Saturday, July 29, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग २ )

शाहूराजाची एक गोष्ट मला नेहमीच त्यांच्या विषयी आदरभाव उत्पन्न करते. शाहूराजाने राज्यकर्ता असूनही आपल्या जनतेतीला सामान्य माणसापासून अनेक बुध्दीवंत माणसांना योग्य प्रकारे " जपले " व त्यांना सतत प्रोत्साहीत केले. हा रयतेचा राजा जसा सामान्य माणसाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खात होता तसेच तो बुध्दीवंत माणसांनाही हृदयाजवळ जपत होता. अनेक मोठे बुध्दीवंत शाहूराजाजवळ वर्षानुवर्षे राहिले त्याचे हे एक कारण होते. एक गोष्ट ऐकवतो....

हे पण वाचा : शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग १ )

भाई माधवराव बागल...हे नाव महाराष्ट्रात सर्वपरिचीत आहे. भाईंच्या लग्नावेळी घडलेली ही गोष्ट. भाईंचे वडील खंडेराव बागल हे कोल्हापूर संस्थानातील नामी व्यक्तीमत्व . आपल्या मुलाचे अर्थात भाईजींच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला शाहूराजाकडे गेले. आमंत्रण मिळताच शाहूराजानी त्यादिवशी काही कामानिमित्त यायला जमणार नाही लग्नाला असे सांगून टाकले. खंडेराव थोडे नाराज झाले. त्यावेळी लग्नखर्चातील एक सन्माननीय खर्च म्हणून शाहूराजांना आहेर करण्यासाठी ५०० रुपयाचि रक्कम खंडेरावानी अलग बाजूला ठेवली होती. शाहूराजानी लग्नाला यायला नकार देताच खंडेराव नाराज झाले खरे पण त्यांना ती ५०० रुपयाची रक्कम इतरत्र वापरता आली. शाहूराजा येणार नसल्याने खंडेराव निश्चिंत होऊन आपल्या लगीनघाईत रमून गेले. लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाची वेळ झाली. अचानकच शाहूराजा मंडपजवळ हजर झाले. महाराज अचानकच लग्नाला आल्याने खंडेराव थोडे गोंधळले . कारण महाराजांच्या आहेराचा खर्च त्यांनी इतरत्र केला होता. महाराज हसतहसत लग्नाला आले व आपल्या कडून बागल दांपत्याला " आहेर " देऊन गेले. .....ही गोष्ट काय सांगते ? शाहूराजाचे हृदय ज्यांना ठाऊक आहे त्यांना यातील मर्म अचूक कळते. आपण लग्नाला येणार म्हटल तर खंडेराव आपल्याला आहेर करणार व त्याचा बोजा त्यांच्या वर पडणार हे त्यांना ठाऊक होते. म्हणून जाणीवपूर्वक सुरुवातीला नकार दिला व अचानक लग्नाला हजेरी लावून बागलांनाच आहेर करून त्यांना खूश करून टाकले. आजकाल आपण पाहतो की , सध्या काही नेत्यांच्या नावे सामान्य कार्यकर्ते लग्नपत्रीका काढतात. " अमुक अमुक साहेबांचा शुभाशिर्वाद " असे ठळकपणे छापले जाते. तो नेता लग्नाला येणार म्हणून लगीनघरातील एक यंत्रणा कामाला लागलेली असते. नेत्याचा व बरोबरीने येणाऱ्या त्याच्या कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान करणे हे एक " परमपवित्र कर्तव्य " होऊन बसते. नेता येतो ( नेहमीप्रमाणे वेळानेच ) येताना दहाजण बरोबर घेऊन येतो , लगीनठिकाणी बडेजाव मिरवतो , फोटोसेशन करतो , हाय - हँलो करत हात हलवत बाय बाय करून जातो. न देणं न घेणं असा हा विचित्र व्यवहार असतो. आपण काय बोलावे ? कारण इथे ना कुणी शाहूराजा असतो ना कुणी खंडेराव बागल..

आपल्या कार्यकर्त्यांची नेमकी स्थिती काय आहे...तो कोणत्या संभ्रमात अथवा अडचणीत आहे..त्याला किमान आपल्या मुळे कोणत्याही त्रासाला तोंड द्यावे लागणार नाही ...ही काळजी नेत्याला असायला हवी. तर न् तरच नेत्याविषयी निष्ठा व विश्वास कायमस्वरुपी निर्माण होतो. शाहूचरित्र हेच तर शिकवते...

*!! जपावे माणसांना कळवळीने , तरच जपले जाते नाते कायमचे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना? 
आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...