Saturday, February 24, 2018

मैलाचे दगड काय सांगतात माहित आहे का?

मैलाचे दगड काय सांगतात माहित आहे का?


रस्त्याने भटकंती करताना बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला काही दिशादर्शक दगड दिसतात. या दगडावरून प्रत्येक मार्गावरचे गाव, तेथील शहरे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे साधारण अंतर बऱ्याचदा स्पष्ट होत असते, कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या या दगडांच्या रंगाचा, तसेच हे दगड लावण्यामागे एक विशिष्ट अर्थ असतो. तसेच या रंगाची ही काही वैशिष्ट्ये आहेत. काय आहेत ही वैशिष्ट्ये पाहूया…

१. पिवळा रंग

ज्या रस्त्यांची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केलेली असते अशा रस्त्यांवर अंतर दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्गावरच पिवळ्या रंगाचे दगड हे दिशादर्शक म्हणून लावले जातात. हे रस्ते एक प्रदेशाला दूसऱ्या प्रदेशाला जोडण्याचे काम करत असून त्याची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.

२. हिरवा रंग

राज्य महामार्गाच्या रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिशा दाखवण्याचे हिरव्या रंगाचे दगड करतात. मोठ्या शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाची देखभाल ही राज्य सरकारकडून करण्यात येते.

३. नारंगी रंग

प्रवासादरम्यान नारंगी रंगाचे दगड दिसले तर हा रस्ता एखाद्या छोट्या गावाला नेणारा आहे असे खुशाल समजावे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्यांची निर्मिती करण्यात येते.

४. निळा किंवा काळा रंग

या रंगांच्या अर्थ तुम्ही एखाद्या शहराच्या जवळ पोहचला आहात असा असतो. हा रस्ता जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. याची निर्मिती स्थानिक पीडब्ल्यूडी खात्याकडून करण्यात येते.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...