Wednesday, July 26, 2017

शाहूचरित्र...काय शिकवते ?? ( भाग १ )

छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनप्रवास आदर्शवत आहे. शाहू महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला  शाहू महाराजापासून आपण काय शिकले पाहिजे , या विषयावरील "शाहूचरित्र...काय शिकवते ?? " ही उमेश सूर्यवंशी यांची लेखमालिका आपल्या ब्लॉगवर देत आहोत.या लेखमालिकेचा दररोज एक भाग प्रकाशित केला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------

शाहूचरित्र...काय शिकवते ?? ( भाग १ )

आपल्या देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही प्रशासकाला आपल्या जनतेशी कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभाराकडे पाहावे लागेल. अत्यंत छोट्या संस्थानात राहूनही अत्यंत मोठया कामांना लीलया हात घालून ते पूर्णत्वास कसे न्यायचे , त्या कामात जनतेचा कसा सहभाग करून घ्यायचा , आपल्या प्रशासनाला कसे कृतिशील करायचे आणि एक आदर्श व्यवहार वास्तवात कसा उतरवायचा याचे अनोखे दर्शन लोकराजा शाहूराजाच्या चरित्रात पावलोपावली दिसून येते.

लोकराजा शाहूंच्या जीवनातील एक गोष्ट प्रख्यात आहे.१९०२ साली शाहूराजांनी एका अनोख्या क्रांतीस जन्म घातला. संस्थानातील उपलब्ध जागांपैकी ५०% जागा ह्या मागासवर्गीय समाजाकरता राखून ठेवण्याचा निर्णय झाला. 'आरक्षण' ह्या धोरणाची कृतिशील सुरुवात होती ही. याला समर्थन मिळाले तसाच विरोधही होऊ लागला. अभ्यंकर नावाचे गृहस्थ शाहूराजाकडे आले आणि त्यांनी या आरक्षण धोरणा विरोधात आपली तक्रार सांगितली. तेंव्हा शाहूराजांनी त्यांना घोड्यांच्या तबेल्यात नेले. घोड्यासमोर खाद्य पसरले. धडधाकट व तंदुरुस्त घोड्यांनी पुढे येऊन सारे खाद्य संपवले न् काही दुबळी घोडी ते खाद्य मिळवण्यात अपयशी ठरली. तेंव्हा हे दृश्य अभ्यंकराना दाखवून काही खाद्य मुठीत घेऊन दुबळ्या घोड्यांना शाहूराजांनी चारले. अभ्यंकराना " आरक्षण नीतीचे मर्म " समजले.
ही गोष्ट आठवण्याचे कारण हे की या गोष्टीचे मर्म आमच्या शासनकर्त्यांना कधी कळणार ? ....हा पडलेला प्रश्न. उदाहरणच बघूया...सध्या शेतकरी कर्जमंजुरीचा विषय बराच गाजतोय. शेतकरी संपावर जाण्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना व त्यांचे नेते , बरोबरीला विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. यातून काही चर्चा घडून कर्जमाफी घोषित झाली. मला इथे सांगायचय की...शासनस्तरावर एकही मंत्री अथवा आमदार , कृषीखात्यातील अधिकारी यांनी पुढे येऊन तमाम आंदोलकांना , शेतकऱ्यांना , राजकीय विरोधकांना प्रत्यक्षात बांधावर नेऊन " फायद्याच्या शेतीचे गणित " समजावून सांगू शकत नाहीत असे का  ??  कर्जमाफी हा वरवरचा उपाय आहे असे शासन सांगते व मलाही ते मान्य आहे . तर मग शेतीला लागणाऱ्या पुरक उद्योगाची माहिती , शेतीत करावी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाची गुंतवणूक , हवामानानुसार घ्यायची पिके , जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मिळवायची संधी , उत्पादनाच्या खर्चावर कमीत कमी खर्च कसा करता येईल याचे गणित मांडून का नाही दाखवले गेले ?? ....याचे कारणच मूळात आजचे शासन हे शाहू विचारांचा वारसा सांगत नाही. राजाला असावी लागणारी दूरदृष्टी आजकालच्या ( गेल्या ५० वर्षातील शासनकर्ते ) सरकारजवळ नाहीय. त्यामुळं विरोधी मत घेऊन आलेल्या अभ्यंकराना जसे शाहूराजाने प्रत्यक्ष उदाहरण समोर दाखवले तसे आमचे राज्यकर्ते दाखवू शकत नाहीत. परिणाम....जनता व शासन दरी नेहमीच रुंदावत राहिलीय. याचा विचार होणार की नाही ??

शासनकर्ता ..मग तो कुणीही असो , त्याला जनता व विरोधक यांच्या बरोबर संवाद साधण्याची हातोटी व कौशल्य असावे लागते. ते असेल तर कोणत्याही निर्णयाकरता पळवाटा शोधल्या जात नाहीत व घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर " बिनडोकी कष्ट " घ्यावे लागत नाही. शाहूचरित्र ...हेच शिकवते.

*!! शासनकर्ता..अभ्यासू , निश्चयी , दूरदृष्टीचा असावा !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

      जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...