Friday, April 5, 2019

मी कशी होते

मी कशी होते ते त्याला पूर्ण माहित होते जशी होते तशी त्याला आवडत होते बरं चाललं होतं एकुणच आमचं मग कधीतरी तो म्हणाला मला तुझं 'हे हे' आवडत नाही त्याला आवडत नाही म्हणून मी 'हे हे' करणं बंद केलं मग काही दिवसांनी तो म्हणाला तू 'ते ते' करतेस ना त्याचा मला राग येतो मग मी 'ते ते' करणंही बंद केलं मग सगळं बरं चाललं असताना अचानकच तो म्हणाला तुझं 'अमुक अमुक' मला अजिबात मान्य नाही… झालं… मी 'अमुक अमुक' सोडून दिलं अन मग पुन्हा काही दिवसांनी म्हणाला एकदम आईडियल आहे गंआपलं आयुष्य फक्त तुझं ते 'तमुक तमुक' सोडलं तर… झालं… मी 'तमुक तमुकही' सोडून दिलं… आता खूप खूप दिवसांनी मी माझं ‘हेहे', ‘तेते', 'अमुक अमुक', ‘तमुक तमुक' सारं सारं त्याच्या सांगण्यानुसार सोडून दिल्यावर आणि बंद केल्यावर तो म्हणतोआहे, ‘तू आता पूर्वीसारखी नाही राहिलीस ग…' आता बोला…!! ह्याला विहीरीत ढकलू की तलावात प्रियकर , पुरुष किंवा नवऱ्याची ची प्रत्येक गोष्ट ऐकून बदलत बसलात तर आपण आपले राहणारच नाही आणि स्वतःच स्वतःला शोधत बसतो.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...