बेझवाडा विल्सन यांचा जन्म १९६६ सालचा.अल्पसंख्य तेलगू दलित.विल्सन यांचा हा समुदाय आंध्र परदेशातून कोलारला स्थलांतरित झाला.
कोलार इंग्रजांनी विकसित केलेलं शहर.इथल्या सोन्याच्या खाणीवर इग्रजांच मोठं लक्ष.या सोन्याच्या खाणीमुळेच कोलार वसलं.शिवसमुद्र प्रकल्पातून तयार वीज सर्वात प्रथम कोलारला देण्यात आली.
कोलरमध्ये १९२० साली वीज आली,बंगळुरुमध्ये इंग्रज सैन्याच्या बटालियन आल्या का तर इथं सोनं काढायचं खाणी होत्या म्हणून. त्या विजेच्या प्रकाशात इतरांची घरं उजळली आणि काही माणसांच्या आयष्यात मात्र मानवी विष्ठा वाहनच आलं.......वीज पोहचली,रस्ते निर्माण झाले कि त्या भागाचा विकास होतो म्हणतात........ह्यालाच विकास म्हणतात का?कोण म्हणतं हे? इथतर गरीब-श्रीमंत अशी दारीच उभा राहिलेली दिसते.काही दशकात ती काहीशी नाहीशी झाली अस दिसत असलं तरी आजही ती शिल्लक आहेच......
कोलरमध्ये वीज आणि इतर सोयी असल्या तरी संडास जुन्याच पद्धतीचे होते.कोरड्या संडासातील मैला उचलायचा आणि डोक्यावर वाहून तो लांब फेकायला,हे काम बिजवडा याच्या समुदायाला करावे लागे.
थोटी जात.म्हणून घाण साफ करायचं आणि अस्पृश्य म्हणवून घ्यायचं आयुष्य आमच्या वाटेला आलं अस ते म्हणत.त्यांचे आईवडील दोघेही त्या काळी पाट्या वाहायच काम करायचे.बिजवाडा विल्सन शाळेत जायचे,त्यांना प्रश्न पडायचा कि,आपण का दुसऱ्याची घाण उचलायची? पण याच उत्तर कोणाकडे नव्हतं.पैसे हवेत,जगायचं तर हे काम करावंच लागेल अस घरचेही त्याना सांगत.बिजवाडा विल्सन आधी कोलरला मग हैदराबादला शिकले.तिथून ते शिक्षण पूर्ण करूं परत आले.लोकांना सांगत,हे काम करू नका.
पण लोक ऐकत नसत,उलट हा मुलगा आमच्या पोटावर पाय देतोय,त्याला आवरा अस लोक त्यांच्या घरच्या लोकांना सांगत.बिजवाडा विल्सन विषण्ण व्हायचे.एका माणसाची घाण दुसरा माणूस वाहतो,साफ करतो आणि साफ करणाराच अस्पृश्य ठरतो.हे एकीकडे तर दुसरीकडे आजारपण,दारूची व्यसनं, लहान मुलांना कामावर मदत म्हणून घेऊन जाण, त्या मुलांची घाणींन माखलेली अंग पहिली कि ते निराश होत.
त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला.लोकांमध्ये जागृती केली,लोकांना योग्य मार्गदर्शन केले. याकामी सरकारकडून मदत मिळावी ह्यासाठी ते सरकारी कार्यालयात जात,तेथील एका सुप्रिटेडने त्यांना सांगितले कि थेट पंतप्रधान राजीव गांधींना पत्र लिहा . त्यांनी राजीव गांधींना पत्र लिहिले,सोबत फोटोही पाठवले,कि पहा आपल्या देश्यातल्या माणसांच हे जिणं.........
तेव्हा कुठं सरकारी यंत्रणा हलू लागली.आणि कायदे झाले,त्याची अंमलबजावणी सुरु झाली.मानवी विष्ठा डोक्यावरून वाहण्याच हे काम बंद व्हावं म्हणून बिजवाडा विल्सन झगडत राहिले.
सरकारनं कायदा केल्यामुळे कोलार परिसरातील हे काम बंद झालं.पूर्ण देशात हे काम बंद व्हावं म्हणून बिजवाडा विल्सन दिल्लीला आले .
त्यांचा भाऊ सांगतो,जाताना तो म्हणाला,मी तुमचाच आहे,पण तुमचा नाही अस समजा, नाहीच आलो कधी तर वाट पाहू नका.......माणसाच लाचार जगणं कदाचित मी मरेपर्यंत संपणार नाही,पण मला प्रयत्न तर करू द्या..........
बिजवाडा विल्सन याना या कामासाठी मॅगसेसे अवॉर्ड मिळालं आहे.त्याच्या लढ्याच यश या अवॉर्ड मध्ये जितकं आहे त्यापेक्षाही त्यांच्या या प्रयत्नामुळे जे हजारो लोक या गुलामगिरीतून मुक्त झाले,शिक्षण घेणून,प्रतिष्ठा मिळवून जगू लागले,अन्यायाविरुद्ध लढत देऊ लागले यात आहे अस मला वाटते.
Saturday, November 19, 2016
बेझवाडा विल्सन
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment