२५ जून १९८३ रोजी लंडनच्या लॉर्डस् मैदानावर भारताच्या कर्णधार कपिल देव यांने विश्वचषक विजेत्याचे चषक पटकावले. तसं पाहिलं तर ही क्रिडा क्षेत्रातील एक छोटीशी घटना होती, पण त्याच वेळी ती घटना भारतीय सामाजिक उलथापालथीची ठरली. खरं म्हणजे तो काळच उलथापालथीचा होता. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा आशावाद कुठंल्या कुठं विरुन चालला होता.
कामगार चळवळी, दलीत चळवळी जोर पकडत होत्या आणि मोडितही काढल्या जात होत्या. भ्रष्टाचार, साठेबाजी आपल्या शिखरावर होती. आणिबाणी, राजकीय अस्थिरताने वातावरण तंग बनले होते. त्यामुळेच एकूणच भारतीय समाजात, विशेषतः तरुण वर्गात प्रचंड निराशा येत होती. Angry Young Man बनत बंड करु पाहत होता पण तो बंडही तोडला जात होता. आणि अश्या वातावरणातील कपिल देव आणि त्यांच्या सहकार्यानी केलेल्या विश्व विजयालाने भारतीय लोकांच्या मानसिकतेला उभारी देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ते ही कोणाला हरवून? तर क्रिकेट मधील हुकूमशाहा वेस्ट इंडिजला हरवून..... त्या विजयाने भारतीय तरुणांना आपणही जिंकू शकतो हा आत्मविश्वास जागृत केला. तरुणांचे आदर्श आता जगाला चोख उत्तरच नव्हे तर त्यांची बोलतीच बंद करणारे हे खरे महानायक बनले. त्यामुळेच नंतर क्रिकेट हे इथल्या लोकांचा श्वास बनला तर ती आश्चर्यकारक गोष्ट नव्हती. विशेषतः संपूर्ण भारताला एका धाग्याने जोडणारी कोणती गोष्ट बनली ती क्रिकेटच होती. इथे एखाद्या मुलगा घरातून(किंवा घरातही) खेळायला बाहेर पडत असेल तर तो क्रिकेटच खेळायला बाहेर पडत होता.
घरोघरी T.V. पोहचण्यासाठि रामायण, महाभारत पेक्षा क्रिकेटचा वाटा मोठा होता. आणि त्याची जादू त्यादिवशापासून लोकांच्या मनात आहे ती फक्त मधल्या काळातील निकाल निश्चितीच्या प्रकरणाचा काळ सोडता अजूनही कायम आहे. प्रत्येक भारतीय मानसाला आपला मुलगा किंवा आपण स्वतः गावस्कर, कपिल, वेंसरकर व्हावा असे वाटायचं संघाकडून प्रेरणा घेत सचिन, कुंबळेपासून नंतर धोनी, विराट अशी लांबलचक यादीच तयार होत गेली. इतके कि आज केवळ भारतीय क्रिकेट खेळाडूंचाच नव्हे तर भारतीय क्रिकेट मंडळाचा वरचष्मा आहे.
पण त्याचवेळी भारताच्या अर्धा लोकसंख्येलाही क्रिकेटची आवड निर्माण होत होती. हेही तितकेच खरे हातातील कामे सोडून क्रिकेट पाहत राहणे हे महिलाही करायच्या आणि मुलीही पण त्यांच्या आपली आवड फक्त एखाद्या क्रिकेट खेळाडूवर मनातल्या मनात जीव ओवाळून टाकणे किंवा नंतरच्या काळात खेळाडूंना (खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठि) प्रोत्साहन देण्यासाठी नाचणे इतकीच मर्यादित राहिली. कारण मुलीही हातात चेंडू आणि फळी घेऊन खेळू शकतात हे पुरुषप्रधान मानसिकतेच्या पुरुषांच्याच काय महिलांच्याही मनात येत नव्हते. खरं म्हणजे पुरुष आणि महिला क्रिकेटची सुरूवात एकाच वेळ होत होती. १९८३ पूर्वीही भारतातून महिला क्रिकेटही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जात होते. पण त्याची जाणीव सामान्य नागरिकांनाही नव्हती कि प्रसार माध्यमातून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळेच भारतीय मुलींना क्रिकेट पाहणे इतक्यावर समाधान मानावे लागते. लोक काय म्हणतील याच सोबत हे आपल्याला जमनारच नाही या मानसिकतेचा प्रभाव मुलांसोबत मुलींमध्ये ही होता. मधल्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्रात कमालीची प्रगती केली होती. पण अजूनही क्रिकेटसारखा ताकत लागणारा खेळ खेळण्याइतकि क्षमता मुलीँच्या आहे हे लोकांच्या गावी नव्हते. (अलीकडेच एकदा कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन महिला संघा दरम्यान खेळ रंगात असताना मी तीथे प्रेक्षक म्हणून बसलो होतो. दोन्ही संघातील मुली जीवा तोडून खेळ होत्या. तेव्हाच नेहमीच त्या मैदानावर खेळणारे हौशी मुले पोहचली. मुली खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण आपला खेळ थांबून संपण्याची वाट पाहावी हेचय त्या मुलांनापटलं नसावे. त्यांनी त्याच मैदानावर खेळायला सुरवातही केली. एक जिल्हा स्तरीय सामना चालू असताना त्याचवेळी मैदानावर इतर मुलांनीही आपले सामने चालू केले आणि त्या अडथळ्यांसहच मुलीचा सामनाही उराकावा लागला होता.) दरम्यान अंजूम चौप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी अस्या कित्येक मुली वेगळ्या वाटाने जात भारतीय महिला क्रिकेटला रोज नवनवीन उंची गाठून देत होत्या.
पण त्यात पुरुष प्रधान मानसिकतेच्या भारतीय लोकांना काही रस असणार नाही या भ्रमात राहून प्रसार माध्यमे दखलच घेत नव्हती. अगदी २००५ च्या विश्व चषकामध्ये भारत आता सारखाच उपविजेता होता पण त्याची फारशी दखल घ्यावी असे प्रसार माध्यमांना वाटत नव्हते. नाही म्हणायला भारतीय मुलगी ही विश्व सुंदरी, जगत सुंदरी होते हि गोष्ट जास्त महत्वाची असते कारण ही बातमी पुरुषी मानसिकतेला सुखाविणारी असते. नाही म्हणायला प्रसार माध्यमातून सानिया मिर्झा या महिला खेळाडूला मोठे केले पण त्यातही तिच्या खेळातील कौशल्यापेक्षा तीचे सौंदर्य जास्त कारणीभूत होते.
पण काळ बदलत होता आता एखाद्या गोष्टीला महत्त्व मिळवून देणेसाठि प्रसार माध्यमांच्या मेहरबानीवर राहण्याची गरज राहिली नव्हती. २०१७ला महिला विश्व चषक प्रसार माध्यमातून नाहीतर सामाजिक माध्यमातून मोठा होत होता. Facebook, whatsapp वरून यासंबंधी जोरदार वातावरण निर्मिती होऊ लागली. हळूहळू हळूहळू भारतीय संघही जोरदार खेळ करुन पुढे पुढे वाटचाल करत होता. परंपरीक प्रसार माध्यमे अजूनही उदासिन होते. त्याच मुळे प्रेक्षकही. अगदी सुरूवातीला छायाचित्रण उपलब्ध असतानाही महिला विश्व चषक चालू असतानाही पुरुषांच्या जुने सामने दाखविण्यात क्रिडा वाहिनींना धन्यता वाटत होती. पण त्याच वेळी महिला क्रिकेट रसीकांनी इतर माध्यमाच्या साह्याने जेव्हा सामन्यांची सध्यस्थिती जाणून घेण्याची धडपड चालूच ठेवली. आणि मग कुठे क्रिडा वाहिंनीनाही जाणिव होऊन पुढील सर्व सामने त्यांनी थेट प्रसारण दाखविण्यास लागले. नंतर तर इंग्रजी सोबत हिंदी समालोचनही दाखविले. हे महिला क्रिकेटचे आणि त्यांच्या चाहत्यांचे मोठे यश होते. पण चाहते अजूनही मर्यादित होते.(एका मित्राच्या घरी त्यांच्या मनात नसताना जेव्हा मी महिलांचा हा सामना पाहत होतो तेव्हा एका थोडक्यात चुकलेल्या क्षेत्ररक्षणावर त्याची प्रतिक्रिया होती. आपल्याच काय जगातल्या कुठल्या महिला संघाचे क्षेत्ररक्षण असेच ढिसाळच असणार, त्यांना काय जमणार आहे क्षेत्ररक्षण? थोड्यावेळाने एक षटकार बघून त्याच मत होतं कि यांची मैदाने छोटी असणार. आणि साऱ्यावर कडी म्हणजे तो मित्र मला म्हणाला कि या सगळ्या मुली केवळ १७/१८ वर्षांच्या असतील? मी म्हटलं असं काही नाही सगळ्या वयाच्या आहेत अगदी ३५शीला पोहचलेल्याही. त्यावर त्याचे मत होते कश्याला ओ खेळत असतील इतकी वर्षे संसार, पोरंबाळं सोडून?) पण भारतीय संघ पुढे पुढे वाटचाल करीत होता. तसे लोकांच्यातला रस वाढू लागला आणि उपांत्य आणि अंतिम फेरीतील या मुलींचे खेळ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धींचे खेळ बघून यांच्या क्षमता आणि सामन्यातली रंगत पुरुष खेळापेक्षा तसुभरही कमी नसल्याची जाणीव ज्यांनी ज्यांनी हे सामने पाहिले त्यांना झाली.
पण तरीसुद्धा ज्यांनी हे सामने पाहिलेच नाहीत त्यांनासुद्धा याची जाणीव होण्यासाठी भारताला विजयच आवश्यक होता. कारण त्यामुळे २५ जून १९८३ नंतर पुन्हा एक सामाजिक उलथापालथ झाली असती. सगळ्या जणी भावी मिताली किंवा झुलन होऊ शकल्या नसत्या तरी एखादी मिताली किंवा झुलन हातात कधीच चेंडू फळी न आल्यामुळे लपून राहिल्या नसत्या. मुलींना एक प्रकारचा आत्मविश्वास आला असता कि आपण त्या सार्या गोष्टी करु शकतो जो कि एक मुलगा करु शकतो. सौदंर्य स्पर्धा व्यतिरिक्त ही आपण खूप वेगळ्या वाटेनेही स्वतः ठसा उमट पालकांनाही मुलांना वेगळ्या पद्धतीने आणि मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढविण्याची गरज नाही, याची जाणीव झाली असती. कारण आता समाजात थोड्याफार प्रमाणात मुलींना आपल्या मनाचे ऐकण्याचे स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याच्याही उपयोग आत्मविश्वासाच्या अभावाने पारंपरिक रूपात अडकून राहण्यात होतो. T.V. , Internet चाही वापर पारंपरिक महिलांचे रूप कुरवळण्यासाठिच होतो आहे. आणि महिला सबलीकरणची व्याप्तीही लोचण, पापडाच्या बाजारपेठेच्या पुढे जात नाही आहे. यासार्याला या विश्व चषकाच्या विजयाने छेद गेला असता.
असो जे काही हाती लागले ते ही नसे थोडके पण तरीही राहून राहून वाटते कि
*विजयच हवा होता.....*
कपिल मुळे
९७६७८९७४१४
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment