आरक्षणाची संकल्पना
सर्वप्रथम आरक्षण लागू करण्याचा मान छ. शाहू महाराज यांना जातो. छ. शाहू महाराजांनी 26 जुलै1902 रोजी कोल्हापुर संस्थानात ब्राम्हण, पारशी, प्रभु व शेणवी या उच्च जातींना वगळता उर्वरित समाजाला 50% आरक्षण लागू केले होते. याचा विरोध करण्यासाठी सांगली संस्थानातील ब्राम्हण कारकून गणपत अभ्यंकर हा गेला. शाहू महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला वा त्यांना घोड्याच्या पागेत घेऊन गेले. तेथे सर्व घोडे एका रांगेत बांधलेले होते प्रत्येक घोडा त्याच्या तोंडाशी बांधलेल्या तोबार्र्यातील हरभरे खात होता. कोणीच कोणाच्या तोबार्र्यात तोंड घालण्याची सोय नव्हती. शाहू महाराजांनी अभ्यांकरास हे दाखवून म्हटले पाहा ही माझी व्यवस्था. नंतर त्यांनी सेवकास बोलावून आज्ञा दिली की सर्व घोड्याच्या तोबार्यातील हरभरे काढून एकत्र जमीनीवर टाका व सर्व घोडे सोडून द्या. सेवकांनी त्याप्रमाणे केले. लगेच काय दृश्य उत्पन्न झाले? जी धष्ट्पुष्ट, बलवान,मोठी घोडी होती ती सर्व हरभर्र्याच्या चारी बाजूला वर्तुळ करून, घेरून उभी राहीली व ते हरभरे फस्त करू लागली व जी कमजोर,अल्पवयीन म्हातारी घोडी होती ती मागे उभी राहून त्या घोड्यांकडे लाचारपणे बघत होती की ती बलवान घोडी नुसते खातच नव्हती तर मागे लाता सुद्धा झाडत होती. मग त्या मागे उभे असलेल्या कमजोर घोड्यांकडे बोट दाखवून शाहू महाराजांनी विचारले “सांगा अभ्यंकर आता मी या घोड्याचे काय करू काय यांना गोळ्या घालू ? जाती या जनावरात असतात, तुम्ही ब्राम्हणांनी जनावराची व्यवस्था माणसात लागू केली मी माणसाची व्यवस्था जनावरात लागू केली आहे”. हे एकून अभ्यंकराने शरमेने मान खाली घातली. मला वाटतं आरक्षणाची संकल्पना स्पष्ट समजण्यास हे उदाहरण पुरेसे आहे.
आरक्षण म्हणजे कोणावर अन्याय नव्हे तर प्रत्येक समाजाचा वाटा सुरक्षित करणे आहे. आणि एखाद्या समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचाच असलेला हिस्सा संरक्षित केला तर इतर समाजाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment