Thursday, February 1, 2018

जीवनात " ब्रेक्स " असणे महत्वाचे

फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला
" कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात ? "
त्यावर निरनिराळी उत्तरे आली
" थांबण्यासाठी "
" वेग कमी करण्यासाठी "
" अपघात टाळण्यासाठी "
परंतू सर्वात चांगले उत्तर होते
" जास्त वेगाने जाता येण्यासाठी "
असे कसे ? जरा विचार करा.
जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल?
कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.
      जिवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात. परंतू लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.
म्हणूनच जिवनात अधूनमधून येणाऱ्या अशा " ब्रेक्सची " जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...