Tuesday, November 29, 2016

विचारधन

ज्या देशातील तरुण केवळ देव धर्मा मागे धावत राहतो, त्याला मी केवळ नामर्द हाच शब्द योग्य आहे असे म्हणेन. स्वतः चे हात पाय चालवता येत नाहीत म्हणून देवापुढे हात जोडत असलेल्या तरुणाच्या हातात देश गेल्यास तिथे काहीही साध्य होणे शक्य नाही.
*-भगतसिंग*
अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या - गांजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी. बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही... देव आपल्या मनात राहतो, देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते.
*राष्ट्रसंत संत गाडगेबाबा*
समाजातील सर्व विकारांचे मर्म कर्मकांडांत आहे. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत ते सर्व परिपाठ भिक्षुकांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत.  या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते .
*-प्रबोधनकार ठाकरे*
माझ्या स्वराज्यात जातीपातीला आजिबातच थारा नाही.
*-छत्रपती शिवराय*
जातीभेद एक मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की, तो झटकन बरा होतो .
*-बाबासाहेब आंबेडकर*
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधा-यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
    - *पु.लं.देशपांडे*
अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी, कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल, फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात, ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले, आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.
- *नरेंद्र दाभोळकर*
शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे.
- *राजर्षी शाहू महाराज*
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...