Tuesday, May 16, 2017

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा वळण नवे
कळेना कोणती चालावी वाट
पुन्हा एकवार

परत एकदा नवा प्रहार
मन - मेंदूचा वार - प्रतीवार
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा त्रासले मन
अन्यायी जुलुमाने जाचले मन
पुन्हा एकवार

परत एकदा काळोखा अंधार
सापडेना शोधूनही उषःकाल
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा झाले चक्र सुरु
लागे टीका वीज कडाडू
पुन्हा एकवार

परत एकदा दाटले कृष्णमेघ
झाली मजवर दुःख बरसात
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा केली याचना
टाकला गहाण स्वाभिमान
पुन्हा एकवार

परत एकदा नटसम्राट
फिरले परत दारोदार
पुन्हा एकवार

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...