प्रिय पँथर
सविनय जय भिम..!
प्रथमताः तुझ्या त्यागाला,जिद्दीला,शौर्याला,प्रतिभेला,अस्मितेला सलाम..!!
आज तुझी आठवण प्रकर्षाने येत आहे, आजच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक घड़ोघड़ीला ती येत आहे आणि येत राहील.. मित्रा
आजपर्यन्त आंबेडकरवादी चळवळीने जे काही मिळवलं ते आयत कधीच नव्हतं.. प्रत्येक वेळी तुला अन् तुझ्यासारख्या पँथर्सना संघर्ष करावाच लागलाय..जणू काही संघर्ष हा आंबेडकरवादी चळवळीच्या पाचविलाच पूजलाय..अगदी भिमा कोरेगाव पासून आपला लढा पाहिलास तर खुप प्रकर्षाचा संघर्ष तुझ्या माझ्या पिढीला करावा लागलाय..
कॉम्रेड,नामांतर लढ्यात तुझ योगदान हे अफाट आहे.. विद्यापीठाची पाठीच तर बदलायची होती.. आज अनेक नामांतरन होतायेत्.. काहींनी तर स्वताच्या नावाचीही विद्यापीठ सुरु केलेत.. मग तुला का बर 14 वर्षे संघर्ष करावा लागला?? कारण तुझी मागणी असलेल नाव हे अनेकांच्या पचनी पडत नव्हतं...कस पडेल? अरे बाबासाहेबांच नाव मुखात जरी घ्यायच असेल तरी काळीज वाघाच लागत... आणि भेकड़ जातीयवाद्यांकडून ही अपेक्षा करण चुकीचच..
बर का बर झाला असेल विरोध तुझ्या मागणीला? डॉ बाबासाहेब आंबेडकर हा महामानव ज्ञानाचा प्रकांड पंडित सार जग आज त्यांना पूजनीय मानत असल तरी जातीयवादी प्रवृत्तीनात्या महामानवाची फ़क्त जातच दिसते रे...
जर बाबासाहेबांच नाव विद्यापीठाला दिल तर उद्या त्यांचा फोटो, कसतरी पास झालेली आमच्या पोरांच्या सर्टिफिकेट वर येणार.. आणि ते सर्टिफिकेट आम्ही घराच्या भिंतीवर लटकवनार् पर्यायाने आमच्या घराच्या भिंतीवर येणार..एका महाराचा फोटो,नाव यांना घरात कस चालेल? इतकी कुमकूवत बुद्धी यांची..पण तुझ्या संघर्षाने हा लढा तडीस नेला.. नामांतर नसल तरी नामविस्तार झाला.. त्यावेळी तुझ्यावर झालेले अन्याय अत्याचार अजुन जीवाची घालमेल करतात..
ह्रदयसम्राट म्हणवून घेणाऱ्या जातीयवादी बाळ ठाकरेने घरात नाही पीठ अन् कशाला हव विद्यापीठ*म्हणून तुझ्या मागणीची हेटाळनी केली.त्याच्या अनेक इशाऱ्याने त्यावेळी दंगली घडवल्या, पोचिराम कांबळे,चंदर कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ले केले.. त्याच्या अनेक सैनिकानी(घँटयाचे सैनिक,भेकड़ साले) बनसोडे नामक बहिणीवर बलात्कार केला..
तुझ घर वस्ती जाळली.. पण तरीही तू डगमगला नाहीस..तुझ्यातलाही पँथर तू जागा केलास.. पँथर हा असा प्राणी जो मांस न खाता फ़क्त रक्त पितो... तूही तसच जातीयवाद्यांच्या नरडीचा घोट घेत त्यांच् रक्त प्यालास.. एका हातात पुस्तक आणि एका हातात दांडक घेऊन तू लढत राहिलास.. तुझ्या लढन्याला साथ होती ती विचारांची म्हणून तू टिकु शकलास..
तुझ्या लढ्याला आजच्या दिवशी यश मिळाल.. पण जाळलेल्या घराची राख अजुन विसर्जित केलेली नाही कारण लढाई अजुन संपलेली नाही.. ती चालूच राहील.. एक गोष्ट तुला दुर्दैवाने सांगावी वाटतेय..आज पँथर सुस्तावला आहे... तुझ्यासारखी त्यागवृती त्यांच्यात नकळत कुठेतरीच पहायला मिळतेय..तो पुन्हा जागा व्हावा, अन्यायाविरोधात डरकाळी फोडावा, बंड करून उठावा यासाठी बळ दे..
_तुझ्या पाऊलखुनावर चालत जाऊन आंबेडकरवादी विचारांचा ध्वज रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यन्त सोडणार नाही हा विश्वास तुला देवून थांबतो...
पुन्हा एकदा तुला सलाम...क्रांतीकारी जयभिम
तुझाच साथी
पँथर राजवैभव
(कोल्हापुर)
8600810043
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही art icle, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment