भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला असता त्याला प्रत्युत्तर देताना दानवेंची चांगलीच जीभ घसरली आहे. राज्य सरकारनं एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात साले, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच आगपाखड केली आहे. रावसाहेब दानवेंच्या हस्ते पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.
याआधीही रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
👉 नोटाबंदी केल्यानंतर दानवे म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?.
👉 तसेच गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली. असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं.
👉 पैठणमधील एका प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा., असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.
👉 तसेच काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उद्देशूनही बेजबाबदार विधान केलं होतं. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं दानवे म्हणाले होते.
(वरील विधानांचा संदर्भ शोधण्यासाठी व अधिक माहितीसाठी दि.11.5.2017 दै. लोकमत वाचावा)
कांग्रेस राजवटीच्या (विशेषतः upa 2) काळात झालेल्या भ्रष्टाचारास वैतागून जनतेने भाजप ला मतदान दिलेले आहे. आज रोजी भाजप सत्तेवर येऊन 3 वर्ष झाली आहेत.
या 3 वर्ष्याच्या काळात कितीतरी चांगल्या गोष्टी झाल्या असतील.या लेखाचा विषय तो नाही.
पण एक गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीत घडतेय आणि कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. द.महाराष्ट्राचा पट्टा हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो.उसाला दर मिळावा म्हणून दरवर्षी कांग्रेस राजवटीच्या काळात शेतकरी संघटना आंदोलन करायच्या.गरीब शेतकऱ्याच्या पोरावर खटले दाखल व्हायचे. पण शेतकऱ्याचं पोर मग हटायच नाही कारण त्याला त्याच्या हक्काचा ,घामाचा योग्य मोबदला हवा असायचा. शेतकरी संघटनेने parti with difference सोबत युती केली.सत्ता ही मिळवली.सत्ता मिळाल्याबरोबर शेतकरी आंदोलने ही थांबली.
गतवर्षी डाळीचे भाव वाढले होते.मा.पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना डाळीचे अधिक उत्पन्न घेण्याचे आवाहन केले.राज्यसरकारने या आवाहनस चांगला प्रतिसाद देत शेतकऱ्यांना डाळीचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन दिले.परिणामी शेतकऱ्यानी डाळीचे भरघोस उत्पन्न कापुन दाखविले. अश्या वेळीही सरकारने डाळीची आयात केली परिणामी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही.सरकारी पातळीवर मुखमंत्री म्हणतात डाळीचा शेवटचा दाना खरेदी करू.
आणि त्यांचेच सहकारी शेतकऱ्यांना अस बोल लावत असतील तर काय म्हणावे? कदाचित पुढे दानवेंचे विधान, त्या विधानाचा बचाव, त्यावरून राजकारण होईलही पण.....या सगळ्यात शेतकरी भरडला जातोय, त्याला त्याच्या घामाचे मोल मिळत नाही,याचे भान या राजकारणी मंडळींना कधी येणार ???
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment