Tuesday, August 1, 2017

शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग ३ )

   सामान्य जनता व राज्यकर्ते यांच्यातील कोणत्याही प्रकारचे अंतर खरे तर असू नये. हूशार व प्रजेची काळजी वाहणारा नेता हा नेहमीच लोकांच्यात वावरतो. बेधडक मिसळतो. सामान्य माणसाला तो कायमचा उपलब्ध असतो. या कारणाने नेता व सामान्य जनता यांच्या मध्ये विश्वासाची एक नाळं तयार होते. लोक आपल्या नेत्याला थेट भेटू शकतात. तै नेता कितीही मोठा होवो पण..पण तो माणूस म्हणून आजही आपल्यातलाच आहे ही विश्वासार्हता निर्माण होते ते अशाच प्रकारे. शाहूराजाने आयुष्यभर अशी विश्वासार्हता मिळवली , टिकवली व उत्तरोत्तर ती वाढतच गेली. एक नजर या उदाहरणावर टाकुया...

( हे पण वाचा शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग २) )

*शाहूराजा...हा सोनतळी या आपल्या ठिकाणाहून निघताना व इतरही बरेचदा " खडखडा " नावाच वाहन वापरत. खडखडा म्हणजे ज्याच्या चाकांचा आवाज खाडखाड निघतो असे वाहन. या वाहनाला पुढे आठ घोडी जुंपलेली असत. फारच लांबीला असणारा हा खडाखडा म्हणजे शाहूराजाच्या आगमनाची वर्दी असायची. सामान्य लोक या वाटेवर महाराजांची वाट बघत थांबायची. शाहूराजा सोनतळीवरुन निघताना वाटेत भेटणारे प्रत्येक नागरिकाला खुशाली विचारत. या खडखड्यामध्ये आपल्या बरोबर इतर नागरिकांना बसवून फिरवत. कोणत्याही जातीधर्माचे इथे वावडे नव्हते. महाराजांच्या अनेक अव्दितीय कामाचा हा खडखडा साक्षीदार आहे. " राजा आपल्या सुखदुःखाला कायमचा उपलब्ध आहे " ही सार्थ भावना रुजवणेत शाहूराजे यशस्वी ठरले आणि म्हणूनच जगातील सर्वोत्तम राजात गणले गेले. " राजर्षी " ही उपाधी फक्त शाहूराजाच्या पुढे लागते त्याला कारण हेच. ....आजकालचे आमचे राजकारणी कसे वागतात हो ? सरपंच पासुन प्रधानमंत्री पर्यत जरा नजर लावा. एखाद्या आमदाराच्या गाडीमागे आणखी चार गाड्या त्याच्या खूशमस्करी करणाऱ्या भांडांच्या असतात. एखाद्या मंत्र्याचा दौरा असेल तर वाहनांची रांग मोठी असते व खास त्याच्या वाहनाला पुढे जाऊ देण्याकरता इतर सामान्य लोकांची वाहने बराच वेळ रस्त्यावर अडवली जातात. मंत्र्याचा तो " ताफा " असतो. अशामुळे म्हणे यांची " प्रेस्टीज " वाढते. खरेतर याच कारणाने या लोकप्रतिनिधी व सामान्य जनते मध्ये अंतर पडत जाते,हे सत्य त्यांना समजेल तो सुदिन...*

लोकांच्यात जो मिसळतो व वावरतो तो लोकप्रतिनीधी नेहमीच स्मरणात राहतो. कितीही वर्षे तुम्ही आमदार अथवा मंत्री असा , जोपर्यंत तुमच्या वाहनाच्या काचा खाली होत नाहीत व तुम्ही सामान्य लोकांना किमान दृष्टीला पडत नाहीत तोवर ही लोक " जनप्रतिनिधी " नसतात हेच खरं. शाहूचरित्र ....हे आपणांस दाखवून देते.

*!! संपर्क ठेवा जनतेशी...तरच असाल " जनप्रतिनिधी " !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

( हे पण वाचा शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग १ ) )

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...