जसे प्रकाशाचे दिवस असतात, तशीच अंधारी रात्र असते.अंधार हटवून प्रकाश येत असतो. प्रकाशाला अडवू पाहणारी रात्र कितीही काळीकुट्ट असली तरी तिच्या समस्त अंधाराला छेद देण्यास एक लहान पणतीही पुरेशी असते. ही पणती प्रकाशाचा वारसा सांगते. अशा पणत्या आपण जपायच्या असतात. ज्यांना समाजाला अंधारात ठेवून स्वतःचे हितसंबंध राखायचे असतात ते या पणत्या विझवु पाहतात.
एक पणती विझली की, या अंधारयात्रींना आनंददायी वाटते. थोडा काळ काळोख पसरतो हे खरे. पण अंधारयात्रींनाअंधार हे माहित नसते कि........त्या पणतीच्या तेजात दुसऱ्या पणत्या जीव धरत असतात......नवीन निर्माण होत असतात. म्हणून तर अंधार हटवायला पुन्हा नवीन पणती येते, अन अंधार छेदून दाखवते.....
माझ्या आयुष्यात अंधाराचे साम्राज्य ....अज्ञानाचे साम्राज्य हलवायला जय दोन पणत्या कमी आल्या त्यातील पहिली पणती होती डॉ मरेंद्र दाभोलकर, व दुसरी पणती होती कॉ गोविंद पानसरे. पहिल्याने मला विवेक शिकवला व दुसर्याने संघर्ष.माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यातील माणूसपण या दोघांनी घडवले.आयुष्यात या दोघा प्रकाशयात्री बरोबर जो हवास घडला तोच सहवास माझे इवलेसे आयुष्य, माझ्यातील खरे माणूसपण घडवत जाईल.
या दोन्ही प्रकाशसूर्याना अंधारसाथीनी देहाने नष्ट केल. अंधारसाथींना असे वाटते कि आता आम्ही जिंकलो........पण हा भ्रम आहे त्यांचा. कारण या प्रकाशसूर्याची अनेक किरणे अंधाराला भेदण्यासाठीद विवेकी विचार व लोकशाही संघराह घेऊन केंव्हाच मैदानात उतरली आहेत. उघड्या मैदानावर हि सूर्यकिरणे आपल्या विवेकाचा आवाज बुलंद करत उजळ माथ्याने फिरत आहेत. याउलट अंधारयात्री अर्थात भेकडांची औलाद कोंतून अंधाऱ्या गुहेत तोंड काळे करून बसले आहेत कुणास ठाऊक. अपराधी व्यक्ती आपले तोंड लोकांना दाखवू शकत नाही तसेच या भेकडांचे आहे. दरवेळी हि भेकडांची औलाद अधिकाधिक भेकड बनते.
महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे हा भेकड किमान समोर येऊन भेकड कृत्य करून गेला. ही भेकड नथुरामची पुढील औलाद मात्र दिवसाढवळ्या खून करून अंधाऱ्या गुहेत आश्रयाला जाते. याचे कारण एकच.........आपण विचारांची लढाई हरलोय याची पक्की जाणीव त्यांना झालीय. विचारांचे शस्त्र जवळ नसेल तर लढाई हरणारच. देह संपवता येतो, पण विचार संपवता येत नाहीत. हे वास्तव या भेकडांना कळेल तो सुदिन.
आमचे प्रकाशसूर्य आम्हाला विवेकाचा व संघर्षाचा वारसा देऊन गेलेत.तुमच्या हजारो वर्षाच्या अन्यायी व्यवस्थेला घडण्याची किमया आमच्या एकेका प्रकाशसूर्याने करन दाखवलीय. कधी चार्वाक बनून तर कधी बुद्ध...... कधी बसवेश्वर बनून तर कधी तुकाराम.....कधी जोतिबा सावित्री बनून तर कधी शाहू, आंबेडकर बनून.... कधी गांधीजी बनून तर कधी दाभोलकर, पानसरे बनून......आमच्या प्रकाशसूर्यांना गिळण्याची कितीही पराकाष्ठा केली तरीही.......ध्यानात ठेवा ....तोंड तुमचेच भाजेल. कारण हे सूर्य चोख आणि स्वच्छ हृदयातच वसतात.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे.तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment