कांझा जावेद माझी आवडती लेखिका आहे.तिच्या पुस्तकामधील एक उतारा वाचकांसाठी देत आहे.पाकिस्तानी वर्गामधील मुले व लेखिका यांच्यामधील सवांद आहे ,विचार करायला लावणारा प्रसंग आहे.तो असा आहे ......
एकदा वर्गात आम्ही "गांधी" विषयी काही वाचत होतो.बोलत होतो.
वर्गातला सगळ्यात खट्याळ आणि डांबरट मुलगा म्हणजे राफे.तो नेमक्या टिप्पण्या काढून विषयाला फाटे फोडायचा.त्यांन हात वर केला.......
मी म्हटलं ,विचार प्रश्न....
राफे उठून म्हणाला,'पर गांधी तो हिंदू थे,और हिंदू तो अमनपसंद है ही नही.वो तो पाकिस्तानपर कब्जा करना चाहते है,हमे कत्ल करना चाहते है?'
एक शिक्षक म्हणून बराच अनुभव एव्हाना गाठीशी आल्यानं अश्या वाक्यांनी धक्के बसणं, हादरून जाण एव्हाना बऱ्यापैकी कमी झालं होत.हि मुलं काय काय विचार करतात,करू शकतात,याच मला एव्हाना अंदाज यायला लागला होता.म्हणून मग मी राफेलाच विचारलं,
'आपको क्यो ऐसा लगता है की, हिंदू हमे मार डालना चाहते है?'
राफे म्हणाला 'क्यो की वो हमे बिलकुल भी पसंद नही करते!'
मी काही बोलणार तेवढयात मागच्या बेंचवरून एक हात वर आला.अब्दुस समद हात उंचावत म्हणाला,
'पर वो क्यो हमे पसंद नही करते?'
'-....क्यो की हम पाकिस्तानी है!'
'और वो पाकिस्तानियोंको क्यो पसंद नही करते?'
'-क्यो की हम उन्हें पसंद नही करते,वी हेट देम!'
'क्यो ,हम क्यो उन्हें हेट करते है?'
'-क्यो की वो हमे हेट करते है,बिकॉज दे हेट अस...'
-एरवी वर्गात गोधळ घालणार राफेल काही बोलला नाही.ही प्रश्नोत्तर ऐकून खिदळणारा वर्गही शांत झाला.जे शाब्दिक भांडण तावातावाने लढल जात होत,ते आता त्याहून जास्त वेगानं राफेच्या डोक्यात सुरु असणार ,हे मला कळत होत.
अपुऱ्या माहितीवर आपण वाद घालत आहोत आणि अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत;हि एक शक्यता आहे एवढं तरी माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलाच्या मनात शिरलं होत.
सीमेच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या लोकांनी एवढं केलं तरी पुरे आहे.
खरतर आपल्या आयुष्यातही हे करण टळत नाहीच की ! आपल्या मनातल्या शत्रूप्रतिमेविषयी प्रश्न उपस्थित करायचे म्हणून नव्हे ,तर आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो,त्या कल्पना नक्की आल्या कोठून हे तपासून पाहायचं तर एखाद पाऊल मागे जावून जरा हिशेब करावाच लागतो.
किती सहजतेने आपण आपल्या भूमिका ठरवतो? ज्या आदर्शाच्या पायाशी आपण सार आयुष्य वाहायच म्हणतो,ज्यांच्यावर आयुष्यभर श्रद्धा ठेवतो ती विचारसरणी स्वीकारताना आपण कितीसा नि काय विचार करतो?
मी निदान माझ्यापुरता तरी या "का?"तंत्राला चिकटून राहायचं ठरवलं आहे.
या एका 'का' नं मतभेदांच्या जगात तरून जाणं शक्य आहे,हे मी पाहिलं आहे.
लेखिकेचा परिचय
नाव :कांझा जावेद
भारतानं जगतिकरणाची वाट धरली, त्याच वर्षी पाकिस्तानमध्ये जन्मलेली कांझा जावेद ही पंचवीशीतील तरुणी पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध लेखिका आहे.
पाकिस्तानमधल्या तरुण पिढीतील आयुष्यातल्या विरोधाभासांवर बोट ठेवणारी "अँशेस, वाईन अँड डस्ट "ही तिची पहिलीच कादंबरी चर्चेचा विषय ठरली.
अमेरिकेतल्या ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत पाकिस्तानी स्थलांतराच्या लेखनाचा विशेष अभ्यास केल्यानंतर कांझा जावेद सध्या अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठात "रायटिंग इन्सट्रक्टर" म्हणून काम करते आहे
No comments:
Post a Comment