वॉल्ट डिस्नीची यशोगाथा ही अनेक वेदनादायक घटना आणि अपयशांनी भरलेली आहे.
ज्यावेळी पहिले महायुद्ध जोरदारपणे सुरू होते. अनेक सैनिक विरगतीस प्राप्त होत होते.तितकेच जखमी होत होते. या भयानक युद्धध्ये रेड क्रॉस ही जागतिक ससंघटना युद्धातील जखमी सैनिकांची सेवा करत असे. या संघटनेत वॉल्ट डिस्नी स्वयंसेवक म्हणून सेवा देत असत. महायुध्द संपले आणी ते घरी परतले तेव्हा त्यांच्या भावी जीवनाचा विचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा वेळ होता. त्यांना कार्टून गती चित्रे बनवायची होती. 1920 सालामध्ये मध्ये त्यांनी त्यांच्या स्वत: च्या कंपनीची स्थापना केली.
त्यावेळी ते एक भाड्याच्या खोलीत राहत व त्यांच्याकडे भाडे भरण्यासाठी लागेल इतकाच पैसा होता. त्यामुळे ते त्यांच्या मित्रांसोबत राहत असत. आणि बर्याचदा पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे उपाशीपोटी राहणे त्यांना भाग पडत असे. या कठीण काळात त्यांचे एकही कार्टून विकण्यात ते अयशस्वी ठरले .
कान्सास सिटीमध्ये त्यांनी बनवलेल्या व्यंगचित्र मालिकेच्या अपयशामुळे ते वयाच्या 22 दिवाळखोर बनले. ते अनेक वेळा दिवाळखोरीत गेले. त्यांना हॉलीवूडचा अभिनेता बनायचे होते पण ते त्यांना कधीही शक्य झाले नाही. एका वृत्तपत्राच्या संपादकाने एकदा त्यांना आळशी आणि सर्जनशील व नवनवीन कल्पनांचा अभाव असलेला व्यक्ती असा आरोप केला होता.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी कॅन्सस सिटी सोडले. त्यांनी तेथील एक गॅरेजमध्ये एक स्टुडिओ उभारला आणि, पाच वर्षांनंतर - बऱ्यापैकी कमाई होत नसताना ते 'अॅटिस इन कार्टूनलँड' आणि 'ओसवाल्ड द सब्बट' या लघु अॅनिमेशनसह खूप यशस्वी झाले.
पण पुन्हा 1928 मध्ये त्यांच्यासोबत असणारे काही कार्टूनिस्ट त्यांना सोडून गेले . डिस्ने फुटली होती. त्यामुळे त्याची यशस्वी कामगिरी फारच थोड्या काळासाठी राहिली आणि त्यांच्याकडे फारच थोडा पैसा राहिला .
पण त्याच्या यशाचे रहस्य त्याच्यामध्ये सामावलेले होते. या आपत्तीतून त्यांनी मिकी माऊस कार्टून तयार केले आणि ते यश मिळविण्याच्या मार्गावर आरूढ झाले .
Miki mouse |
कसा बनला मिकी माऊस :
एकदा एका चर्चच्या मुख्य पाद्री ने त्यांना काही कार्टून बनवण्याचे काम दिले होते. चर्च मध्ये येणाऱ्या लहान मुलांसाठी कार्टून तयार करण्याचे काम मिळाल्यामुळे वॉल्ट डिस्ने आनंदी झाले. ते त्यांचे काम चर्च मध्ये करत असताना त्यांना काही आवाज ऐकू आले. त्यांनी बघितले काही उंदीर चर्चमध्ये आवाज करत इकडून तिकडे फिरत होते ,पळत होते. त्या उंदरांना बघून त्यांना वाटले ह्या उंदरांना आपण कार्टून चे रूप दिले तर.. आणि त्यांनी आपला विचार प्रत्यक्षात आणला आणि 15 मे 1928 साली तयार झाली मिकी माऊस फिल्म प्लेन क्रेझी ने मग सर्व जगात एकाच धमाल उडवून दिली . या एका फिल्म मुले वॉल्ट डिस्ने घराघरात पोहचले.
Mini mouse |
मिकी माऊस बद्दल काही न माहीत असलेलं :
1. दुसऱ्या महायुद्धात काहीसैन्याच्या काही अधिकारी वर्गाने गोपनीय माहितीसाठी मिकी माऊस हा शब्दच पासवर्ड म्हणून वापरला.
2. मिकी माऊस ने बोललेला पहिला शब्द होता : हॉट डॉग
3. मिकी माऊसचे पहिले नाव होते माँर्टीमर वॉल्ट डिस्ने च्या बायकोने मिकी माऊस हे नाव सुचवले
4. मिकी माऊस पहिल्यादा ब्लॅक अँड व्हाईट रुपात पडद्यावर आला.
5. 18 नोव्हेंबर 1928 साली मिकी माऊस स्टीम्बोत विली या फिल्म मधून पडद्यावर आला म्हणून हा दिवस त्याचा जन्मदिवस मानला जातो.
6. मिकी माऊस ला पहिला आवाज वॉल्ट डिस्ने यांनी स्वतः दिला होता.
7. 1932 ते 1969 या काळात डिस्ने यांनी 22 एकादमी पुरस्कार मिळवले.
वॉल्ट डिस्ने नेहमी म्हणत, माझ्या जीवनातील माझ्यावरील सर्व संकट, माझे सर्व त्रास आणि अडथळे यांनी मला बळ दिले आहे ...
No comments:
Post a Comment