Saturday, July 29, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग २ )

शाहूराजाची एक गोष्ट मला नेहमीच त्यांच्या विषयी आदरभाव उत्पन्न करते. शाहूराजाने राज्यकर्ता असूनही आपल्या जनतेतीला सामान्य माणसापासून अनेक बुध्दीवंत माणसांना योग्य प्रकारे " जपले " व त्यांना सतत प्रोत्साहीत केले. हा रयतेचा राजा जसा सामान्य माणसाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खात होता तसेच तो बुध्दीवंत माणसांनाही हृदयाजवळ जपत होता. अनेक मोठे बुध्दीवंत शाहूराजाजवळ वर्षानुवर्षे राहिले त्याचे हे एक कारण होते. एक गोष्ट ऐकवतो....

हे पण वाचा : शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग १ )

भाई माधवराव बागल...हे नाव महाराष्ट्रात सर्वपरिचीत आहे. भाईंच्या लग्नावेळी घडलेली ही गोष्ट. भाईंचे वडील खंडेराव बागल हे कोल्हापूर संस्थानातील नामी व्यक्तीमत्व . आपल्या मुलाचे अर्थात भाईजींच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला शाहूराजाकडे गेले. आमंत्रण मिळताच शाहूराजानी त्यादिवशी काही कामानिमित्त यायला जमणार नाही लग्नाला असे सांगून टाकले. खंडेराव थोडे नाराज झाले. त्यावेळी लग्नखर्चातील एक सन्माननीय खर्च म्हणून शाहूराजांना आहेर करण्यासाठी ५०० रुपयाचि रक्कम खंडेरावानी अलग बाजूला ठेवली होती. शाहूराजानी लग्नाला यायला नकार देताच खंडेराव नाराज झाले खरे पण त्यांना ती ५०० रुपयाची रक्कम इतरत्र वापरता आली. शाहूराजा येणार नसल्याने खंडेराव निश्चिंत होऊन आपल्या लगीनघाईत रमून गेले. लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाची वेळ झाली. अचानकच शाहूराजा मंडपजवळ हजर झाले. महाराज अचानकच लग्नाला आल्याने खंडेराव थोडे गोंधळले . कारण महाराजांच्या आहेराचा खर्च त्यांनी इतरत्र केला होता. महाराज हसतहसत लग्नाला आले व आपल्या कडून बागल दांपत्याला " आहेर " देऊन गेले. .....ही गोष्ट काय सांगते ? शाहूराजाचे हृदय ज्यांना ठाऊक आहे त्यांना यातील मर्म अचूक कळते. आपण लग्नाला येणार म्हटल तर खंडेराव आपल्याला आहेर करणार व त्याचा बोजा त्यांच्या वर पडणार हे त्यांना ठाऊक होते. म्हणून जाणीवपूर्वक सुरुवातीला नकार दिला व अचानक लग्नाला हजेरी लावून बागलांनाच आहेर करून त्यांना खूश करून टाकले. आजकाल आपण पाहतो की , सध्या काही नेत्यांच्या नावे सामान्य कार्यकर्ते लग्नपत्रीका काढतात. " अमुक अमुक साहेबांचा शुभाशिर्वाद " असे ठळकपणे छापले जाते. तो नेता लग्नाला येणार म्हणून लगीनघरातील एक यंत्रणा कामाला लागलेली असते. नेत्याचा व बरोबरीने येणाऱ्या त्याच्या कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान करणे हे एक " परमपवित्र कर्तव्य " होऊन बसते. नेता येतो ( नेहमीप्रमाणे वेळानेच ) येताना दहाजण बरोबर घेऊन येतो , लगीनठिकाणी बडेजाव मिरवतो , फोटोसेशन करतो , हाय - हँलो करत हात हलवत बाय बाय करून जातो. न देणं न घेणं असा हा विचित्र व्यवहार असतो. आपण काय बोलावे ? कारण इथे ना कुणी शाहूराजा असतो ना कुणी खंडेराव बागल..

आपल्या कार्यकर्त्यांची नेमकी स्थिती काय आहे...तो कोणत्या संभ्रमात अथवा अडचणीत आहे..त्याला किमान आपल्या मुळे कोणत्याही त्रासाला तोंड द्यावे लागणार नाही ...ही काळजी नेत्याला असायला हवी. तर न् तरच नेत्याविषयी निष्ठा व विश्वास कायमस्वरुपी निर्माण होतो. शाहूचरित्र हेच तर शिकवते...

*!! जपावे माणसांना कळवळीने , तरच जपले जाते नाते कायमचे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना? 
आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

.

Wednesday, July 26, 2017

शाहूचरित्र...काय शिकवते ?? ( भाग १ )

छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनप्रवास आदर्शवत आहे. शाहू महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला  शाहू महाराजापासून आपण काय शिकले पाहिजे , या विषयावरील "शाहूचरित्र...काय शिकवते ?? " ही उमेश सूर्यवंशी यांची लेखमालिका आपल्या ब्लॉगवर देत आहोत.या लेखमालिकेचा दररोज एक भाग प्रकाशित केला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------

शाहूचरित्र...काय शिकवते ?? ( भाग १ )

आपल्या देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही प्रशासकाला आपल्या जनतेशी कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभाराकडे पाहावे लागेल. अत्यंत छोट्या संस्थानात राहूनही अत्यंत मोठया कामांना लीलया हात घालून ते पूर्णत्वास कसे न्यायचे , त्या कामात जनतेचा कसा सहभाग करून घ्यायचा , आपल्या प्रशासनाला कसे कृतिशील करायचे आणि एक आदर्श व्यवहार वास्तवात कसा उतरवायचा याचे अनोखे दर्शन लोकराजा शाहूराजाच्या चरित्रात पावलोपावली दिसून येते.

लोकराजा शाहूंच्या जीवनातील एक गोष्ट प्रख्यात आहे.१९०२ साली शाहूराजांनी एका अनोख्या क्रांतीस जन्म घातला. संस्थानातील उपलब्ध जागांपैकी ५०% जागा ह्या मागासवर्गीय समाजाकरता राखून ठेवण्याचा निर्णय झाला. 'आरक्षण' ह्या धोरणाची कृतिशील सुरुवात होती ही. याला समर्थन मिळाले तसाच विरोधही होऊ लागला. अभ्यंकर नावाचे गृहस्थ शाहूराजाकडे आले आणि त्यांनी या आरक्षण धोरणा विरोधात आपली तक्रार सांगितली. तेंव्हा शाहूराजांनी त्यांना घोड्यांच्या तबेल्यात नेले. घोड्यासमोर खाद्य पसरले. धडधाकट व तंदुरुस्त घोड्यांनी पुढे येऊन सारे खाद्य संपवले न् काही दुबळी घोडी ते खाद्य मिळवण्यात अपयशी ठरली. तेंव्हा हे दृश्य अभ्यंकराना दाखवून काही खाद्य मुठीत घेऊन दुबळ्या घोड्यांना शाहूराजांनी चारले. अभ्यंकराना " आरक्षण नीतीचे मर्म " समजले.
ही गोष्ट आठवण्याचे कारण हे की या गोष्टीचे मर्म आमच्या शासनकर्त्यांना कधी कळणार ? ....हा पडलेला प्रश्न. उदाहरणच बघूया...सध्या शेतकरी कर्जमंजुरीचा विषय बराच गाजतोय. शेतकरी संपावर जाण्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना व त्यांचे नेते , बरोबरीला विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. यातून काही चर्चा घडून कर्जमाफी घोषित झाली. मला इथे सांगायचय की...शासनस्तरावर एकही मंत्री अथवा आमदार , कृषीखात्यातील अधिकारी यांनी पुढे येऊन तमाम आंदोलकांना , शेतकऱ्यांना , राजकीय विरोधकांना प्रत्यक्षात बांधावर नेऊन " फायद्याच्या शेतीचे गणित " समजावून सांगू शकत नाहीत असे का  ??  कर्जमाफी हा वरवरचा उपाय आहे असे शासन सांगते व मलाही ते मान्य आहे . तर मग शेतीला लागणाऱ्या पुरक उद्योगाची माहिती , शेतीत करावी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाची गुंतवणूक , हवामानानुसार घ्यायची पिके , जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मिळवायची संधी , उत्पादनाच्या खर्चावर कमीत कमी खर्च कसा करता येईल याचे गणित मांडून का नाही दाखवले गेले ?? ....याचे कारणच मूळात आजचे शासन हे शाहू विचारांचा वारसा सांगत नाही. राजाला असावी लागणारी दूरदृष्टी आजकालच्या ( गेल्या ५० वर्षातील शासनकर्ते ) सरकारजवळ नाहीय. त्यामुळं विरोधी मत घेऊन आलेल्या अभ्यंकराना जसे शाहूराजाने प्रत्यक्ष उदाहरण समोर दाखवले तसे आमचे राज्यकर्ते दाखवू शकत नाहीत. परिणाम....जनता व शासन दरी नेहमीच रुंदावत राहिलीय. याचा विचार होणार की नाही ??

शासनकर्ता ..मग तो कुणीही असो , त्याला जनता व विरोधक यांच्या बरोबर संवाद साधण्याची हातोटी व कौशल्य असावे लागते. ते असेल तर कोणत्याही निर्णयाकरता पळवाटा शोधल्या जात नाहीत व घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर " बिनडोकी कष्ट " घ्यावे लागत नाही. शाहूचरित्र ...हेच शिकवते.

*!! शासनकर्ता..अभ्यासू , निश्चयी , दूरदृष्टीचा असावा !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

      जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

. Thanks!

Tuesday, July 25, 2017

विजयच हवा होता.....

          २५ जून १९८३ रोजी लंडनच्या लॉर्डस् मैदानावर भारताच्या कर्णधार कपिल देव यांने विश्वचषक विजेत्याचे चषक पटकावले. तसं पाहिलं तर ही क्रिडा क्षेत्रातील एक छोटीशी घटना होती, पण त्याच वेळी ती घटना भारतीय सामाजिक उलथापालथीची ठरली. खरं म्हणजे तो काळच उलथापालथीचा होता. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा आशावाद कुठंल्या कुठं विरुन चालला होता.

       कामगार चळवळी, दलीत चळवळी जोर पकडत होत्या आणि मोडितही काढल्या जात होत्या. भ्रष्टाचार, साठेबाजी आपल्या शिखरावर होती. आणिबाणी, राजकीय अस्थिरताने वातावरण तंग बनले होते. त्यामुळेच एकूणच भारतीय समाजात, विशेषतः तरुण वर्गात प्रचंड निराशा येत होती. Angry Young Man बनत बंड करु पाहत होता पण  तो बंडही तोडला जात होता. आणि अश्या वातावरणातील कपिल देव आणि त्यांच्या सहकार्यानी केलेल्या विश्व विजयालाने भारतीय लोकांच्या मानसिकतेला उभारी देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ते ही कोणाला हरवून? तर क्रिकेट  मधील हुकूमशाहा वेस्ट इंडिजला हरवून..... त्या विजयाने भारतीय तरुणांना आपणही जिंकू शकतो हा आत्मविश्वास जागृत केला. तरुणांचे आदर्श आता जगाला चोख उत्तरच नव्हे तर त्यांची बोलतीच बंद करणारे हे खरे महानायक बनले. त्यामुळेच नंतर क्रिकेट हे इथल्या लोकांचा श्वास बनला तर ती आश्चर्यकारक गोष्ट नव्हती. विशेषतः संपूर्ण भारताला एका  धाग्याने जोडणारी कोणती गोष्ट बनली ती क्रिकेटच होती. इथे एखाद्या मुलगा घरातून(किंवा घरातही) खेळायला बाहेर पडत असेल तर तो क्रिकेटच खेळायला बाहेर पडत होता.
   
         घरोघरी T.V. पोहचण्यासाठि रामायण, महाभारत पेक्षा क्रिकेटचा वाटा मोठा होता.  आणि त्याची जादू त्यादिवशापासून लोकांच्या मनात आहे ती फक्त मधल्या काळातील निकाल निश्चितीच्या प्रकरणाचा काळ सोडता अजूनही कायम आहे. प्रत्येक भारतीय मानसाला आपला मुलगा किंवा आपण स्वतः गावस्कर, कपिल, वेंसरकर व्हावा असे वाटायचं   संघाकडून प्रेरणा घेत सचिन, कुंबळेपासून नंतर धोनी, विराट अशी लांबलचक यादीच तयार होत गेली. इतके कि आज केवळ भारतीय क्रिकेट  खेळाडूंचाच नव्हे तर भारतीय क्रिकेट  मंडळाचा वरचष्मा आहे.
    
          पण त्याचवेळी भारताच्या  अर्धा लोकसंख्येलाही क्रिकेटची आवड निर्माण होत होती. हेही तितकेच खरे हातातील कामे सोडून क्रिकेट  पाहत राहणे हे महिलाही करायच्या आणि मुलीही पण त्यांच्या आपली आवड फक्त एखाद्या क्रिकेट   खेळाडूवर मनातल्या मनात जीव ओवाळून टाकणे किंवा नंतरच्या काळात खेळाडूंना (खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठि) प्रोत्साहन देण्यासाठी नाचणे इतकीच मर्यादित राहिली. कारण मुलीही हातात चेंडू आणि फळी घेऊन खेळू शकतात हे पुरुषप्रधान मानसिकतेच्या पुरुषांच्याच काय महिलांच्याही  मनात येत नव्हते. खरं म्हणजे पुरुष आणि महिला क्रिकेटची सुरूवात एकाच वेळ होत होती. १९८३ पूर्वीही भारतातून महिला क्रिकेटही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जात होते. पण त्याची जाणीव सामान्य नागरिकांनाही नव्हती  कि प्रसार माध्यमातून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळेच भारतीय मुलींना क्रिकेट पाहणे इतक्यावर समाधान मानावे लागते. लोक काय म्हणतील याच सोबत हे आपल्याला जमनारच नाही या मानसिकतेचा प्रभाव मुलांसोबत मुलींमध्ये ही होता. मधल्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्रात कमालीची प्रगती केली होती. पण अजूनही क्रिकेटसारखा ताकत लागणारा खेळ  खेळण्याइतकि क्षमता मुलीँच्या आहे हे लोकांच्या गावी नव्हते. (अलीकडेच एकदा कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन महिला संघा दरम्यान खेळ रंगात असताना मी तीथे प्रेक्षक म्हणून बसलो होतो. दोन्ही संघातील मुली जीवा तोडून खेळ होत्या. तेव्हाच नेहमीच त्या मैदानावर खेळणारे हौशी मुले पोहचली. मुली खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण आपला खेळ थांबून संपण्याची वाट पाहावी हेचय त्या मुलांनापटलं नसावे. त्यांनी   त्याच मैदानावर खेळायला सुरवातही केली. एक जिल्हा स्तरीय सामना चालू असताना त्याचवेळी मैदानावर इतर मुलांनीही आपले सामने चालू केले आणि त्या अडथळ्यांसहच मुलीचा सामनाही उराकावा लागला होता.) दरम्यान अंजूम चौप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी अस्या कित्येक मुली वेगळ्या वाटाने जात भारतीय महिला क्रिकेटला रोज नवनवीन उंची गाठून देत होत्या.

          पण त्यात पुरुष प्रधान मानसिकतेच्या भारतीय लोकांना काही रस असणार नाही या भ्रमात राहून प्रसार माध्यमे दखलच घेत नव्हती. अगदी २००५ च्या विश्व चषकामध्ये भारत आता सारखाच उपविजेता होता पण  त्याची फारशी दखल घ्यावी असे प्रसार माध्यमांना वाटत नव्हते. नाही म्हणायला भारतीय मुलगी ही विश्व सुंदरी, जगत सुंदरी होते हि गोष्ट जास्त महत्वाची असते कारण ही बातमी पुरुषी मानसिकतेला सुखाविणारी असते. नाही म्हणायला प्रसार माध्यमातून सानिया मिर्झा या महिला खेळाडूला मोठे केले पण त्यातही तिच्या खेळातील कौशल्यापेक्षा तीचे सौंदर्य जास्त कारणीभूत होते.
        
        पण काळ बदलत होता आता एखाद्या गोष्टीला महत्त्व मिळवून देणेसाठि प्रसार माध्यमांच्या मेहरबानीवर राहण्याची गरज राहिली नव्हती. २०१७ला महिला विश्व चषक प्रसार माध्यमातून नाहीतर सामाजिक माध्यमातून मोठा होत होता. Facebook, whatsapp वरून यासंबंधी जोरदार वातावरण निर्मिती होऊ लागली. हळूहळू हळूहळू भारतीय संघही जोरदार खेळ करुन पुढे पुढे वाटचाल करत होता. परंपरीक प्रसार माध्यमे अजूनही उदासिन होते. त्याच मुळे प्रेक्षकही. अगदी सुरूवातीला छायाचित्रण उपलब्ध असतानाही महिला विश्व चषक चालू असतानाही पुरुषांच्या जुने सामने दाखविण्यात क्रिडा वाहिनींना धन्यता वाटत होती. पण त्याच वेळी महिला क्रिकेट रसीकांनी इतर माध्यमाच्या साह्याने जेव्हा सामन्यांची सध्यस्थिती जाणून घेण्याची धडपड चालूच ठेवली. आणि मग कुठे क्रिडा वाहिंनीनाही जाणिव होऊन पुढील सर्व सामने त्यांनी थेट प्रसारण दाखविण्यास लागले. नंतर तर इंग्रजी सोबत हिंदी समालोचनही दाखविले. हे महिला क्रिकेटचे आणि त्यांच्या चाहत्यांचे मोठे यश होते. पण चाहते अजूनही मर्यादित होते.(एका मित्राच्या घरी त्यांच्या मनात नसताना जेव्हा मी महिलांचा हा सामना पाहत होतो तेव्हा एका थोडक्यात चुकलेल्या क्षेत्ररक्षणावर त्याची प्रतिक्रिया होती. आपल्याच काय जगातल्या कुठल्या महिला संघाचे क्षेत्ररक्षण असेच ढिसाळच असणार, त्यांना काय जमणार आहे  क्षेत्ररक्षण? थोड्यावेळाने एक षटकार बघून त्याच मत होतं कि यांची मैदाने छोटी असणार. आणि साऱ्यावर कडी म्हणजे तो मित्र मला म्हणाला कि या सगळ्या मुली केवळ १७/१८ वर्षांच्या असतील? मी म्हटलं असं काही नाही सगळ्या वयाच्या आहेत अगदी ३५शीला पोहचलेल्याही. त्यावर त्याचे मत होते कश्याला ओ खेळत असतील इतकी वर्षे संसार, पोरंबाळं सोडून?) पण भारतीय संघ पुढे पुढे वाटचाल करीत होता. तसे लोकांच्यातला रस वाढू लागला आणि उपांत्य आणि अंतिम फेरीतील या मुलींचे खेळ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धींचे खेळ बघून यांच्या क्षमता आणि सामन्यातली रंगत पुरुष खेळापेक्षा तसुभरही कमी नसल्याची जाणीव ज्यांनी ज्यांनी हे सामने पाहिले त्यांना झाली.
   
       पण तरीसुद्धा ज्यांनी हे सामने पाहिलेच नाहीत त्यांनासुद्धा याची जाणीव होण्यासाठी भारताला विजयच आवश्यक होता. कारण त्यामुळे २५ जून १९८३ नंतर पुन्हा एक सामाजिक उलथापालथ झाली असती. सगळ्या जणी भावी मिताली किंवा झुलन होऊ शकल्या नसत्या तरी एखादी मिताली किंवा झुलन हातात कधीच चेंडू फळी न आल्यामुळे लपून राहिल्या नसत्या. मुलींना एक प्रकारचा आत्मविश्वास आला असता कि आपण त्या सार्या गोष्टी करु शकतो जो कि एक मुलगा करु शकतो. सौदंर्य स्पर्धा व्यतिरिक्त ही आपण खूप वेगळ्या वाटेनेही स्वतः ठसा उमट पालकांनाही मुलांना वेगळ्या पद्धतीने आणि मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढविण्याची गरज नाही, याची जाणीव झाली असती. कारण आता समाजात थोड्याफार प्रमाणात मुलींना आपल्या मनाचे ऐकण्याचे स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याच्याही उपयोग आत्मविश्वासाच्या अभावाने पारंपरिक रूपात अडकून राहण्यात होतो. T.V. , Internet चाही वापर पारंपरिक महिलांचे रूप कुरवळण्यासाठिच होतो आहे. आणि महिला सबलीकरणची व्याप्तीही लोचण, पापडाच्या बाजारपेठेच्या पुढे जात नाही आहे. यासार्याला या विश्व चषकाच्या विजयाने  छेद गेला असता. 
     
      असो जे काही हाती लागले ते ही नसे थोडके पण तरीही राहून राहून वाटते कि
*विजयच हवा होता.....*
             
                 कपिल मुळे
             ९७६७८९७४१४

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Saturday, July 22, 2017

7 Ways to Turn Your Dreams Into Reality

Dreams without action is a world of make believe. Consider the following.

96 percent of college professors believe they have above average teaching skills.
50 percent of high school students believe they will attend law school, medical school or grad school.
Time magazine asked in a survey, “Are you in the top 1% of wage earners?” Nineteen percent said yes! And 36 percent expected to be.

Really?!!!

A dream without a plan is soon exposed.

“When the tide goes out, you discover who’s been swimming naked.” —Warren Buffet

John Kotter has said there are two kinds of people in the world: those who accept their life, and those who lead their life. Some people just get up, look at their life and hope something good will happen. The successful person says:

I’m going to make something happen.
I’m going to build on trust.
Make that relationship work.
Take control over the things I have influence over.
Lead my life.
Create a personal learning agenda that will help fulfill my dreams.
The obvious lesson? The key to transforming dreams into reality is to set goals that can be broken down into doable steps.


“The secret to change is one step at a time.” —Mark Twain

Is there a gap between what you know or the skills you have, and the information or the skills you need to actualize your dream? These seven steps will help.

1. Start with the end in mind

Determine your goals and ask yourself: Where do I want to be next year? What do I need to do to accomplish these goals? Your answers instantly become your learning agenda.

2. Assess the skills or knowledge you’ll need

Some goals won’t require new skills or knowledge, but others will. What specific skills are needed to make your dream(s) come true? What skill that you already possess would you like to improve by 25 percent within the next year?

3. Explore the best sources

Is it going back to school? Enrolling in a training course offered by your employer? Developing a relationship with mentors and/or co-workers who can teach you skills or give you insights? Look for that optimal source for every skill you decide you need to learn.

4. Create your learning agenda

You now have the information, so start creating your learning plan. It should lay out the skills and knowledge you need to acquire. It should include a timeline of where and when you will go about it. And it should be in writing, on no more than one page. It’s too easy to lose your “ball” in the weeds.

5. Begin with the most important

Don’t start with the hardest or the easiest. What is the most important thing you can do right now? Evaluate and then rank them according to value. Enroll your action plan into M.I.T. (Most Important Thing).

6. Get moving

Execute. What is your W.O.W. (Within One Week)? What step will you commit to this next week?

And of the utmost importance….

7. Identify your limiting beliefs

We all have them. When you identify them, they begin to lose their power. Don’t doubt your dream.

I’m too young
I’m too old.
I don’t have the time.
I don’t have the money.
I never follow through.
Someday I’ll…

Every time you do something you didn’t think you could do, your confidence is built. Action leads to confidence more than confidence leads to action.

Confidence = Positive Self-Regard + Competence

One without the other will not equate to confidence. You need to build on both. And it’s not an overnighter. It’s day in and day out—building one day at a time.

These steps will become part of your Doubt-Removal System. This will shift your mindset, and this action will deal with your limiting beliefs.

=======================================
From Editor's desk

If you have any article, story, or poem in Hindi, english or Marathi, which you want to share. Please email us with that information with your photo. Our email address is: swapnwel@rediffmail.com
We'll PUBLISH this blog with your name and photo
. Thanks!

Saturday, July 15, 2017

Addicted To Your Phone? 4 Steps To Regain Mastery Of Your Phone

The University of British Columbia found that people who only checked their emails three times a day versus those who checked it “as often as they could” experienced significantly less stress. Here are some practical tips on how you can regain control of your phone and other digital devices:

1. Go offline at night

Yes, you are allowed to go offline. Really! One time an acquaintance posted a question in a mobile app group. When I woke up, I noticed people had responded between 12am - 4am. It made me wonder how are most people sleeping whilst checking their mobile devices during the wee hours. Not so well is my guess. The reason is checking your phone in the middle of the night causes huge disruptions to your circadian rhythms and the blue light emitted from your phone impairs melatonin production and stimulates your brain to wake up.

How to do this:

Stop using your phone one hour before you sleep.
Turn your mobile data off at night so you don’t get any notifications.
Place your phone beyond an arm's reach at night.
Switch to using an alarm clock versus your phone at night.

2.   Do not check your phone first thing in the morning

This is because your mind is very fresh and you can really set the tone of your day with positivity, calmness or whichever way you like. If you check your email, Facebook, Whatsapp, humorous-historical channel and other applications, often you are starting your day with other people’s thoughts, questions, ideas and news. This is disruptive to your creativity, productivity and might even get you in a bad mood before getting out of bed.

How to do this:

Delay checking your phone in the morning by at least an hour.
Agree with yourself a time that you'll check your phone, and stick to it.

3.   Give yourself time before checking a notification

This was a hard one for me to give up. I would always find myself immediately wanting to check my phone whenever a notification would come in. I wondered why was I so addicted to this? The reason is, every time a notification comes in your brain gives you a dopamine hit (a happy hormone) which becomes addictive over time. However, along with this addiction comes stress and anxiety. A Future Work Centre study in UK where 2000 employees were surveyed found that email notifications were linked to higher anxiety.

How to do this:

Set a time for when you will check your emails or notifications.
Turn off any notification alerts to reduce the impulsive checking.
Delete any applications, which are stressing you more than serving you.
Delay responses to any notifications.

4.   Let your phone go

Give your phone a break! When was the last time you went out with your family or friends without taking your phone? Although many of us feel like we can’t live without our phones, in order to rest and really live in the moment you have to say goodbye to your phone sometimes. This can be hugely empowering for you and eye opening (literally).

How to do this:

Decide which day, time and duration you are going to leave your phone at home.
Inform your loved ones if you think they might worry about you.
Creating new healthy habits with your phone is really not that hard and is a liberating feeling. In fact many of us can recall a time of not having a phone and surviving very well. And remember just like anything in life if you find yourself going back to the old habits you can always start again!
=======================================
From Editor's desk

If you have any article, story, or poem in Hindi, english or Marathi, which you want to share. Please email us with that information with your photo. Our email address is: swapnwel@rediffmail.com
We'll PUBLISH this blog with your name and photo
. Thanks!

Thursday, July 13, 2017

ब्रिगेडियर उस्मान के लिए देश ही सब कुछ था,

भारत पाकिस्तान के विभाजन के समय जब पूरे देश में दंगे भड़के हुए थे सेना का भी विभाजन हो रहा था , 10 वीं बलूच रेजिमेंट के अधिकारी उस्मान ने हिन्दुस्तान में ही रहने का फैसला किया जबकि उसके सभी मुस्लिम साथी पाकिस्तान जा रहे थे ।बहुत कम लोगों को पता होगा कि उन्हें पाकिस्तानी हुक्मरानों ने ब्रिग्रेडियर उस्मान को सेना का प्रमुख बनने का भी आफर दिया गया था लेकिन उन्होंने उसे स्वीकार नहीं किया ।विभाजन के बाद उस्मान डोगरा रेजिमेंट में चले गए ।

(1999 कारगिल युद्ध मे दुश्मन की बंदूक छीनकर दुश्मन को मारनेवाले राइफ़लमैन संजय कुमार)

नौशेरा का शेर और पाकिस्तान की हार
             मरणोपरांत महावीर चक्र से नवाजे गए ब्रिग्रेडियर उस्मान को आजादी के तीन महीने बाद कश्मीर के झांगर में तैनात 50 पैराशूट ब्रिगेड को कमांड करने के लिए भेजा गया था ।इसके पहले की उस्मान पहुँचते आश्चर्यजनक तौर से पाकिस्तानी सेना गैरिसन की तैनारी से घबरा गई और लगभग 6 हजार सैनिकों के साथ पाकिस्तानी सेना ने झांगर पर कब्ज़ा कर लिया था ।बगल में ही नौशेरा सेक्टर था उस्मान ने नौशेरा को दुश्मन से बचाए रखने के लिए जबरदस्त व्यूह रचना रची उन्होंने सबसे पहले उत्तर दिशा में स्थित कोट पहाड़ी को पाकिस्तानियों के कब्जे से मुक्त कराया यह वो पहाड़ी थी जिससे समूचे नौशेरा पर निगाह रखी जा सकती थी । बिग्रेडियर उस्मान के सफल नेतृत्व में एक फरवरी 1948 को भारतीय सेना ने कोट और नौशेरा के आस पास के इलाके पर आक्रमण किया और सुबह तक समूचे नौशेरा पर अपना कब्ज़ा जमा लिया ।सबसे जबरदस्त सफलता तब मिली जब फरवरी 1948 के अंतिम सप्ताह में लेफिटनेंट जनरल के एम् करियप्पा के नेतृत्व में बनाई गई योजना का सफल क्रियान्वयन करके बिग्रेडियर उस्मान ने झांगर पर भी अपना कब्ज़ा जमा लिया ।ब्रिग्रेडियर उस्मान की वीरता का अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि समूचे कश्मीर में उन्हें नौशेरा का शेर कहा जाता था ।

    मैं मर रहा हूँ लेकिन हमारा इलाका हमारा है       
                 झांगर पर ब्रिग्रेडियर उस्मान का कब्जा पाकिस्तान के बर्दाश्त के बाहर था । झांगर पर हिन्दुस्तानी कब्जे के बाद वो बार बार उसपर दुबारा कब्जे की योजना बनाता रहा पाकिस्तान ने मई 1948 में अपनी नियमित सेना झांगर के पास लगा दी । 3 जुलाई 1948 को झांगर में भीषण युद्ध हुआ जिसमे एक हजार पाकिस्तानी सैनिक मारे गए और लगभग उतने ही घायल हुए इधर ब्रिगेडियर उस्मान के नेतृत्व वाली 50 पैराशूट ब्रिगेड के महज 33 जवानों की मौत हुई और 102 घायल हुए उसी युद्ध के दौरान 25 पाउंड का एक शेल मेजर उस्मान के ऊपर जा गिरा और भारत माँ का यह बेटा शहीद हो गया ।

( भारतीय वायुसेना के पहले परमवीर चक्र विजेता   फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों )

        ब्रिगेडियर उस्मान के आखिरी शब्द थे मैं मर रहा हूँ लेकिन हमारा इलाका हमारा है, हम दुश्मन के गिर जाने तक लड़ेंगे । ब्रिगेडियर उस्मान की ताकत का अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि पाकिस्तानी ने उनके सर पर पूरे 50 हजार रुपयों का इनाम रखा था।
=============================================

संपादक की डेस्क से

यदि आप के पास हिंदी, अंग्रेजी, या मराठी भाषा मे कोई  लेख, कहानी, या  कविता है। जिसे आप publish  करना चाहते है। तो कृपया आपकी कहानी आपके फोटो के साथ हमें भेज दिजिये । हमारा ईमेल आईडी है: swapnwel@rediffmail.com और उस कहानी,लेख ,कविता को हम आपके नाम और फ़ोटो के साथ ही  इस ब्लॉग पर publish कर देंगे।

         तो दोस्तो लिखना सुरु कीजिये।हम आपकी राह देख रहे है।

 धन्यवाद !!!!!!!!

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...