जाती
एकाच विहरीवर
पाणी शेंदू लागल्या आहेत
पण पोहऱ्याचे रंग
बदललेच नाहीत
आता
एकाच एसटीत
सर्वांचा प्रवास
पण खाली उतरताना
गावाला अजूनही
जातीच उतरताना दिसतात
आंतरजातीय वऱ्हाड
मिसळत एकमेकांत
पण धार लावलेली
एक कुऱ्हाड
असतेच ना
प्रत्येकाच्या मनात
मुलं बसतात शाळेत
एकमेकांना खेटून
पण त्यांचीच जातवारी काढून
प्रत्येकाला तक्त्यावर
बसवले आहेना फोडून फोडून
आठ अ च्या उतार्यावर
आडनाव बदललं आहे
माणूस असल्याची
नोंद झाली आहे,
पण
भिल्लांची दोन
वडाऱ्यांची तीन
रोमोश्यांची चार
अशी जगप्रसिद्ध घरं
गावातच आहेत ना अजून
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
Sunday, November 20, 2016
जाती
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment