Tuesday, November 29, 2016

लग्न म्हणजे काय असतं...!

♥♥लग्न म्हणजे काय असतं...!♥♥
.
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं...!!
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला "मस्त" म्हणायचं असतं...!
लग्न म्हणजे काय असतं...!
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं...!!
महाराजबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं...!!!
लग्न म्हणजे काय असतं...!
तो कितीही "म्हातारा" झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं...!!
"मी जाड झालेय का...?"
या वाक्याला
कधीही "हो" म्हणायचं नसतं...!!!
लग्न म्हणजे काय असतं...?
दोन्ही घरच्या नात्यांना
आपुलकीने जपायचं असतं...!
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना
हसत हसत विसरायचं असतं...!!
थोडक्यात काय...???
लग्न लग्न म्हणजे काय असतं...???
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं compromise असतं...!
कारण "we will grow old together"
असं एकमेकाला केलेलं promise असतं...!!
लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते...!
तिथली आकडेवारी ही चुकायचीच...!!
पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल, तितक्या जास्त वेळाचा सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो....!!!!!!
शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात...!
शब्दांची ओंजळ बनवा...!
थोडंसं गळेल पण तुटणं टळेल...!!
लग्नानंतर खरंतर आपल्या जोडीदाराला मिठीत ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी, पण
इथे 'मिठीत' नाही तर 'मुठीत 'ठेवण्यासाठी धडपड चालू असते...!!!
संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे हे ज्यांना कळले, ते संसारात जिंकतात...!
नाती मुठीत घुसमटतात, मिठीत फुलतात...!!
.l

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...