१६ जानेवारी २०१७ ला रात्री अंकली आणि उदगाव येथे दोन पोलिसांच्या वादातून झालेला राडा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.त्याचबरोबर या दोन जिल्ह्यातील पोलीस दलाची मान खाली गेली आहे. पोलिसमध्येच झालेल्या या गँगवार मध्ये दोन्ही गटात मिळून सुमारे पाचजण police record वर असलेले criminal आहेत. त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबंद उघड झाले आहेत. या घटनेमुळे आता पोलिसच गँगस्टर बनू लागले आहेत काय अशी शंका येते.
गँगवार करणारे पोलीस
गँगवार करणारे पोलीस हे sangli city police station ला कार्यरत आहेत. यातील एक पोलीस किरण पुजारी २०१० साली पोलीस दलात भरती झाला आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालयात काम केल्यानंतर आजपर्यत तो सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर संतोष पाटील हा २००६ मध्ये पोलिस दलात भरती झाला आहे. त्यानंतर तो पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, जत, कोकरुड पोलीस ठाण्यात काम केल्यावर तो आत्ता सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
.......................................................
पोलीस दलाचे ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ’ असे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी असलेले पोलीस जर एकमेकांची जिरवण्यासाठी गुंडांची मदत घेत असतील, सामान्य माणसाने काय करायला हवे. सांगली पोलीस दलाला अशोक कामटे, कृष्णप्रकाश, असे कर्तबगार अधिकारी लाभले आहेत. गुन्हेगारांवर त्यांचा वचक निर्माण झाला होता. त्याच्या सारख्या अनेक धाडसी कर्मचारी व अधिकारी वर्गाने अतिशय कठीण अशा गुन्ह्याचा तपास करून sangli police दलाची पताका उंचावली होती. On duty २४ तास असणाऱ्या, ऊन-वारा-पाऊस, रस्त्यावरील वाहनांची गर्दी, pollution, याची तमा न बाळगता ,प्रसंगी जीवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस काम करतात. त्याच्या या कार्याबद्दल त्यांना सलाम.
या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे सांगली पोलीस दलाचा मान धुळीस मिळाला आहे.
या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी बदली न देता तसेच निलंबित न करता इतर गुन्हेगाराप्रमाणे कायद्याने योग्य अशी शिक्षा व्हायलाच हवी. तरच लोकांचा विश्वास पोलीस दलावर कायम राहील अस मला वाटत.
तुम्हाला काय वाटत?????
Wednesday, January 25, 2017
पोलिसच बनत आहेत गँगस्टर !
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment