Monday, April 29, 2019

भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन  नियम

1. प्रकृतिचा  पहिला नियम:

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व  घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून  व बुद्धीत सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत..

2. प्रकृतिचा दूसरा नियम:

ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.

सुखी सुख वाटतो,
दुःखी दुःख वाटतो,
ज्ञानी ज्ञान वाटतो,
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो,

3. प्रकृतिचा तिसरा नियम:

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण

भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात,
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो,
बातचित पचली नाही तर  चुगली वाढते,
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो,
टिका  पचली नाही तर दुश्मनी वाढते, गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो,
दुःख पचले नाही तर  निराशा वाढते,
आणि सुख पचले नाही तर  ऊन्मत्तपणा वाढतो...

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...