1.अल्बर्ट आइनस्टाईन
आइनस्टाईनला शिकवलेलं काहीच समजत नाही म्हणून शाळेतून घरी पाठवून दिलं. तेव्हा घराकडे जाताना आइनस्टाईनला फार वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं की माझी बुध्दी अजिबात काम करत नाही. मी मंदबुध्दी मुलगा आहे. मला काही भविष्य नाही. असे निराशेचे विचार डोक्यात असताना तो घराकडे निघाला होता. वाटेत त्याला तहान लागली होती. तेवढ्यात त्याला एक पाणपोई दिसली आहे. तिथे त्याने पाहिले की एका मडक्यातून थेंब थेंब पाणी पडत आहे. त्यामुळे त्या मडक्याच्या खाली असणारा दगड झिजून त्यात खड्डा पडला होता. त्यावेळी छोट्या अल्बर्टने विचार केला की, "पाण्याच्या लहान थेंबाने जर एवढ्या कठीण खडकात खड्डा पडत असेल तर भरपूर सरावाने माझ्या मेंदूला निश्चितच थोडंतरी ज्ञान मिळेल. " पुढे काय झालं? ते सगळ्या जगाला माहिती आहे. आइनस्टाईनने विज्ञानात एवढी मोठी क्रांती घडवली की, आधुनिक विज्ञानाचा कालखंड मोजताना आइनस्टाईनच्या आधीचे विज्ञान व आइनस्टाईनच्या नंतरचे विज्ञान असा विचार केला जातो. ज्या नद्या बारमाही वाहतात. त्या नद्यांमध्ये कसलेही ओबडधोबड दगड धोंडे टाकले तरी त्यांचे गुळगुळीत गोट्यात रुपांतर झाल्याशिवाय राहत नाही. त्या दगडांना वाहत्या प्रवाहात राहिले की शिस्तीत व सहजपणे गुळगुळीत आकार प्राप्त होतो.
2.सचिन तेंडुलकरची.
सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तो जोपर्यंत क्रिकेट खेळला तोपर्यंत त्याचा सराव एक दिवसही बुडला नाही. त्याच्या संपूर्ण शरीरावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तरीही तो निष्ठेने क्रिकेटचा सराव करत राहिला व विक्रमांचा रतीब घालत राहिला. विक्रम मोडण्याचा विक्रम सुध्दा सचिनच्या नावावर आहे. या सर्व यशाचे मूळ त्याच्या सुरवातीच्या जीवनात सापडते. आचरेकर सर त्याच्याकडून दररोज सराव करून घ्यायचे. त्याला कधीही सरावाला सुट्टी नव्हती. त्याचे मित्र जेव्हा दादर चौपाटीवर वडापाव, भेळ खायचे तेव्हा आचरेकर सर त्याला स्वतःच्या स्कूटरवरून सरावाला घेऊन जायचे. तेव्हा त्याला वडापाव खाण्याचा व सरावाला दांडी मारण्याचा मोह टाळावा लागायचा. या नियमित सरावाच्या सवयीमुळे सचिन घडला. सचिन पेक्षा जास्त प्रतिभावान असणारे खेळाडू सचिनएवढं मोठं योगदान क्रिकेटमध्ये देऊ शकले नाहीत.
No comments:
Post a Comment