Sunday, January 22, 2017

मी नुसतीच आई ?

        वाहन चालवण्याचा परवान्याचे नूतनी करणासाठी गेलेल्या बाईला अधिकाऱ्याने विचारले, "आपला व्यवसाय?'' बाई जरा बुचकळ्यात पडली. अधिकारी, "बाई म्हणजे तुम्ही काही उद्योग धंदा, नोकरी करता कि नुसत्याच ..  ".
बाई,   "छे ! छे ! व्यवसाय आहे. मी  आई आहे ".
अधिकारी, "आई हा काही व्यवसाय नाही. मी गृहिणी लिहितो. त्यात सर्व काही  आले."
       मी हा किस्सा लगेच विसरून गेले. पण नंतर मीहि जेंव्हा याच प्रश्णाला सामोरी गेले, तेंव्हा हे  सर्व पुन्हा आठवले. विचारणारी अधिकारी बाईच होती पण ती  जनता संपर्क अधिकारी असल्याने थोड्या ऐटीत होती.
     "आपला व्यवसाय?"  तिने प्रश्न टाकला. का कुणास ठाऊक पण मी मोठ्या रुबाबात तिला, "मी बाल विकास, संगोपन  व आंतर व्यक्ती संबध यातली संशोधन सह्हायक" असल्याचे सांगितले.अधिकारी बाई अवाकच झाली. व एकटक माझेकडे बघत राहिली.
     मी शांतपणे व सावकाश पुन्हा एकादा मी कोण ते तिला सांगितले. व तिने ते व्यवस्थित लिहिले. आता कुतूहलाने पण नम्रपणे, "आपण आपल्या क्षेत्रात नक्की काय करता?" तिने विचारले.
       शांत व आत्मविश्वासपूर्ण  आवाजातल माझ वरील वाक्य ऐकून, माझ  मलाच बर वाटल. व मी पुढे म्हणाले, "माझा संशोधन प्रकल्प वर्षानुवर्षे चालू आहे. (सर्वांना माहिती आहे आईला निवृत्ती नाही ) हे संशोधन प्रयोगशाळा व बाहेर व्यवहारात दोन्हीकडे करावे  लागते.
मला दोन साहेब आहेत. ( एक भगवंत व दुसरे माझे सर्व कुटुंब ). मला आत्तापर्यंत दोन पदव्यांनी भूषवण्यात आले आहे. (एक मुलगी व एक मुलगा). समाजशास्त्र भागातला माझा विषय हा सर्वात कठीण मानतात.  (सर्व मातांचे यावर एक मत असणार).  मला रोज १४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. कधी कधी २४   तास  कमी पडतात आणि  इतर अनेक पेशांपेक्षा इथे जास्त आव्हाने पेलावी लागतात. मोबदला मात्र विशेष करून पैश्यात न मिळता मानसिक समाधानातच मिळतो."
      माझ्याविषयी तिच्या मनातला वाढत चाललेला आदर मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला. मसुदा पूर्ण करून ती स्वतः मला सोडायला दारापर्यंत आली.
       घरी परततांना मला माझ्या व्यवसायाविषयीच्या  एका वेगळ्याच दृष्टीकोना मुळे खूप हलक हलक वाटू लागल. घरात शिरताच ५ वर्षाच्या माझ्या प्रयोगशाळा मदतनीसाने माझे स्वागत केले. बेडरूम मधून मला आमच्या नवीन प्रयोगाचा (६ महीन्याच लेकरू) खण खणीत आवाजातला रियाझ ऐकू येत होता.
       मी आज शासकीय लालफितीवर छोटासा विजय मिळवला होता. व आता मी मानव जातीला अत्त्यावश्शक अशा सेवेत एक उच्च पदस्त असल्याची माझे नावे नोंद झाली होती. त्यामुळे "मी एक अशीच कुणीतरी आई" म्हणून राहिले नाही.
मातृत्व !
      माता हे केव्हड महान पद. दारावरच्या पाटीवर हे पद असायला काय हरकत आहे? याच विचारप्रणाली मधून आजीला बाल संगोपन, विकास व आंतर व्यक्ती संबध यातली वरिष्ठ संशोधन अधिकारी.  पणजीला या प्रकल्पाच्या निदेशक म्हणावे.  माझ्या मते मावशी, आत्या, काकू या साऱ्या उपसंशोधन  अधिकारी आहेत.
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com  आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...