Tuesday, May 9, 2017

बना क्रिएटिव्ह

        सध्याचा जमाना क्रिएटिव्ह लोकांचा आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत नावीन्य हवं असतं. जुनं नको... नवं हवंय, ते पण काही तरी वेगळं, जरा हटके...हा डायलॉग आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतोच. जर या स्पर्धेत आपल्याला टिकाव धरायचा असेल तर आपल्यातली क्रिएटिव्हीटी टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
        म्हणूनच जाणून घेऊयात अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्यातील क्रिएटिव्हीटी नक्कीच बहरेल... 

(हे पण वाचा : प्रेरणादायी नारायनमूर्ती)
एक नोटबुक जवळ ठेवा
       तुम्ही कुठेही असलात तरी जवळ एक नोटबुक ठेवा. हे तुमचे प्लॅनर नाही किंवा बिजनेस कार्ड विसरल्यावर कागदावर नंबर लिहून देण्याची सोय म्हणूनही नाही. यावर फक्त तुम्ही अवती-भोवती निरीक्षण केल्यावर मिळालेले अनुभव, कथा, विचार लिहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या टीपा वाचून त्यावर विचारमंथन करा. या टीपांमधून कदाचित तुम्हाला तुमच्या उद्योगाला प्रमोट करणारी एखादी आयडिया मिळू शकते.
प्रेरणादायी गोष्टी करा
            कुठेही, काहीही आवडले किंवा प्रेरणादायी वाटले तर त्याची आठवण तुमच्या भिंतीवर चिकटवा. एखाद्या वृत्तपत्रातील कात्रण किंवा आवडलेल्या ठिकाणचा फोटो किंवा काहीही ज्यातून तुम्हाला प्रेरणादायी वाटेल. ही कात्रणे भविष्यात कशाप्रकारे उपयोगी ठरतील याची तुम्हाला आताच कल्पना येणार नाही. पण ती उपयोगी ठरतील हे मात्र नक्की.
वेळ द्या
क्रिएटिव्हिटीसाठी  जिमला जाणे किंवा ध्यान करणे यासाठी ज्याप्रमाणे नियमित प्रॅक्टिसची गरज असते त्याचप्रमाणे क्रिएटिव्हिटी बहरायलासुद्धा थोडा अवधी द्यावा लागतो. आपल्या आठवड्याभरातील काही वेळ क्रिएटिव्हिटीसाठी राखून ठेवा. ही वेळ 15 मिनिटांची असो किंवा संपूर्ण दिवस. या वेळेत स्वतःला मोकळे सोडा. मुक्तपणे श्वास घ्या, हाताने काही काम करा किंवा निवांत भटकंती करा.
रोजच्यापेक्षा वेगळे करा
        रोज-रोज तेच काम केल्याने मनावर मरगळ येते. ही मरगळ घालवण्यासाठी काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळे करा. रोज तुम्ही एकाच रस्त्याने जात असाल तर तो रस्ता बदलून पहा. रोज जे खाता त्यापेक्षा काहीतरी वेगळे खा. रोज तोच व्यायाम करण्यापेक्षा एखाद्या दिवशी व्यायाम म्हणून डान्स करुन पहा. या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या क्रिएटिव्ह मेंदूला तरतरी प्रदान करतील.
'नाही' म्हणू नका
       कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणू नका. नकारात्मक उत्तर देण्याऐवजी त्याला पर्याय काय असू शकतो हे शोधा... प्रत्येक कामात नकारघंटा वाजविण्याऐवजी नवीन आव्हाने स्वीकारा. स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. त्यामुळे तुमची क्रिएटिव्हीटी अधिक वाढेल...
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...