Tuesday, January 31, 2017

प्रकाशसुर्य कधीही संपवू शकणार नाहीत.

                 जसे प्रकाशाचे दिवस असतात, तशीच अंधारी रात्र असते.अंधार हटवून प्रकाश येत असतो. प्रकाशाला अडवू पाहणारी रात्र कितीही काळीकुट्ट असली तरी तिच्या समस्त अंधाराला छेद देण्यास एक लहान पणतीही पुरेशी असते. ही पणती प्रकाशाचा वारसा सांगते. अशा पणत्या आपण जपायच्या असतात. ज्यांना समाजाला अंधारात ठेवून स्वतःचे हितसंबंध राखायचे असतात ते या पणत्या विझवु पाहतात.
      एक पणती विझली की, या अंधारयात्रींना आनंददायी वाटते. थोडा काळ काळोख पसरतो हे खरे. पण अंधारयात्रींनाअंधार हे माहित नसते कि........त्या पणतीच्या तेजात दुसऱ्या पणत्या जीव धरत असतात......नवीन निर्माण होत असतात. म्हणून तर अंधार हटवायला पुन्हा नवीन पणती येते, अन अंधार छेदून दाखवते.....
             माझ्या आयुष्यात अंधाराचे साम्राज्य ....अज्ञानाचे साम्राज्य हलवायला जय दोन पणत्या कमी आल्या त्यातील पहिली पणती होती डॉ मरेंद्र दाभोलकर, व दुसरी पणती होती कॉ गोविंद पानसरे. पहिल्याने मला विवेक शिकवला व दुसर्याने संघर्ष.माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यातील माणूसपण या दोघांनी घडवले.आयुष्यात या दोघा प्रकाशयात्री बरोबर जो हवास घडला तोच सहवास माझे इवलेसे आयुष्य, माझ्यातील खरे माणूसपण घडवत जाईल.
            या दोन्ही प्रकाशसूर्याना अंधारसाथीनी देहाने नष्ट केल. अंधारसाथींना असे वाटते कि आता आम्ही जिंकलो........पण हा भ्रम आहे त्यांचा. कारण या प्रकाशसूर्याची अनेक किरणे अंधाराला भेदण्यासाठीद विवेकी विचार व लोकशाही संघराह घेऊन केंव्हाच मैदानात उतरली आहेत. उघड्या मैदानावर हि सूर्यकिरणे आपल्या विवेकाचा आवाज बुलंद करत उजळ माथ्याने फिरत आहेत. याउलट अंधारयात्री अर्थात भेकडांची औलाद कोंतून अंधाऱ्या गुहेत तोंड काळे करून बसले आहेत कुणास ठाऊक. अपराधी व्यक्ती आपले तोंड लोकांना दाखवू शकत नाही तसेच या भेकडांचे आहे. दरवेळी हि भेकडांची औलाद अधिकाधिक भेकड बनते.
       महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे हा भेकड किमान समोर येऊन भेकड कृत्य करून गेला. ही भेकड नथुरामची पुढील औलाद मात्र दिवसाढवळ्या खून करून अंधाऱ्या गुहेत आश्रयाला जाते. याचे कारण एकच.........आपण विचारांची लढाई हरलोय याची पक्की जाणीव त्यांना झालीय. विचारांचे शस्त्र जवळ नसेल तर लढाई हरणारच. देह संपवता येतो, पण विचार संपवता येत नाहीत. हे वास्तव या भेकडांना कळेल तो सुदिन.
      आमचे प्रकाशसूर्य आम्हाला विवेकाचा व संघर्षाचा वारसा देऊन गेलेत.तुमच्या हजारो वर्षाच्या अन्यायी व्यवस्थेला घडण्याची किमया आमच्या एकेका प्रकाशसूर्याने करन दाखवलीय. कधी चार्वाक बनून तर कधी बुद्ध...... कधी बसवेश्वर बनून तर कधी तुकाराम.....कधी जोतिबा सावित्री बनून तर कधी शाहू, आंबेडकर बनून.... कधी गांधीजी बनून तर कधी दाभोलकर, पानसरे बनून......आमच्या प्रकाशसूर्यांना गिळण्याची कितीही पराकाष्ठा केली तरीही.......ध्यानात ठेवा ....तोंड तुमचेच भाजेल. कारण हे सूर्य चोख आणि स्वच्छ हृदयातच वसतात.
    ==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे.तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Monday, January 30, 2017

किडनीचे कार्य करणारे उपकरण अखेर विकसित

     बदलती जीवनशैली व अन्य कारणामुळे सध्या जगभरात kidney चा विकार असलेल्या patients ची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या आजारामुळे मोठ्या संख्येने रूग्णांना dialysis machine चा वापर करून घ्यावा लागतो.मात्र, या दशकाच्या अखेरपर्यंत कृत्रिम kidney बाजारात आल्यास या समस्येपासून रुग्णांना दिलासा मिळेल.
    २०२० साल पर्यंत बाजारात कृत्रिम kidney उपलब्ध होईल. मुठीच्या आकाराइतकेइ कृत्रिम kidney device अमेरिकेमध्ये तयार करण्यात आले आहे. FDA कडून मंजुरी मिळेपर्यंत अमेरिकेतील शेकडो patients वर test घेतली जाणार आहे.या चाचणीमधून हे device मानवासाठी उपयुक्त ठरेल कि नाही, हे प्रामुख्याने पहिले जाणार आहे.
University of California आणि San Francisco येथील संशोधक डॉ. शुवो रॉय हे या कृत्रिम kidney device चे सहसंशोधक आहेत. हे device पोटात प्रत्यारोपण केले जाणार असून हृदयाच्या ठोक्यापासून संचलीत होणार आहे.
हे device  असे तयार केले आहे कि ,ते रक्त filter करेलच पण त्याबरोबर हार्मोन्स ही produce करेल. या शिवाय ते किडनीचे काम करत राहील. व blood pressure  ही control करेल .
-----------------------------------------------
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा. आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks!

Sunday, January 29, 2017

स्त्री खरेच मुक्त झाली आहे का ?

स्त्रीचे संरक्षण करण्याची ब्याद नको म्हणून तिला बुरखा घालायला लावणारे, नाहीतर तिचा बालवयातच विवाह उरकून टाकणाऱ्या लोकांना मर्द कसे म्हणायचे ? जाहिरातीतून, सिनेमा-टिव्हीतून स्त्रीदेह म्हणजे एक भोग वस्तू आहे याचाच प्रचार केला जातो. मग युवावर्गात स्त्रीला एकटीला गाठून तिच्यावर बलात्कार करणे हे समर्थनीय आहे, अशी भावना होण्यास पुरूषप्रधान समाजच जबाबदार नाही का ? स्त्रीने काय करायचे, कसे वागायचे, कुणाशी बोलायचे हे सगळे पुरूषच ठरवतात. आणि तीचे संरक्षण करण्याऐवजी जमतील तसे धिंडवडेही काढतात. या दुटप्पीपणाला काय म्हणायचे ? धर्म आणि रुढी यांच्या पायावर उभी असलेली खाप पंचायत बलात्कार करणाऱ्यावर बहिष्काराचे शस्त्र उगारीत नाही, तर बिचाऱ्या बलात्कारित स्त्रीलाच बहिष्कृत केले जाते. हा कोणता न्याय आहे ?
          एकीकडे स्त्रीला देवी मानायचे.... दुर्गा म्हणून पुजायचे आणि दुसरीकडे मात्र स्त्रीचा गर्भ खुडून टाकायचा, स्त्रीचा हुंड्यासाठी छळ करायचा, तिला चूल आणि मुल यातच अडकवून ठेवायचे, तिच्यासाठी ज्ञानाची कवाडे बंद करून ठेवायची हा किती विरोधाभास? एवढे सारे करून आपण सर्व लोक देवीच्या देवळात जायचे धाडस करतो... नवरात्र, दुर्गाष्टमी साजरी करतो हे नवलच आहे.

         सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली.शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का ? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या,हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून,किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे.
     उच्च विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणार्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे.फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का ?
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Saturday, January 28, 2017

“ निर्लज्जपणा ”

       भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातल चिप्सच रिकाम पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली.
माझ्याकड रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या बेगडी देशप्रेमाची.!

त्यान बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकड सरकवलेल नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबल आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारख हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावल. त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची.! 

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली. तिच्या नजरेतली भिक मी स्पष्टपणे पहिली तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दीखावेबाज श्रीमंतीची.!

बलात्काराच्या केस मधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली. बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची.!

एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केल. फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानी नंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकली. मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली. त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची.!

समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या पण जिथे माझा राजान अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली. शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली. प्रेमी युगुलांची नाव लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची.!

गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला. आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे आभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला. डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला. तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची.!

२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या. त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले, माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
.....

पण अजूनही मला लाज नाही वाटत....
माझ्या विक्षिप्त वागण्याची
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Friday, January 27, 2017

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||

( नक्की वाचा . आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा , जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल.. )
"माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय, बघ, वाच, ठरव !
01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!
04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.
05) जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
06) आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.
07) प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
08) अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!
09) माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.
10) आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
- तुझा पप्पा.."
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Thursday, January 26, 2017

26 जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिन

68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर याना विनम्र अभिवादन.

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

गाडीत मिरवणाऱ्या श्रीमंता पेक्षा झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव आयुष्य जास्त सुंदर बनत.
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...
कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...
चारचौघात एकट बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत..!!
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Wednesday, January 25, 2017

पोलिसच बनत आहेत गँगस्टर !

       १६ जानेवारी  २०१७ ला रात्री अंकली आणि उदगाव येथे दोन पोलिसांच्या वादातून झालेला राडा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.त्याचबरोबर या दोन जिल्ह्यातील पोलीस दलाची मान खाली गेली आहे. पोलिसमध्येच झालेल्या या गँगवार मध्ये दोन्ही गटात मिळून सुमारे पाचजण  police record वर असलेले criminal आहेत. त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबंद उघड झाले आहेत. या घटनेमुळे आता पोलिसच गँगस्टर बनू लागले आहेत काय अशी शंका येते.
गँगवार करणारे पोलीस
     गँगवार करणारे पोलीस हे sangli city police station ला कार्यरत आहेत. यातील एक पोलीस किरण पुजारी २०१० साली पोलीस दलात भरती झाला आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालयात काम केल्यानंतर आजपर्यत तो सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर संतोष पाटील हा २००६ मध्ये पोलिस दलात भरती झाला आहे. त्यानंतर तो पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, जत, कोकरुड पोलीस ठाण्यात काम केल्यावर तो आत्ता सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
.......................................................
      पोलीस दलाचे ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ’ असे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी असलेले पोलीस जर एकमेकांची जिरवण्यासाठी गुंडांची मदत घेत असतील, सामान्य माणसाने काय करायला हवे. सांगली पोलीस दलाला अशोक कामटे, कृष्णप्रकाश, असे कर्तबगार अधिकारी लाभले आहेत. गुन्हेगारांवर त्यांचा वचक निर्माण झाला होता. त्याच्या सारख्या अनेक धाडसी कर्मचारी व अधिकारी वर्गाने अतिशय कठीण अशा गुन्ह्याचा तपास करून sangli police दलाची पताका उंचावली होती. On duty २४ तास असणाऱ्या, ऊन-वारा-पाऊस, रस्त्यावरील वाहनांची गर्दी, pollution, याची तमा न बाळगता ,प्रसंगी जीवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस काम करतात. त्याच्या या कार्याबद्दल त्यांना सलाम.
         या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे सांगली पोलीस दलाचा मान धुळीस मिळाला आहे.
      या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी बदली न देता तसेच निलंबित न करता इतर गुन्हेगाराप्रमाणे कायद्याने योग्य अशी शिक्षा व्हायलाच हवी. तरच लोकांचा विश्वास पोलीस दलावर कायम राहील अस मला वाटत.
     तुम्हाला काय वाटत?????

Sunday, January 22, 2017

मी नुसतीच आई ?

        वाहन चालवण्याचा परवान्याचे नूतनी करणासाठी गेलेल्या बाईला अधिकाऱ्याने विचारले, "आपला व्यवसाय?'' बाई जरा बुचकळ्यात पडली. अधिकारी, "बाई म्हणजे तुम्ही काही उद्योग धंदा, नोकरी करता कि नुसत्याच ..  ".
बाई,   "छे ! छे ! व्यवसाय आहे. मी  आई आहे ".
अधिकारी, "आई हा काही व्यवसाय नाही. मी गृहिणी लिहितो. त्यात सर्व काही  आले."
       मी हा किस्सा लगेच विसरून गेले. पण नंतर मीहि जेंव्हा याच प्रश्णाला सामोरी गेले, तेंव्हा हे  सर्व पुन्हा आठवले. विचारणारी अधिकारी बाईच होती पण ती  जनता संपर्क अधिकारी असल्याने थोड्या ऐटीत होती.
     "आपला व्यवसाय?"  तिने प्रश्न टाकला. का कुणास ठाऊक पण मी मोठ्या रुबाबात तिला, "मी बाल विकास, संगोपन  व आंतर व्यक्ती संबध यातली संशोधन सह्हायक" असल्याचे सांगितले.अधिकारी बाई अवाकच झाली. व एकटक माझेकडे बघत राहिली.
     मी शांतपणे व सावकाश पुन्हा एकादा मी कोण ते तिला सांगितले. व तिने ते व्यवस्थित लिहिले. आता कुतूहलाने पण नम्रपणे, "आपण आपल्या क्षेत्रात नक्की काय करता?" तिने विचारले.
       शांत व आत्मविश्वासपूर्ण  आवाजातल माझ वरील वाक्य ऐकून, माझ  मलाच बर वाटल. व मी पुढे म्हणाले, "माझा संशोधन प्रकल्प वर्षानुवर्षे चालू आहे. (सर्वांना माहिती आहे आईला निवृत्ती नाही ) हे संशोधन प्रयोगशाळा व बाहेर व्यवहारात दोन्हीकडे करावे  लागते.
मला दोन साहेब आहेत. ( एक भगवंत व दुसरे माझे सर्व कुटुंब ). मला आत्तापर्यंत दोन पदव्यांनी भूषवण्यात आले आहे. (एक मुलगी व एक मुलगा). समाजशास्त्र भागातला माझा विषय हा सर्वात कठीण मानतात.  (सर्व मातांचे यावर एक मत असणार).  मला रोज १४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. कधी कधी २४   तास  कमी पडतात आणि  इतर अनेक पेशांपेक्षा इथे जास्त आव्हाने पेलावी लागतात. मोबदला मात्र विशेष करून पैश्यात न मिळता मानसिक समाधानातच मिळतो."
      माझ्याविषयी तिच्या मनातला वाढत चाललेला आदर मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला. मसुदा पूर्ण करून ती स्वतः मला सोडायला दारापर्यंत आली.
       घरी परततांना मला माझ्या व्यवसायाविषयीच्या  एका वेगळ्याच दृष्टीकोना मुळे खूप हलक हलक वाटू लागल. घरात शिरताच ५ वर्षाच्या माझ्या प्रयोगशाळा मदतनीसाने माझे स्वागत केले. बेडरूम मधून मला आमच्या नवीन प्रयोगाचा (६ महीन्याच लेकरू) खण खणीत आवाजातला रियाझ ऐकू येत होता.
       मी आज शासकीय लालफितीवर छोटासा विजय मिळवला होता. व आता मी मानव जातीला अत्त्यावश्शक अशा सेवेत एक उच्च पदस्त असल्याची माझे नावे नोंद झाली होती. त्यामुळे "मी एक अशीच कुणीतरी आई" म्हणून राहिले नाही.
मातृत्व !
      माता हे केव्हड महान पद. दारावरच्या पाटीवर हे पद असायला काय हरकत आहे? याच विचारप्रणाली मधून आजीला बाल संगोपन, विकास व आंतर व्यक्ती संबध यातली वरिष्ठ संशोधन अधिकारी.  पणजीला या प्रकल्पाच्या निदेशक म्हणावे.  माझ्या मते मावशी, आत्या, काकू या साऱ्या उपसंशोधन  अधिकारी आहेत.
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Saturday, January 21, 2017

काही राहिलं तर नाही ना !!!

       जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
“काही राहिलं तर नाही ना?”
वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”
लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.
अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”
६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला 

“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”
स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”
एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.
--------------------------------------------------------==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Thursday, January 19, 2017

आरोग्यमंथन : भाग ३

काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

१.]   कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.] कढीलिंब ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.]  पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.] माठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.] चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.]  हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 

७.]  अळू :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.]  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.]  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

१०.] टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

११.] मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

१२.] तांदुळजा :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

१३.] मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.]  शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.]  शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

१६.]  सॅलड :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, ज्याचे पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग अल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
( टीप : या सदरातील माहितीचा उपयोग करण्याअगोदर आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या )

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...