ख्रिस्तपूर्व २५० वर्षांपूर्वी चीनमधील थिंगज्दा प्रदेशच्या राजपुत्राचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली होती.कायद्याप्रमाणे त्याआधी त्याचा विवाह होणे आवश्यक होते.
राणीपदासाठी जिच्यावर संपूर्ण विश्वास टाकता येईल,अशी मुलगी शोधणे प्राप्त होते.वयोवृद्धांच्या सल्ल्याने त्याने सर्व तरुण मुलींना दरबारात यायला सांगितले.
राजवाड्यात खूप वर्षे सेवा केलेल्या वृद्ध स्त्रीस हे सारे समजले.तिच्या मुलीचे राजपुत्रावर प्रेम आहे,हे तिला माहित होते.त्यामुळे तीला खूप वाईट वाटले.ती घरी आली.मुलीला ती हकीकत तिने सांगितली, मुलीने पण राजवाड्यात जाणार,हे तिला सांगितल्यावर ती म्हणाली,"पण बाळा,तू तिथे जाऊन काय करणार ? तेथे सर्व सुंदर,श्रीमंत मुली येतील.तुझा निर्णय वेडेपणाचा आहे.तू प्रेमात दु:खी आहेस.परंतु तुझ्या दुःखाचे रूपांतर वेडात करू नकोस."यावर मुलीने ऊत्तर दिले,"आई मी वेडी नाही,दुःखी तर मुळीच नाही.माझी निवड होणार नाही,हे मला चांगले ठाऊक आहे.ते माझ्या नशिबी नाही,तरी मी ज्याच्यावर प्रेम करते,त्यांच्या सहवासात चार क्षण मला घालवता येथील त्यामुळे."
ठरलेल्या दिवशी ती राजवाड्यात गेली.खर्च तिथे सुंदर व श्रीमंत तरुणींचा मेळा भरला होता.त्यांनी हर वेगवेगळे सुंदर पोशाख व दागदागिने घातले होते.या संधीचा फायदा घ्यायचा या विचाराने त्या तिथे आल्या होत्या.
राजपुत्र आपल्या प्रधानाबरोबर दरबारात आला.त्याने सर्वपुढे एक आव्हान ठेवले.मी प्रत्येकीस एक बी देणार आहे.आजपासून सहा महिन्यांनी जी सुंदर फुल आणेल ती राणी होईल.
तिने बी घरी आणली.एका छोट्या कुंडीत लावली.तिला बागकामाची माहिती नव्हती.इतरांना माहिती विचारून तिने कुंडी तयार केली.तिच्या प्रेमाईटकेच सुंदर फुल आले तर अपेक्षेप्रमाणे होईलच,यावर तिचा विश्वास होता.
तीन महिने झाले.बी रुजली नाही.तिने बरेच प्रयन्त केले.शेतकरी,बागवनाचाना सल्ला घेतला.कुंडीत काहीच येईना.आपले स्वप्न दरदिवशी दूर जात आहे,असे तिला वाटलेतिला.तरी तिचे प्रेम अढळ ,सतेज होते.
सहा महिने सरले कुंडी रिकामीच राहिली.राजपुत्राला दाखवण्यासारखे काहीच नव्हतेच.तिचे प्रयन्त प्रामाणिक होते.मी रिकामीच कुंडी घेऊन जाणार,असे तिने आईला सांगितले.हि आपली व राजपुत्राची शेवटची भेट.आपल्या प्रेमाचे होणारं शेवटचे दर्शन,सहवास सारे तिला चुकवायचे नव्हते.
ठरलेल्या दिवशीदिवशी रिकामी कुंडी घेऊन ती दरबारात आली.इतर सर्व कुंड्यात रंगीबेरंगी फुले होती.राजपुत्र आला.त्याने सर्व कुंड्या पहिल्या.आनि राणी म्हणून नोकरणीच्या मुलीचे नाव घोषित केले.
रकमी कुंडी असलेल्या मुलीची निवड केल्याबद्दल इतरांनी विरोध नोंदवला.शांत शब्दांत राजपुत्राने खुलासा केला.
"या एकाच मुलीने ज्या फुलाची जोपासना केली,ते फुल म्हणजे प्रामाणिकपणा.म्हणून ती राणीपदासाठी लायक ठरली.तुम्हा सर्वांना दिलेल्या बियानिर्जीव केलेल्या होत्या.त्यातून कधीच काही उगवण्याची शक्यता नव्हती.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Thursday, January 12, 2017
परीकथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment