Saturday, April 20, 2019

⛽पेट्रोल पंपवर मोफत मिळतात 'या' सुविधा; तुम्हाला माहितीहेत का?


◼इमर्जन्सी कॉल
आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोल पंपवरुन एक फोन कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी पेट्रोल पंप चालक कोणतंही शुल्क आकारू शकतं नाही.


◼गाडीत मोफत हवा
पेट्रोल पंपवर पेट्रोल/डिझेल भरणाऱ्या गाडीत मोफत हवा भरता येते. विनाशुल्क ही सुविधा उपलब्ध आहे.


◼मोफत पाणी
वाहन चालकांना पिण्याचं पाणी मोफत देण्याच्या सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. याशिवाय पेट्रोल पंप चालकांना स्वच्छतागृहाची सुविधादेखील मोफत द्यावी लागते.


◼प्रथमोपचार
एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाल्यास ती व्यक्ती पेट्रोल पंपवर प्रथमोपचार करुन घेऊ शकते. ही सुविधादेखील मोफत आहे.


◼तक्रार पेटी
पेट्रोल पंपावर तक्रार पेटी असणं अनिवार्य आहे. ग्राहक त्यांच्या अडचणी, तक्रारी या पेटीत टाकू शकतात.


◼दर्जाची तपासणी
प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल, डिझेलची तपासणी करण्याचा अधिकार आहे. ग्राहकाला इंधनाच्या दर्जाबद्दल संशय असल्यास तो फिल्टर पेपर टेस्ट करू शकतो.


◼प्रमाणाची तपासणी
इंधनाच्या प्रमाणाची तपासणी करण्यासाठी पेट्रोल पंपवर 5 लीटरचं माप असणं गरजेचं आहे.


◼पेट्रोल दराची माहिती
प्रत्येक ग्राहकाला इंधन भरण्याआधी त्याची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर पेट्रोल, डिझेलची किंमत मोठ्या अक्षरात लिहिलेली असावी.


◼बिलाची मागणी
पेट्रोल/डिजेल भरल्यानंतर बिलाची मागणी करण्याचा अधिकार आहे. फसवणूक झाल्यास ग्राहर बिलाच्या आधारे तक्रार दाखल करू शकतो.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...