माझी आई
माझ्या सावू चा गं आज, असे जन्मदिन |
आज पोरीला या तुझ्या, वाटे अभिमान ||
हाल अपेष्टा अपार, सोसल्या तू आई |
आम्ही मुलींनी करावी, कशी त्याची भरपाई?
शेन- दगडांचे वर्षाव, झेललेस अंगावर |
पण, जिद्दीपुढे तुझ्या, त्यांचे हरले प्रहार ||
जोतिबाच्या संगे, उभी सावू कणखर |
तुम्हा दोघांच्या कारणे, आज मान माझी वर ||
आई, तू एक ज्वाला , तलवार तळपती |
शक्ति लेखणिची, माझ्या दिलीस तू हाती ||
आई, तुझ्या स्वप्नान्परी, मी शिकेन गं फार।
अभी राहीन गं ताठ, घेईन जग खांद्यावर ||
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या ब्लॉगवरून त्यांना मनाचं अभिवादन.खरतर सूर्याची कोणी ओळख करून देत ,त्याचे तळपत तेज,त्याचा प्रकाश ,हीच त्याची ओळख असते.भारतातील स्त्रीया साठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या, सावित्रीबाई म्हणजे एक सूर्यच नव्हे का ?
या देशातील 33 कोटी देव मिळून जे स्त्रियांसाठी करू शकले नाहीत.ते कार्य सावित्रीबाईंनी केलं.त्याच्या जयंती निमित्ताने आपण त्याच्या कार्याची ओळख करून घेऊया.त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करूया.
(सावित्रीबाई याच्या वरील लेखमालिका पुढील भागापासून)
No comments:
Post a Comment