुफानी पाऊस. झाडांच्या फांद्या, अगणित पाने, कागदं, कचरा रस्त्यावर पडलेला. तुरळक रिक्षा धावतं होत्या. बस वा टॅक्सी नाहीचं. संपूर्ण रस्त्यावर घोट्याच्या वरपर्यंत वाहते पाणी.
सगळा रस्ताचं गटार झाला होता! त्याचं गढूळ पाण्यात शेकडो लोक पडतं, चाचपडंत चालतं होते. पाण्यात दिसेनासे झालेले खड्डे चुकवण्यासाठी रस्त्यातले पाय जमिनीवरून घसरवतं पुढचा पाय टाकायचा!
त्यातचं, पायी चालणाऱ्यांच्या अंगावर पाणी ऊडवतं ऊर्मटपणे वाहने धावत होते.
वरती पाणी, खाली पाणी. आभाळ काळे झालेले. सगळीकडे काळजी, भीती आणि एक भयावह अंधूकपणा भरलेला.
या अशा पावसातं लवकरात लवकर घरी पोहोचणेचं शहाणपणाचे. मी त्वरेने निघालो.
मला रिक्षाने घर ते ऑफिस आणि ऊलटं, अर्धा ते पाऊण तास लागतो. पण आज रिक्षाच मिळेना. एकतरं रिकाम्या रिक्षा नाहीतचं आणि ज्या होत्या, त्या थांबायला तयार नाही. पावसाचे पाणी वाऱ्यामुळे चहुबाजूंनी अंगावर येत होते. कसेबसे डोके कोरडे राहिले, बाकी नखशिखांत भिजलो. जवळपास तासाभराने एक रिक्षा मिळाली.
"सब तरफ पाणी भरेला है. सब जाम है साब" काहीतरी नवीन सांगितल्याप्रमाणे रिक्षावाला सांगत होता.

रस्त्यावर सगळीकडेचं पाणी. कासवाला लाजवील अशा संथगतीने वाहने चालतं होती. त्यात भर पाण्यात रस्ता ओलांडणाऱ्यां बेशिस्त पादचाऱ्यांची भर! सिग्नल बंद होते. वाहने दोन तिन फूट पुढे सरकायची आणि तिथेचं पाच दहा मिनिटे थांबायची. थांबण्याशिवाय दुसरा पर्यायचं नव्हता!
पुढे जाता येईना, मागे परतता येईना. मागेपुढे हजारो वाहने अडकलेली. दोन्ही बाजूला शेकडो लोक पाण्यात चालतायेत.कपडे भिजलेले, शरीर गारठलेले आणि चेहरे चिंताक्रांत. एवढे भिजलेले की आता वरून पडणाऱ्या पावसाचीही पर्वा नाही. छत्रीचेचं ओझे झालेले.
मुली, स्त्रिया सुद्धा आज भिजलेल्या कपड्यांनी बिनदिक्कत चालतं होत्या. बघायला, कोणाची विखारी नजरं त्यांच्याकडे जातेच कशाला? सगळेचं खाली बघतं, रस्ता पायाने चाचपडतं, जीव वाचवतं चालतायेत...

मला दुरवर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाण्यात ऊभा असलेला विशीतला एक मुलगा दिसला. मुख्य रस्ता थोडा ऊंचावर होता. इथे बाजूपेक्षा थोडे कमी पाणी होते. रस्त्याच्या बाजूला, कडेपासून पाच-सहा फुटावर, तुफानी वेगाने पाणी वाहात होते. हा खाली त्या गुडघाभर पाण्यात आणि वरून कोसळणाऱ्या पावसात भिजत बावळटासारखा निव्वळ ऊभा होता!

हा वेडा आहे का?
या असल्या जिवघेण्या पावसातं घरी निवांत बसायचे सोडून हा असा का ऊभा आहे? जर पावसाची गंमतचं बघायची असेल, तर कुठे आडोश्याला ऊभा रहा!
मी आता आजुबाजूची रहदारी बघण्याऐवजी खुळ्यागतं याच्याकडेचं बघतं बसलो!
विस एक मिनीटांनी माझी रिक्षा डाव्या बाजूला नेमकीचं याच्या समोर आली.
मी त्याच्याकडे बघून स्माईल दिले.
हा मख्ख!
"क्या कर रहा है?"
"कुच नही"
"अबे, बारीश मे कायको भिग रहा है?"
ऊत्तर नाही.
रिक्षा ऊभीचं होती. दहा मिनिटे तरी पुढे जाता यईल, असे वाटत नव्हते. हा ध्रूवबाळाप्रमाणे अढळपद मिळाल्यासारखा तिथेचं. एक इंचही जागेवरून हलतं नव्हता!
रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याला, दुचाकीस्वाराला याचा अडथळा होत होता. सगळ्यांना याला वळसा घालूनच जावे लागतं होते. काहीजण जाताजाता त्याला शेलक्या शिव्याही देतं होते.
त्याचे कपडे भिजलेले होते, असे म्हणणे मुर्खपणाचे होते. डोक्यावरच्या केसांमधूनही पाणी ठिबकतं होते. याला काही फरकचं पडत नव्हता! मध्येचं तोंडावर हात फिरवून पावसाचे पाणी पुसतं होता. कपड्यांची अजिबात काळजी नव्हती. ते इतके भिजले होते, की सुकायलाचं आठवडा लागणारं! खाली काळपट अर्धी चड्डी आणि वरती एकेकाळी पांढरा असावा, असा टिशर्ट. त्यावरच्या असंख्य काळ्या तेलकट डागांमुळे हा बहुधा 'गॅरेजवाला' मुलगा आहे, हे कळतं होते.
मला राहावले नाही. मी त्याला विचारले, "बांद्रा आने का है क्या रे? चलं बैठ ऑटो मे"
"नही साब" त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,
"इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है"
तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!
रस्त्याखालचा पाईप पुर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!
मी अवाक झालो! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?
मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, "बहोत बढिया, भाई!"
तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,
"बस, कोई गिरना नै मंगता इधर"
"कबसे खडा है?"
"दो बजे से"
घड्याळातं पाच वाजले होते!
३ तास तसेचं ऊभे राहून याला भुक लागली असणारं. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तिन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?
ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा 'कालनिर्णय' विकतं बसलेला दिसला.
दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.
"कालनिर्णय' केवढ्याला, काका?"
"फक्त बत्तीस रूपये, साहेब" केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून काहीचं विकल्या गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की ऊंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.
"कितने का है ये?"
"बत्तीस रुपया"
"कितने है?"
"चौदा रहेंगे, साब"
ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?
त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले!

मी आश्चर्यचकित! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.
तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!
हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरीकेत स्थाईक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.
"वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!"
मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?
"सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, ऊनमे बांट दूंगा!"
मी दिग्मूढ!
"तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!" मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते?

एखाद्या हॉस्पिटलबाहेर 'तत्काळ रक्त हवे' असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लाऊन!
कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? 'भैये' असतात की 'आपले' मराठी?
मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो 'चायवाले' आहेत.
बहुतांश ऊत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.
दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक 'चायवाला' मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!
"बर्कत आती है" एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.
परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले.
गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.
एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.
"नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?"
हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आले!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!
********
कॉपी पेस्ट

Show More Reactions

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...